कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. कोरोनामुळे देशाची आर्थिक स्थिती मंदावली आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी आज (१२ मे) देशाच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेजची मोठी घोषणा केली आहे. या आर्थिक पॅकेज भारताच्या जीडीपीच्या १० टक्के इतके आहे. हे आर्थिक पॅकजे देशासाठी दिवसरात्र झटणाऱ्या मंजूर, कामगार, लघुउद्योग आणि शेतकरी यांच्यासह सर्व प्रकारच्या उद्योगाना चालणार देणार आहे. कोरोनाचे संकट इतके मोठे आहे की, सर्व परिस्थिती हदरुन केली आहे.
देशातील चौथ्या लॉकडाऊनची घोषणा १८ मेपूर्वी होणार असल्याचीही मोदींनी त्यांच्या संबोधनात सांगितले. मात्र, देशातील चौथ लॉकडाऊन हे नव्या रुप आणि नव्या स्वरुपात असल्याची कल्पना मोदींनी दिली आहे. देशातील विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांची काल (११ मे) चर्चा केल्यानंतर त्यांनी दिलेल्या कल्पनेनुसार चौथे लॉकडाऊन असल्याचे मोदींनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- नियमाचे पालन करून आम्ही कोरोनाशी लढणार आणि जिंकणार
- लॉकडाऊन ४ची घोषणा नवीन रंग नव्या स्वरुपात असणार, यांची माहिती १८ मेपूर्वी देण्यात येणार
- असंघटीत मजूर असो की संघटीत मजूर सर्वांसाठी आर्थिक पॅकेजमधून मदत केली जाईल
- अर्थमंत्र्यांकडून या पॅकेजची सविस्तर माहिती दिली जाईल
- देशातील शेतकऱ्यांसाठी आणि उद्योगांसाठी हे आर्थिक पॅकेज आहे
- २० लाख कोटींचे हे पॅकेज आत्मनिर्भर भारतासाठी गती देईल
- २० लाख कोटी २०२० सालात आत्मनिर्भर भारताला गती देणार, भारताच्या जीडीपीच्या १०टक्के कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी आहे
- करोना संकटाचा सामना करण्यासाठी नवीन संकल्पानुसार विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा
- अशा पायभूत सुविधा उभारू शकतो ज्या आधुनिक भारताची ओळख ठरतली
- आत्मनिर्भ भारत अभिनयान या आर्थिक पॅकेजी घोषणा करणार आहे.
- आपल्या देशाकडे आज साधन आहे. जगातील उत्तम बुद्धीमत्ता आहे. यामुळे आपण उत्तम साधनांचे उत्पानद आणि निर्मिती करू शकतो
- आत्मनिर्भर भारताचा संकल्प १३० कोटी जनतेने केला पाहिजे
- पीपीई किट्स आणि एन ९५ मास्क आता भारतात बनवले जात आहे. रोज लाखो मास्क आणि पीपीई किट्स बनवले जात आहेत
- विश्वायच्या कल्याणासाठी भारत चांगले काम करू शकतो, मोदींची विश्वास
- आत्मनिर्भर भारत म्हणजे संपूर्ण विश्वाची चिंता
- आत्मनिर्भर भारत हेच आपले उद्दष्टी आहे.
- कोरोनाच्या लढाईत आपला हार मानून चालणार नाही
- करोना संकटामुळे स्वावलंबी होण्याची भारताला संधी
- करोनाचं संकट अभूतपूर्व आहे. जगभरात जवळपास पाणेतीन लाख नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला आहे
- कोरोनापासून वाचायचे आहे आणि पुढेही जायाचे आहे.
- भारतात करोनामुळे झालेल्या मृत्युंवर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
- करोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. संपूर्ण जग करोनाशी लढत आहेत. भारतातही करोनाने अनेकांचे मृत्यू झाले आहेत.
Post a Comment