Halloween Costume ideas 2015

फकीर व गरिबांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाह म्हणेल, ‘‘हे आदमपुत्रा! मी तुला जेवण मागितले होते परंतु तू मला जेऊ  घातले नाही.’’ तेव्हा तो म्हणेल, ‘‘हे माझ्या पालनकत्र्या! तू सर्व लोकांचा पालनहार आहेस, तर मग मी तुला कसे बरे जेऊ घालीन?’’ अल्लाह म्हणेल, ‘‘तुला माझ्या अमुक दासाने जेवण मागितले  होते परंतु तू त्याला जेऊ घातले नाही, हे तुला माहीत नाही काय? जर त्याला जेऊ घातले असतेस तर जेऊ घातलेले अन्न तुमा माझ्यापाशी आढळले असते, हे तुला माहीत नव्हते काय?’’ अल्लाह  म्हणेल, ‘‘हे आदमपुत्रा! मी तुला पाणी मागितले होते, परंतु तू मला पाणी पाजले नाहीस.’’ तेव्हा तो म्हणेल, ‘‘हे माझ्या पालनकत्र्या! तू स्वत: जगाचा पालनकर्ता आहेस, तर मग मी तुला कसे  पाणी पाजू शकतो?’’ अल्लाह म्हणेल, ‘‘माझ्या अमुक दासाने तुला पाणी मागितले होते, परंतु तू त्याला पाणी पाजले नाहीस. जर तू त्याला पाणी पाजले असते तर ते पाणी तुला माझ्यापाशी आढळले असते.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
भुकेल्याला जेऊ घालणे आणि तहानलेल्याला पाणी पाजणे मोठे पुण्याचे काम आहे आणि यामुळे अल्लाहचे सान्निध्य लाभते.

माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही एखाद्याला पोटभर जेऊ घालणे हे उत्तम दान आहे.’’ (हदीस : मिश्कात)
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मागणाऱ्याला काही देऊन परतवून लावा, मग ते जळालेले खूर का असेना.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
गरीब, गरजवंत जर तुमच्या दरवाजात आला तर त्याला रिकाम्या हाती परत पाठवू नका. काही न काही त्याला द्या, मग ती अतिशय क्षुल्लक वस्तू का असेना.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी  सांगितले, ‘‘लोकांच्या दरवाजात चकरा मारणारा आणि अन्नाचे एक-दोन घास आणि एक-दोन खजूर घेऊन परतणाराच गरीब असतो असे नाही तर ज्याच्याकडे आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण  करण्याइतकी धन-संपत्ती नसेल तोदेखील गरीब आहे आणि त्याला दान देण्याइतपत त्याची गरिबी लोकांच्या लक्षात येत नाही आणि तो लोकांसमोर उभे राहून हात पसरतदेखील नाही. (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
या हदीसद्वारे लोकांना उपदेश देण्यात आला आहे की तुम्ही सर्वाधिक अशा गरिबांचा शोध घ्यायला हवा जे गरीब आहेत परंतु ते लाजेने व सज्जनतेमुळे आपली स्थिती लोकांना माहीत पडू देत  नाहीत आणि गरिबांसारखा चेहरा करून फिरत नाहीत आणि दुसऱ्यांसमोर हातदेखील पसरत नाहीत. अशा लोकांचा शोध घेऊन त्यांना मदत करणे मोठे पुण्याचे काम आहे. माननीय अबू हुरैरा  (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘विधवा व गरिबांसाठी धावपळ करणारा ज्या मनुष्यासमान आहे जो अल्लाहच्या मार्गात युद्ध करतो आणि त्या मनुष्यासमान आहे  जो रात्रभर अल्लाहपुढे उभा राहतो, थकत नाही आणि त्या रोजेदारासमान आहे जो दिवसा न खाता रोजे करतो.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget