Halloween Costume ideas 2015

राज्यभरात आतापर्यंत १० हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई 
राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार २९७ झाली आहे. आज २२५० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६७९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १० हजार ३१८७रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार ५८१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ०७ हजार ७२ नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ७७५जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३९ हजार २९७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ०४ हजार ६९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २६ हजार ७५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ६५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १३९० झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४१, पुण्यात १३, नवी मुंबईमध्ये ३, पिंपरी- चिंचवड -२, सोलापूरात २, उल्हासनगरमध्ये २, तर औरंगाबाद शहरात २ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४६ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३२ रुग्ण आहेत तर ३१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २ जण ४० वर्षांखालील आहे. या ६५ रुग्णांपैकी ४८ जणांमध्ये (७४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील कोरोना बाधितांची  आकडेवारी

    मुंबई – २४,११८ (८४१)
    ठाणे  ३०९ (४)
    ठाणे मनपा –  १८६५ (३३)
    नवी मुंबई मनपा – १५९३ (२७)
    कल्याण डोंबिवली मनपा – ६१२ (६)
    उल्हासनगर मनपा – १३०
    भिवंडी निजामपूर मनपा – ७४ (३)
    मीरा भाईंदर मनपा – ३१७ (४)
    पालघर – ६८ (३)
    वसई विरार मनपा – ४०७ (११)
    रायगड – २७९ (५)
    पनवेल मनपा – २५३ (११)
    ठाणे मंडळ एकूण – ३०,०२५ (९५०)
    नाशिक – १०५
    नाशिक मनपा – ८२ (२)
    मालेगाव मनपा – ६८१ (३४)
    अहमदनगर – ४६ (५)
    अहमदनगर मनपा – १८
    धुळे – १३ (३)
    धुळे मनपा – ७१ (६)
    जळगाव – २३३ (२९)
    जळगाव मनपा – ७० (४)
    नंदूरबार – २५ (२)
    नाशिक मंडळ एकूण – १३४४ (८५)
    पुणे – २३५ (५)
    पुणे मनपा – ४०४९ (२१५)
    पिंपरी चिंचवड मनपा – १९३ (६)
    सोलापूर – १० (१)
    सोलापूर मनपा – ४९५ (२६)
    सातारा – १७० (२)
    पुणे मंडळ एकूण – ५१५२ (२५५)
    कोल्हापूर – १२० (१)
    कोल्हापूर मनपा –  १९
    सांगली – ४९
    सांगली मिरज कुपवाड मनपा – ८ (१)
    सिंधुदुर्ग – १०
    रत्नागिरी – ११६ (३)
    कोल्हापूर मंडळ एकूण – ३२२ (५)
    औरंगाबाद -१६
    औरंगाबाद मनपा – १०६६ (३६)
    जालना – ३८
    हिंगोली – १०७
    परभणी – ६ (१)
    परभणी मनपा – ३
    औरंगाबाद मंडळ एकूण – १२३६ (३७)
    लातूर – ४७ (२)
    लातूर मनपा – ३
    उस्मानाबाद – ११
    बीड – ५
    नांदेड – ९
    नांदेड मनपा – ७१ (४)
    लातूर मंडळ एकूण – १४६ (६)
    अकोला – २९ (२)
    अकोला मनपा – २८१ (१५)
    अमरावती – ८ (२)
    अमरावती मनपा – ११५ (१२)
    यवतमाळ – १०२
    बुलढाणा – ३४ (३)
    वाशिम – ८
    अकोला मंडळ एकूण – ५७७ (३४)
    नागपूर – २
    नागपूर मनपा – ४२१ (६)
    वर्धा – ३ (१)
    भंडारा-  ७
    गोंदिया  – ३
    चंद्रपूर – १
    चंद्रपूर मनपा – ४
    गडचिरोली – ६
    नागपूर मंडळ एकूण – ४४७ (७)
    इतर राज्ये – ४८ (११)
    एकूण – ३९ हजार २९७ (१३९०)
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget