Halloween Costume ideas 2015

अल्पवयीन मुलींचा वडिलांच्या उपचारासाठी केडगाव ते पुणे प्रवास

वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू !

पुणे
१ एप्रिल रोजी केडगाव येथील रहीम अब्दुल शेख वय – ५५ यांची तब्यत बिघडल्याने वडिलांना पुणे येथे उपचारासाठी दोन अल्पवयीन मुलीने आणले. एकीचे वय १३ तर दुसरीचे १७ असे वय आहे. कोरोना संकटात कुठलीही मदत मिळत नसल्याने हतबल झालेल्या मुली घाबरल्या होत्या. त्यातच उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाल्याने दोघी मुली अतिशय भेदरल्या होत्या .अशातच तेथील काही कार्यकर्तांनी सदर घटना मूलनिवासी मुस्लिम मंच ला कळविली. मंच चे अंजुम इनामदार साबीर सय्यद आणि जमीर मोमीन यांनी तात्काळ दोघी मुलींना संपर्क करून धीर दिला. मंच अन्य कार्यकर्ते अमजद शेख इब्राहिम तोफखाना यांनी केडगाव येथे संपर्क साधला परंतु गावकऱ्यांनी मूलनिवासी मुस्लिम मंच च्या कार्यकर्त्यांना मृतदेह गावात आणू नये असे सांगून विरोध केला. केडगाव चे तलाठी व सामाजिक कार्यकर्ते पवार हे यांनी ससून येथे भेट देऊन मंच च्या कार्यकर्त्यांना मृतदेह पुण्यातच दफन करावा अशी विनंती केली. दरम्यान मयताचा पोस्टमार्टम रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आल्याने तलाठी सचिन काळे यांनी मुलींना स्वतः घरी एक आश्रय देऊन माणुसकीचे दर्शन घडविले व दुसऱ्या दिवशी मोठ्या मुलीच्या उपस्थित मूलनिवासी मंच च्या कार्यकर्त्यांनी ससून येथून मृतदेह ताब्यात घेऊन बागेरहमत कब्रस्थान मध्ये दफनविधी करण्यात आला. मूलनिवासी मूस्लिम मंच चे अंजूम ईनामदार, न्यु तिरंगा फौडेशन चे जमिर मोमिन, अमजद शेख, शाबीर तोफखाना शेख ईब्राहीम, भारतीय एकता महामोर्चा चे शाबीर सैयद हे सध्या कोरोना संकटात दुःखाचे ढग अधिक गडद होत असताना माणुसकीचे दर्शन घडवत समाजासमोर आदर्श निर्माण करत आहे. सलाम त्यांचं कार्याला.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget