Halloween Costume ideas 2015

समाज सुधारणेसाठी सर्वाचा सहभाग महत्त्वाचा

करोनाच्या काळात ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यांमध्ये कधी नव्हे येवढा मुस्लिम समाज एकवटण्याचा प्रयत्न करू लागला आहे.... कोरोनाने अगदी फळविक्रेत्यापासून ते अति-श्रीमंत उद्योजक सर्वांना एक महत्त्वाचा जणू मंत्रच दिला आहे तो त्याच्या अस्तित्वाचा. गरीब-श्रीमंत, जात-धर्म, लिंगभेद या सर्व बाबींना छेद देऊन कशा प्रकारे पृथ्वीतलावर मानवजातीने राहावयास हवे हे जणू त्याने या निमित्ताने शिकवले आहे.
उद्याचा दिवस मी जीवित असेन का? याची खात्री आजच्या घडीला न गरीब देशातील नागरिक देऊ शकतो न अमेरिकेसारख्या प्रगत देशातील नागरिक. म्हणूनच आज जीवित आहे तो पर्यंत मी समाजाचे देणे लागतो, या भावनेतून काय करता येऊ शकेल का? यासाठी प्रयत्नांची मोठी गरज भासू लागली आहे.
जीवनात यश प्राप्त करण्यासाठी आव्हानांचा सामना हा करावाच लागतो. मात्र त्यासाठी हवी मोठी मेहनतीची मनीषा अन् थोडीफार नशिबाची साथ. खरेच आहे... आज मात्र आम्हा युवकांना मेहनत, कष्ट नको केवळ फळाची अपेक्षा या सोशल मीडियाच्या जमान्यात करू लागले आहेत अन् यश मिळत नाही म्हणून स्वत:च्या नशिबाला आणि इस्लाम धर्मात जन्माला आलो म्हणून मुस्लिम असण्याला दोष देण्यात काय अर्थ आहे?
आता या काही सद्य:स्थितीत यशस्वी विराजमान असलेल्या मुस्लिम उद्योजकांची यशोगाथा आपण पाहू या...
१. अजीम प्रेमजी- जन्म २४ जुलै, १९४५. प्रसिद्ध ‘विप्रो’चे संस्थापक. स्टेंफोर्ड विद्यापीठ अमेरिका येथून विद्युत अभियांत्रिकीची पदवी, १९ बिलियन डॉलर्सची संपत्ती. भारत सरकारने पद्म पुरस्काराने नवाजले. आयटीचा बादशाह म्हणून संपूर्ण विश्वभर ख्याती. आजपावेतो पाच लाख कोटी संपत्ती समाजाला सढळ हाताने दान. ही संपत्ती आजपासून -दररोज १ कोटी रु. दान करायचे ठरविले तरी त्यांना तब्बल ५०० वर्षांहून अधिक काळ वेळ व्यर्थ करावा लागेल. याहून त्यांची संपत्ती आणि दानशूरपणाची श्रेष्टता दिसून येते.
२. यूसुफअली मुसलियम अब्दुर कादर (एम ए यूसूफअली)- जन्म १५ नोव्हेंबर, १९५५. संस्थापक- लुलु ग्रुप इंटरनॅशनल, पंचतारांकित हॉटेल / मॉलचे सर्वेसर्वा. भारत, मलेसिया, आखाती देशांत १५० हून अधिक हॉटेल्स नावावर. ५.२ बिलियन डॉलर्स संपती, स्वत:ची बँक, पद्म पुरस्कार २००८ प्राप्त. ऑगस्ट २००८ मध्ये केरळ पूरग्रस्तांसाठी कोट्यवधी रुपयाची मदत.
३. यूसुफ खाजा हमीद- जन्म २५ जुलै, १९३६. ‘सिप्ला’चे संस्थापक. २००५ मध्ये पद्मभूषण प्राप्त. २.७ बिलियन डॉलर संपत्ती, अनेक महत्त्वपूर्ण औषधे, लसींचा शोध, कॅन्सरपीडितांसाठी मोफत औषधोपचार आणि सेवा पुणे वारजे येथील प्रकल्पामध्ये. भारतीय शास्त्रज्ञ. पैसा कमविणे हा उद्देश नव्हे सेवा म्हणून या महाराष्ट्रीयन मुस्लिमाची जगभर ख्याती.
४. डॉ आझाद  मूपेन- जन्म २८ जून, १९५३. केरळ. १९८२ मध्ये डॉक्टर लेक्चरर म्हणून करियरला  सुरुवात, १९८७ साली एका छोट्या क्लिनिकपासून सुरुवात. आज ४०० हून विविध हेल्थ केयर सेंटर्स ८ हून अधिक देशांत यशस्वी कार्यरत. १.४ बिलियन डॉलर्स संपत्ती. वैज्ञानिक अद्ययावत प्रयोगशाळा. २०११ मध्ये भारत सरकारद्वारा पद्म पुरस्काराने सन्मानित.
५. हबील खोराकीवला- संस्थापक, अध्यक्ष व्होकार्ड. १९६० साली व्होकार्ड या औषधनिर्माण कंपनीची स्थापना. विशेषता जेनेरिकमध्ये यशस्वी नाव, आजपावेतो १० कोटींहून अधिक लोकांचे प्राण वाचविण्याचे श्रेय. आजपासून दररोज १० लाख रु. दान करायचे ठरविले तरी त्यांना तब्बल ५०० वर्षांहून अधिक काळ संपत्ती दान करण्यात आपला वेळ व्यर्थ करावा लागेल. याहून त्यांची संपत्ती आणि दानाची श्रेष्टता स्पष्ट होते.
वरील पाचही व्यक्ती केवळ मुस्लिमांचेच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला भूषणावह आहेत. अजीम प्रेमजी, सिप्लाचे यूसुफ हमीद, व्होकार्डचे हबील खोराकीवला यांची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे. उच्चविद्याभूषित, आंतरराष्ट्रीय    विद्यापीठामध्ये शिक्षण पण कुठलाही गर्व, मत्सर याचा लवलेशही रक्तात नाही. अन् प्रसिद्धीसाठी तर मुळीच नाही. सिप्ला आणि वोखरडूत या नामवंत औषधनिर्माण वंâपन्या या मुस्लिम बुद्धिजीवींनी स्थापन करून आज कित्येक वर्षे योगदान देत आहेत.
खरेच आहे, खरा तो मुस्लिम जो आपले दान उजव्या हाताचे डाव्या हाताला कळू देत नाही.
वरील आदर्श मुस्लिमांनी विशेषता युवावर्गाने डोळ्यांसमोर ठेवून जीवनात ध्येय बांधले पाहिजेत. येणाNया काळात समाजाला एक-दोन नव्हे शेकडो-हजारो अजीम, यूसुफ हमीद, हबील यांची देशाला गरज आहे. त्यासाठी तरुणांनी आतापासूनच पुढे यावयास हवे अन् समाजानेही जिथे गरज आहे तिथे आर्थिकदृष्ट्या मदतीसाठी सरसावले पाहिजे. याबरोबरच संपूर्ण देशातून एमपीएससी / यूपीएससी सारख्या स्पर्धेत सहभागी अन् उत्तीर्ण होणाNयांचे प्रमाण यावरही लक्ष्य वेंâद्रित करावयास हवे. दर वर्षी किमान २००-२५० समाजातून आयएएस बनण्याचे उद्दिष्ट जर पूर्ण करू शकलो तर त्याचे पडसाद पुढील ८-१० वर्षांत दिसू शकतील. समाज शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण होऊ शकेल.
कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात संवाद-संभाषण, मीटिंग्स, प्रशिक्षण अशा अनेक उद्दिष्टांसाठी झूम-मीटिंग हा पर्याय सोशल डिस्टन्सिंगमुळे पुढे आला आहे नव्हे भावी काळात ती काळाची गरज असणार आहे. घरबसल्या किमान १०० जणांशी संपर्क साधण्याची ही किमया आणि तंत्र आता सर्वांनी अवलंबले पाहिजे. केवळ कॉर्पोरेटच नव्हे तर समाजातील एनजीओंनी, वृतपत्रामध्ये लिखाण करणारे संपादक- लेखक- पत्रकार- वाचक या गटाने, बुद्धिजीवी ज्या त्या गावातील वर्गाने, एवढेच काय तर मशिदीतील मौलाना आणि कमिटीनेदेखील याचा स्वीकार करावयास हवा. थोडक्यात नवीन तंत्रज्ञान दीन-दुनिया सर्वांसाठी आवश्यक.
सामाजिक एकोप्याची ही बाब सध्या क्षणिक, तात्कालिक राहाता कामा नये. काही उद्दिष्टांसाठी प्रथम सर्व जण एकत्र येतात. त्यानंतर मानापमान, स्वार्थ सुरू होतो. संघटनेचे काम कुठे स्थिरावत असताना ती मोडकळीस निघते, असे होता कामा नये. गेल्या ३०-३५ वर्षांच्या माझ्या अनुभवात अशा अनेक घटनांची नोंद माझ्या सर्वेक्षणात आहे. हे कदापि यापुढे होता कामा नये, अशी अपेक्षा.
समाजाला आज अवहेलनेपेक्षा, समाजाच्या उभारणीसाठी प्रत्यक्ष सहभाग, मार्गदर्शन अन् कृतीची खNया अर्थाने गरज आहे. मुस्लिमांचे चार विवाह आणि २५ मुले हा आक्षेप कालबाह्य आहे. त्यात तथ्य नसल्याचे मुस्लिमेतरदेखील मान्य करू लागले आहेत. परंतु काही मुस्लिम संस्था, विचारवंत म्हणवून घेणारे तसेच काही पुरोगामी मुस्लिम मात्र या बाबीच्या सत्यता सिद्धतेत कमी पडतात. हे दुर्देव म्हणावे लागेल. त्यामुळे नेहमीच मुस्लिम समाजाचे नकारात्मक चित्र उमटत जाते.
ज्या काही संघटना जुन्या आहेत, २०-२५ वर्षांहून अधिक अनुभवी आहेत त्या संघटनांचे पुनरुज्जीवन करण्यात यावे. तसेच त्यात नवीन, विद्वान सदस्यांची निवड करण्यात यावी. नवीन संघटना, नवीन विचाराचे तरुण एकत्र येऊन समाज सुधारणेसाठी प्रयत्न करताना कम्युनिटी डेव्हलपमेंटचा निश्चित विचार करावा नव्हे ती काळाची गरज आहे.
इ. स. २००४ च्या ईदच्या निमित्ताने मी अन् जमात ए हिंद, पुणे शाखेचे इम्तियाज शेख हडपसर, पुणे येथे ज्येष्ठ विचारवंत अन् ज्यांना महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभला असे प्रा. प्रधान मास्टर यांना मराठी भाषांतरित कुरआन भेट देण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. ते नेहमी आम्हाला उपदेश करत की मुस्लिम समाजामध्ये खूप टॅलेंट आहे. आपण त्यांना बेटे म्हणू या. ही सर्व मला विखुरलेली पाहावयास मिळतात. ही सर्व बेटे एकत्र येण्याची नितांत गरज आहे, तरच समाज सुधारू शकेल. त्यांचा हा संदेश आजही तेवढाच महत्त्वपूर्ण वाटतो. खरेच, जेव्हा सर्व वर्ग (बेटे) एकत्र येऊन निस्वार्थीपणे समाज सुधारणेसाठी पावले टाकतील तो दिन सुदिन. अर्थातच तो दिन मुस्लिम समाजाच्या परिवर्तनाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदविला जाईल.

-अस्लम जमादार, मो.: ९२२५६५६७६६
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget