Halloween Costume ideas 2015

जमियत उलेमा ए हिंद, सांगली जिल्हा आणि मदनी चॅरीटेबल ट्रस्ट, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने एक अभुतपूर्व सामाजिक उपक्रम

सांगली
पवित्र रमजानच्या महिन्याची सुरुवात झाली आहे आणि जे आपल्या राहत्या घरी आहेत ते आपल्या कुटुंबासोबत सहरी व इफ्तारचा आनंद घेत आहेत. मात्र सध्यस्थितीत बर्याच लोकांना सकाळी लवकर सहरीची व्यवस्था होत नसलेने इच्छा असुनही रमजानचे पवित्र रोजे (उपवास) एक तर ठेवता येत नाहीत कींवा व्यवस्थित सहरी मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. आपल्या सांगली-मिरज नगरीची कीफायतशीर कीमतीत सर्वसामान्यांना परवडण्याजोगी आरोग्य सेवा देणारे एक महत्वपूर्ण केंद्र म्हणून इतकी मजबूत ओळख आहे की बरेचसे परदेशी नागरीक, विशेष करुन सौदी अरेबिया, दुबई, अबुधाबी, ओमान सारख्या अनेक आखाती देशातील लोक सुद्धा येथे आधुनिक आणि कीफायतशीर उपचार करवुन घेण्यासाठी येतात. पश्चिम महाराष्ट्र, कोकण तसेच गोवा आणि कर्नाटकच्या पेशंट्स व त्यांच्या नातेवाईकांनी आपली ही आरोग्य पंढरी नेहमी गजबजलेली असते.

याशिवाय सांगली नगरी हे शिक्षणाचे सुद्धा महत्वपूर्ण केंद्र मानले जाते त्यामुळे मिरज मेडीकल कॉलेज, वानलेस मिरज हॉस्पिटल, भारती वैद्यकीय कॉलेज व हॉस्पिटल, बरेचसे डेंटल, अॅग्रीकल्चरल, मॅनेजमेंट्स, आर्किटेक्चरल, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, विधी व फार्मसी कॉलेजेस तसेच वालचंद इंजिनिअरींग सारख्या जगात ख्यातीप्राप्त व नावाजलेले कॉलेज असो, इथे देश विदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांची सुद्धा भरपुर रेलचेल असते. यापैकी बर्याच लोकांना पवित्र रमजानचे रोजे म्हणजेच उपवास ठेवण्याची इच्छा असली तरी सहरीसाठी भोजनाची व्यवस्था नसलेने अडचणी निर्माण होत असतात, यामुळेच असे हॉस्टेलमध्ये अडकलेले विद्यार्थी असोत कींवा हॉस्पिटल मधे इलाजास्तव आलेले पेशंट्स कींवा त्यांचे #नातेवाईक असोत, हे सर्व लोक आपल्या जिल्ह्यात आपले पाहुणे आहेत असे समजून, मानवतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर व अग्रेसर असणाऱ्या #जमियतउलेमाएहिंद, सांगली जिल्हा अाणि मदनीचॅरीटेबल_ट्रस्ट, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने या गरजु लोकांना पहाटेच्या सहरी साठी भोजन उपलब्ध करुन देण्याचा एक अभुतपूर्व सामाजिक उपक्रम राबवला जात आहे.

त्यामुळे वस्तगृहात राहत असलेले परगावचे अविद्यार्थी बंधुभगिनी, हॉस्पिटलमधील पेशंट्स व त्यांचे नातेवाईक तसेच इतर गरजु_लोकांनी ट्रस्टच्या सहरीच्या व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी सहरीच्या आदल्या दिवशी सकाळी ११ वा. ते संध्याकाळी ६ वा. पर्यत आम्हास संपर्क साधून आपले पुर्ण नाव, पत्ता कळवावा म्हणजे आम्ही त्यांना सहरीच्या भोजनाचा डब्बा त्यांनी दिलेल्या पत्यावर वेळेवर घरपोच देण्याची व्यवस्था करु.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget