Halloween Costume ideas 2015

१२ मे पासून विशेष ट्रेन सुरू होणार

या विशेष ट्रेनसाठी उद्या ११ मेपासून संध्याकाळी ४ वाजेपासून आरक्षण सुरू होणार

Train
नवी दिल्ली
करोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आलेली रेल्वे वाहतूक १२ मेपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने यासाठी नियोजन केले आहे. सुरुवातीला कमी संख्येत रेल्वे गाड्या धावतील. यादरम्यान प्रवाशांची आरोग्य आणि करोना तपासणी केली जाईल. फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिलीय. उद्या संध्याकाळपासून रेल्वेचे आरक्षण सुरू होईल.

१२ मेपासून रेल्वे १५ पॅसेंजर ट्रेन चालवणार आहे. या पॅसेंजर ट्रेन जोडीने चालवण्यात येतील. (return journeys) यानुसार या ट्रेनच्या एकूण ३० फेऱ्या होतील. या गाड्या डिब्रुगढ, अगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, तिरुवनंतपूरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमबादाबाद आणि जम्मू तवीला जाणाऱ्या आहेत. नवी दिल्लीवरून विशेष ट्रेनच्या स्वरूपात या गाड्या चालवल्या जातील.

सर्व पॅसेंजर ट्रेन या एसी डब्यांच्या असतील. या गाड्यांना मर्यादित थांबे असतील. राजधानी रेल्वेच्या तिकीटाइतकेच तिकीट या गाड्यांसाठी असेल. म्हणजे प्रवाशांना तिकीटासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

या विशेष ट्रेनसाठी उद्या ११ मेपासून संध्याकाळी ४ वाजेपासून आरक्षण सुरू होणार आहे. प्रवाशांना तिकीट खिडकीवर बुकींग करता येणार नाही. तर IRCTC च्या वेबसाइटवरून बुकींग करावं लागेलं. (https://www.irctc.co.in/) रेल्वे स्थानकांवरील काउंटर वरून कुठल्याही प्रकारचे तिकीट दिले जाणार नाही.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget