मुंबई
राज्यातील अकृषी विद्यापीठातील 32 लाख पैकी 25 लाख विद्यार्थ्यांच्या यावर्षीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार असून 7 ते 8 लाख विद्यार्थ्यांकडून नाराजीचा सूर उमटत आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत 20 जून रोजी आढावा घेण्यात येईल, यावेळी परीक्षांचा फेरविचार करु पण आता अभ्यास करा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
आपल्या राज्याने सर्वात प्रथम हालचाल करून 35 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सर्वात अगोदर घेतला आहे. राज्यातील विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या 32 लाख विद्यार्थ्यांपैकी 25 लाख विद्यार्थ्यांच्या या वर्षीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहेत. मात्र उर्वरित 7-8 लाख विद्यार्थी जे पदवीच्या अंतिम वर्षाला आहेत, त्यांच्यामधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागतील हे यूजीसीचे म्हणणे आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर पुन्हा एकदा समितीची बैठक होणार आहे. यावेळी आढावा होणार आहे. ज्या सत्राच्या परीक्षा होणार आहेत. त्या सर्व परीक्षांबाबत 20 जूनला आढावा घेण्यात येणार आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण समजू शकतो. या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना इतके सांगू शकतो की, उच्च व तंत्र शिक्षण अभ्यासक्रमांच्या परीक्षा या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच होतात. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शन आणि नियमानुसारच आम्ही या परीक्षा घेणार आहोत. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला या परीक्षांमुळे धोका आहे. ते बाधित होऊ शकतात, तर आम्ही त्यावेळी विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊ आणि या परीक्षांचा देखील फेरविचार करू. सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि भावनांशी खेळणार नाही, अशी ग्वाहीही उदय सामंत यांनी दिली.

Post a Comment