Halloween Costume ideas 2015

मेरे पास इम्युनिटी पासपोर्ट है... तेरे पास?

लवकरच आता ‘केवायसी’ डॉक्युमेंट बरोबर इम्युनिटी पासपोर्ट’ (किंवा नो रिस्क सर्टिफिकेट) हे अत्यावश्यक असणारे एक महत्त्वाचे कागदपत्र (डॉक्युमेंट) आपणा समोर येण्याची  शक्यता नाकारता येत नाही. अर्थातच मी आरोग्यदृष्ट्या तंदुरुस्त आहे हे तोंडी न सांगता कागदोपत्री प्रत्येकाला सिद्ध करावे लागणार आहे, त्यासाठी ‘इम्युनिटी पासपोर्ट’ हे महत्त्वाची  भूमिका बजावणार आहे. अर्थात ती काळाची गरज असणार आहे? ते कसे ते पाहू या... ‘इम्युनिटी पासपोर्ट’– हे काय असणार आहे? त्याचा फायदा-तोटा कोणाला होऊ शकेल? त्याचा हा  थोडक्यात गोषवारा...
रस्त्यावरून जात असताना वाहतूक पोलिसांनी जर अडवले तर सर्व प्रथम आपल्या ड्रायविंग परवन्याची विचारणा केली जाते, तद्वत यापुढे जगातील कोणत्याही देशातील नागरिकाना  शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे खात्रीशीर प्रमाणपत्र अर्थातच ‘इम्युनिटी पासपोर्ट’ असणे अन् ते दाखवणे बंधनकारक ठरणार आहे. कोरोनाच्या निमित्ताने जगभर अनेक समस्यांना  तोंड द्यावे लागले आहे. लक्षणे दिसल्यानंतर चाचणी अन् त्यानंतर विलगीकरण वगेरे आम्ही अनुभवले आहे. खबरदारी म्हणून यापुढे ‘इम्युनिटी पासपोर्ट’द्वारा संबधित नागरिकाची  आरोग्यविषयक सर्व पार्श्वभूमी क्यूआर कोडद्वारा संकलित करून ती संबधित एजन्सी्जना पडताळण्यासाठी अधिक सुलभ होणार आहे. काही जाणकारांच्या मते हे कागदपत्र आवश्यक  असले तरी त्याद्वारा त्या व्यक्तीचा आरोग्यविषयक सर्व माहिती त्यासाठी वैयक्तिक जीवनात नुकसानीच्यादेखील ठरू शकतात. उदा नोकरीच्या निमित्ताने दाखल होत असताना डॉक्टर  सर्टिफिकेटची विचारणा करतात. परंतु ‘इम्युनिटी पासपोर्ट’मुळे जर उमेदवार पूर्वी मोठ्या आजारातून गेला असेल तर त्याची पडताळणी न सांगता एच आर विभागाला उमजणार आहे  आणि कामाच्या जबाबदारी व त्याची रोगप्रतिकारक शक्ती याचा अंदाज घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेणे मालक वर्गाला अधिक सुलभ होणार आहे. विशेषता ताणतणाव असणाऱ्या क्षेत्रात  हे महत्त्वाचे कागदपत्र ठरणार आहे. तीच बाब नोकरीनिमित्त परदेशी जाणाऱ्या बांधवांची असणार आहे. विमानतळावर उतरताक्षणीच केवळ पासपोर्ट, विसाबरोबरच ‘इम्युनिटी  पासपोर्ट’ची पडताळणी सर्व प्रथम असणार आहे. ‘इम्युनिटी पासपोर्ट’बरोबरच घटनास्थळी वेळप्रसंगी चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. कारण कोरोनाच्या काळात किंवा इतर दुर्धर जे  रोग आहेत – ‘टेस्टिंग किट’ची १०० टक्के अ‍ॅक्युरसी असेल याची हमी जगातील कोणताही देश आज मितीला देऊ शकत नाही ‘झिरो डिफेक्ट’ अर्थात गुणवत्तेविषयक खात्री असणे  बंधनकारक असणे गरजेचे आहे. त्याची साशंकता जोपर्यंत योग्य व गुणकारी औषध बाजारात सहजपणे उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे असेच असणार आहे, असे स्पष्ट मत एप्रिलच्या  सुरुवातीलाच कॅथी हॉल या ब्रिटनमधील टेस्टिंग-किट संशोधकाने व्यक्त केल्याचे दिसून आले आहे.
‘इम्युनिटी पासपोर्ट’ प्राप्त करण्यासाठी आपणास सर्व प्रथम अ‍ॅण्टीबॉडी टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. उदा. हे पासपोर्ट प्राप्त असणारा सार्स-कोव्ही-२ पासून मुक्त (इम्युन)  असल्याचे आणि त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीचे संकेत मिळतील. तसेच संबंधित जर संक्रमित असेल तर लागलीच उपचारासाठी हालचाली कराव्या लागतील. संक्रमित नसेल तर  पासपोर्ट मिळण्यास पात्र ठरू शकेल. एकदा का हे प्रमाणपत्र/पासपोर्ट मिळाले की आपण निर्धास्तपणे नोकरी/ व्यवसायासाठी घराबाहेर पडू शकाल. तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये जिथे  उपस्थिती शेकडो-हजारोंच्या संख्येने असते तेथेही विद्यार्थी, शिक्षक यांना वरदान ठरू शकेल. प्रवासात, रस्त्यावर, भाजी मंडई, मॉल जिथे अनोळखी मोठ्या प्रमाणात भेटत असतात,  आज कोणीही इतर जन सोडाच पण स्वत:देखील संक्रमित आहे का याची निश्चित खात्री नाही, या पासपोर्टमुळे इतरांचा विश्वास तुम्ही सदृढ अर्थात संक्रमित नसल्याचा मोठा पुरावा  दाखवताना समाजामध्ये निर्माण करू शकता, आजच्या कालामध्ये हा विश्वास पूर्णपणे लयाला गेल्याचे आपण कोरोनाच्या निमित्ताने पाहिले आहेच.
जगभरमध्ये सदरची कल्पना अर्थात योजना एव्हाना सुरूदेखील झाली आहे, हे विशेष! इमिरात एअरलाइन्सने एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला सर्व प्रथम हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची  पहिली कोविड-१९ / रक्त चाचणी घेत एक नवा आदर्श निर्माण केला. एप्रिल महिन्यामध्ये हे प्रवासी ट्युनेशिया देशाकडे रवाना झाले ते चक्क ‘इम्युनिटी पासपोर्ट’सह. अर्थात या  कल्पनेमुळे जगाच्या सर्व विमानतळांवर चाचणी (ऑन साइट) आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत, हे संकेत मात्र मान्य करण्यास हरकत नाही. कोरोनाच्या  निमित्ताने सोशल डिस्टन्सिंगबरोबर असे प्रमाणपत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, या उद्देशानेच नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेत यू. के. स्थित बिजागी यांनी चक्क ‘अ‍ॅप’ संकल्पना सुरू  केली आहे. या ‘अ‍ॅप’द्वारा संबधित व्यक्तीचा आरोग्यविषयक अहवाल जो मान्यताप्राप्त आरोग्य विभागाकडून संकलित करून क्यूआर कोडद्वारा क्षणात पडताळनी करणे सुलभ होणार  आहे. येणाऱ्या काळात भारतातही आधार कार्डला जर हे कोड / प्रमाणपत्र लिंक झाल्यास अतिशयोक्ती ठरू नये. त्यामुळे आज जी गंभीर समस्या गावागावांमध्ये, मजुरांची अंतर-राज्य  सीमा ओलांडताना ज्या समस्या प्रत्यक्ष पाहात आहोत, अशा वेळी सीमेवरील आरोग्य खात्यातील / पोलीस कर्मचाऱ्यांना हे वरदान ठरून –आधार कार्ड पडतालतना क्युआर कोडद्वारा  लागलीच योग्य ते निर्णय अर्थात ती व्यक्ती संक्रमित असल्याचा /नसल्याचा साक्षात पुरावा त्यांच्या हाती तात्काळ प्राप्त होणार आहे.

व्हॅलिडिटी-
एकदा का ‘इम्युनिटी पासपोर्ट’ प्राप्त झाला की पुढील प्रश्न उदभावतो, त्याच्या व्हॅलिडिटीचा (कालमर्यादेचा). हा संसर्गरोग नवा असल्यामुळे आजमितीला ठामपणे कोणीही त्याविषयी  भाष्य करत नाही, परंतु जसजसा कालावधी पुढे सरकेल आणि डाटा जनरेट होईल त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. तसेच टेस्टिंग किट कोणते वापरणार त्यावरही अवलंबून असणार आहे.  ज्याप्रमाणे आयएसआय मार्क उत्पादनाची मागणी असते तद्वत येत्याकाळात टेस्टिंग किटचे उत्पादक, मान्यता महत्त्वाची भूमिका बजावतील. तो पर्यंत ठोकताळे अंदाज अर्थात किमान  ६ महिने किंवा लक्षणे आढळल्यास लागलीच चाचणी हे निकष स्वीकारावे लागतील. आजमितीला मात्र लॉकडाउन शेवटच्या टप्प्यात असताना स्वताची काळजी स्वत: घेणे, अत्यावश्यक  असेल तरच घराबाहेर पडणे, सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, आणि आज ज्या काही सुविधा आहेत  त्याद्वारे मी आरोग्य /रोग प्रतिकारदृष्ट्या  सक्षम अर्थात सिबिल स्कोर  जसा अर्थविषयक ग्राह्य धरला जातो तसा ‘इम्युनिटी’ स्कोर सशक्त करणे ही काळाची गरज असणार आहे.

– अस्लम जमादार
Mob.: 9225656766

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget