Halloween Costume ideas 2015

मुंबईकरांची चिंता कायम ! आज 635 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजाराच्या उंबरठ्यावर

मुंबई 
मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत आजही लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे मुंबईवरील धोका अजूनही कमी झाला नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. मुंबईत आज तब्बल 635 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा दहा हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मुंबईत मृत्यू होण्याचे प्रमाणातही घट झाली नसून आज तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील मृतांचा आकडा 387 वर पोहोचला आहे.

आज मुंबईत 635 नवे कोरोना रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या 9758 झाली आहे. आज सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी 515 रुग्ण आज आढळले असून 120 रुग्ण 1 ते 3 मे रोजी दाखल झाल्याचे सांगण्यात येते. आज झालेल्या 26 मृत्यूंपैकी 22 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या मृतांमध्ये 16 पुरुष: तर 10 महिलांचा समावेश होता. मृत झालेल्या रुग्णांपैकी दोघांचे वय 40हून कमी होते; तर 11 रुग्ण 60 वयावरील होते. 13 रुग्ण 40 ते 60 वयोगटादरम्यान होते. आज एकूण 406 नवे संशयित रुग्ण सापडले असून  आतापर्यंत 12,306 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 220 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2128 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

स्थालंतरित कामगारांची तपासणी
स्थलांतरित कामगारांना आता पालिकेच्या दवाखान्यांमध्ये दुपारी 2 ते 4 च्या दरम्यान आपली आरोग्य तपासणी करता येणार आहे. त्यासाठी कामगारांना आधारकार्ड किंवा ओळखपत्र दाखवणे अनिवार्य आहे. आरोग्य तपासणीसाठी पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत गर्दी करू नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

डायलिसिस करण्यास विलंब नको
पालिकेने आज पुन्हा एकदा  सर्व खासगी रुग्णालये सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय डायलिसिस रुग्णांकडे डायलिसिस करण्यापूर्वी कोविड तपासणीची मागणी करू नये, असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. कोविडची लक्षणे असतील किंवा घरात कोव्हिडचा रुग्ण असेल किंवा संपर्क आला असेल तरच कोव्हिड तपासणीचा सल्ला देण्यात यावा, असे पालिकेने म्हटले आहे. डायलिसिस करण्यात कोणताही विलंब होऊ नये, असेही पालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयांना बजावले आहे.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget