Halloween Costume ideas 2015

शहरी नागरीकांमुळे कोरोना गावांमधे पसरण्याची भीती लोकांच्या मनात

मुंबई
आंतरजिल्हा एसटी सेवेचा निर्णय टप्प्याटप्याने घेऊ, ग्रीन-ऑरेंज झोन जिल्ह्यात बाहेरून नागरिकांना पाठवू नये. मुंबई आणि पुणे बाहेरून कोरोना गावी येईल अशा भीती लोकांच्या मनात आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांना दिली आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर या जिल्ह्यातून मानसे पाठवू नका, राज्याच्या इतर जिल्ह्यात कोरोना पसरवू नका, अशा तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. लोकांच्या मनातील कोरोनाची भीती आणि मुंबई आणि पुणे बाहेरून कोरोना गावी येईल अशा भीती लोकांच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा एसटी सेवेचा निर्णय टप्प्याटप्याने घेऊ, असे अनिल परब यांनी आज (११ मे) प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

तसेच “राज्यातील कंटेनमेंटमधील लोकांना प्रवासाची परवानी दिलेली नाही,” अशी माहितीही परब यांनी दिली आहे. “राज्यातील ग्रीन आणि ऑरेंज झोन जिल्ह्यात बाहेरून जे लोक आले. त्या लोकांना कोरोनाची लागण झाली. यामुळे  मुंबई आणि पुणे बाहेरून कोरोना गावी येईल अशा भीती लोकांच्या मनात आहे. यामुळे आंतरजिल्हा एसटी सेवेचा निर्णय रद्द केला असून आंतरजिल्हा एसटी सेवेचा निर्णय टप्प्याटप्याने घेऊ,” असे अनिल परब यांनी सांगितले आहे. जे परराज्यातील लोक पायी चालत जात आहे. त्यांना एसटीबसच्या माध्यमातून त्यांच्या राज्यातीच्या सीमेपर्यंत सोडण्यात येण्यासाठी बस उपलब्ध केल्या आहे.
एका दिवसात ५ हजार लोकांना परराज्याच्या सीमेवर सोडले

जे लोक परराज्याच्या सीमेवर जाऊ इच्छितात, त्यांना आजही एसटीचा प्रवास मोफत आहे. जे लोक आपल्या गावी पायी जात आहेत. त्या लोकांना परराज्याच्या सीमेवर सोडले आहे. काल (१० मे) एका दिवसात २५० ते ३०० बसेस ने ५ हजार लोकांना परराज्याच्या सीमेवर सोडले आहे. आणि ३ हजार प्रवास परराज्याच्या सीमेवर आणून त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात सोडली, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.  शहरात अडकलेल्या लोकांची आम्हला काळजी आहे. नागरिकांनी बस डेपोवर गर्दी करू नये, असे आवाहनही अनिल परब यांनी लोकांना केल्या आहेत.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget