Halloween Costume ideas 2015

कोरोनासोबत जगले पाहिजे!

कोरोना विषाणूने जगभराची झोप उडविली आहे. जीवहानी, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. लॉकडाऊनमुळे बाधितांच्या संख्येवर नियंत्रण आणले होते मात्र त्याची साखळी तोडण्यात जग यशस्वी होऊ शकले नाही. त्यामुळे कोरोनाच्या भीतिने अतोनात नुकसान झाले. लॉकडाऊन वर्षभर तर ठेवता येऊ शकत नाही, कारण त्याचा जनजीवनावर सर्व प्रकारे विपरित परिणाम होत आहे. बेरोजगारी अफाट वाढली आहे. गरीबांच्या पोटाचे वांदे झाले आहे. अक्षरश: भुकेपोटी मृत जनावराचे मांस खातानाही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे जगाने विशेषत: भारताने आता कोरोनासोबत जगायचे शिकले पाहिजे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासनाच्या वेळोवेळी आदेशाची अंमलबजावणी करीत कामकाज सुरळीत झाले पाहिजे. जेणेकरून बाधित होऊन मरणार्‍यांपेक्षा भुक, बेरोजगारी आणि मानसिक आजारातून मरणार्‍यांची संख्या वाढणार नाही.
आज जगात कोरोना बाधितांचा आकडा 50 लाखांवर जाऊन पोहोचला आहे. 3 लाख 27 हजार 601 रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर 20 लाख लोक बरे झाले आहेत. भारतातही 1 लाख 11 हजार 601 कोरोनाबाधित आहेत. 3 हजार 434 जणांचा यात मृत्यू झाला असून, 45 हजार 422 रूग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे मरणार्‍यांपेक्षा अधिक लोक बेरोजगारी, गरीबी, भूकेने आणि ताण तनावाने मरणार्‍यांची संख्या निश्‍चित येणार्‍या काळात वाढेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
आपल्या महाराष्ट्रात आतापर्यंत 39 हजार 227 रूग्ण बाधित असून, 1390 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कठोर उपाययोजना करून देखील दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढत असून, राज्याचे सर्वांगीण नुकसान होत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी किती वर्षे जातील, याचा निश्‍चित अंदाज सांगणे कठीण आहे.
मजुरांचे स्थलांतर वाढत असल्यामुळे उद्योगजगतात मोठी पोकळी निर्माण होत आहे. कोरोनाची चेन तुटणे सध्यातरी कठीण वाटत आहे. त्यामुळे आरोग्यविषयक निर्बंधांचे पालन करीत प्रत्येकाने जबाबदारीने वागले तर कोरोनाला हरविणे सोपे होईल. यासाठी मोठी इच्छाशक्ती नागरिकांना दाखवावी लागेल, कोरोनासोबत आता जगणे शिकले पाहिजे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget