आईवडील भिन्न जातिधर्माचे आहेत याकरिता त्यांची हत्या करण्यासाठी मुलांची माथी फिरविण्याचे काम एखादा पत्रकार किंवा वृत्तपत्र करते! मुले तर भोळीभाबडी असतात. कल्पना करा की एखादा पत्रकार प्रौढ लोकांना त्यांची पत्नी किंवा त्यांचा पती विशिष्ट जातिधर्माचा आहे म्हणून भडकवितो आणि ते तसे करतात. कल्पना करा हे शक्य आहे? होय! हे इतिहासात घडलेले आहे. १९९४ मध्ये एप्रिल ते जून दरम्यान रवांडातील भीषण नरसंहारात तेथील लाखो तुत्सी अल्पसंख्यकांना ठार करण्यात आले. या नरसंहारात ‘दहा धर्मादेश’ (टेन कमांडमेंट्स) नामक आदेशाने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. या आदेशाद्वारे बहुसंख्यक हुतू समुदायाला तुत्सी अल्पसंख्यकांविरूद्ध मोठ्या प्रमाणात भडकविण्यात आले. हा धर्मादेश एक वृत्तपत्र आणि अनेक रेडिओ स्टेशन्सवरदेखील प्रसारित करण्यात आला होता. त्या प्रसारणांमध्ये तुत्सी लोकांविरूद्ध जबरदस्त विष ओकले जात होते. परिणामत: येथे उसळलेल्या हिंसाचारात जवळपास आठ ते दहा लाख तुत्सी आणि उदारवादी हुतू नागरिक प्राणास मुकले. या नरसंहाराच्या चौकशीसाठी २००२ मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली. रवांडा सरकारच्या माजी अधिकाऱ्याने आंतरराष्ट्रीय न्यायालयात वृत्तपत्रे आणि रेडिओ स्टेशनांवर दहा धर्मादेशांच्या द्वेषमूलक प्रसारणाची बाजू मांडली. त्यांच्या मते या प्रसारणाचा वापर हुतू समुदायाच्या लोकांदरम्यान ऐक्याचा संदेश देण्यासाठी आणि प्रत्येक हुतूची लढाई एकच असल्याचे सांगण्यासाठी करण्यात येत होता. याच भावनेने प्रेरित होऊन अनेक लोकांनी आपल्या तुत्सी पन्तीची हत्या केली तर अनेक मुलांनी तुत्सी समुदायातून आलेल्या आपल्या आईवडिलांची हत्या केली. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने या प्रकरणी तीन पत्रकारांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायालयात सुनावणी सुरू असताना या पत्रकारांनी न्यायाधीशांवर पक्षपातीपणाची आरोप लावला होता. या खटल्यातील एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सादर केलेल्या कागदपत्रात म्हटले होते की क्रूरता, हत्याकांड, द्वेष, दासत्व आणि अन्याय तुत्सी समुदायाच्या लोकांची ओळख असल्याचे सामान्य लोकांच्या मनावर बिंबविण्याची आवश्यकता आहे. हिंसाचार भडकविण्यात या तिन्ही पत्रकारांची मोठी भूमिका होती. यांच्याद्वारे पसरविण्यात आलेल्या विषाने इतके भयानक रूप धारण केले होते की एक शेजारी दुसऱ्या शेजाऱ्यावर तुटून पडत होता आणि अनेकदा आईवडील आपल्या मुलांना हिंसा करण्यासाठी आपल्या मुलांना बरोबर घेऊन जात होते. कबरी अजून भरलेल्या नाहीत, सर्व जण (हत्येच्या) कामाला लागा, अशा प्रकारे रेडिओवर वारंवार सांगण्यात येत होते. वृत्तपत्रांनी अनेक वर्षांपासून सुनियोजित पद्धतीने तुत्सी समुदायाविरूद्ध द्वेष पसरविला होता. रवांडातील नरसंहाराची पार्श्वभूमी आणि तयारीच्या बाबतीत आपण जाणून घेतले पाहिजे. त्यामध्ये अशा अनेक गोष्टी सापडतील ज्या कस्रfचत आज आम्हाला आपल्या जवळपास दिसून येतील. सध्या भारतीय प्रसारमाध्यमांमध्येही अनेकदा तत्कालीन रवांडातील माध्यमांची झलक आढळून येते. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील दंगलींमध्ये मुस्लिमांना मारण्यात येत होते त्या वेळी ‘या घटनेमुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही आणि आम्ही इतिहासात घडलेल्या हिंदूच्या हत्येची आठवण करायला हवी,’ असे सांगण्याचा प्रयत्न अनेक फेकू वृत्तवाहिन्यांचे तथाकथित पत्रकार करीत होते. या काही वर्षांमध्ये भारतीय प्रसारमाध्यमांनी फेक न्यूजच्या आधारे फक्त सांप्रदायिकतेचा ध्वजच हातात घेतला नाही तर त्याद्वारे अनेक सामान्यजन प्रोत्साहित होताना दिसत आहेत. जनतेला वारंवार हे सांगण्याचे प्रयत्न केला जात आहे की त्यांची समस्या रोजगार, शिक्षण, आरोग्या आणि विकास नसून त्यांच्यासाठी सर्वांत मोठे आव्हान लव्ह जिहाद आणि इस्लामिक राष्ट्र बनविण्यासारख्या षङ्यंत्र हाणून पाडण्याचे आहे. वृत्तवाहिन्यांवरील चर्चेच्या नावाखाली मुस्लिमांविरूद्ध मोठ्या प्रमाणात द्वेषभावना पसरविल्या जात आहेत. सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीच्या कचाट्यात सापडले असून त्यावर उपाय शोधण्याच्या प्रयत्नात आहे, तर इकडे मात्र भारतीय प्रसारमाध्यमे अल्पसंख्यकांना लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या भारतात तेच सर्व दिसत आहे जे रवांडातील प्रसारमाध्यमे करीत होती. जसे तेथे तुत्सी समुदायातील लोकांना लक्ष्य बनविले गेले होते तसेच येथे आज मुस्लिमांना टार्गेट केले जात आहे. जर माध्यमांचे मालक आणि पत्रकारांची इच्छा नसती तर रवांडाचा नरसंहार इतका भयानक झाला नसता. आज रवांडा आणि तेथील प्रसारमाध्यमे झाल्या प्रकारावर पश्चात्ताप व्यक्त करीत आहेत. रवांडासारखी चूक दुसऱ्या एखाद्या देशाने करू नये, आपण तशी फक्त आशाच बाळगू शकतो. सरकारचे मुखपत्र बनलेल्या या वृत्तवाहिन्यांद्वारा पसरविण्यात आलेल्या द्वेषभावनेमुळेच आज मॉब लिंचिंग आणि ठिकठिकाणी होत असलेल्या सांप्रदायिक दंगली आपणास सामान्य वाटत आहेत. भारतीय पत्रकारिता आज रवांडाच्या त्या क्रूर खुनी माध्यमांच्या किती जवळ आली आहे हे समजणे आपल्यासाठी तितके अवघड नाही.
- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
Post a Comment