Halloween Costume ideas 2015

विद्यार्थी नेत्यांच्या अटकेमुळे दिल्ली पोलिसांची प्रतीमा मलीन झाली आहे : इंजि. सलीम

Delhi Police
दिल्ली
जमाअते इस्लामी हिंदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. सलीम इंजिनिअर यांनी सीएए, एनआरसीमधील विद्यार्थी नेत्यांच्या अटकेचा जोरदार शब्दात निषेध केलेला आहे. जे तरूण सीएए विरोधी आंदोलनामध्ये सामील होते. त्यांच्या अटकेच्या विरोधात बोलतांना सलीम इंजिनिअर यांनी सांगितले की, आम्ही पोलिसांच्या या कृतीचा तीव्र निषेध करतो. पोलिसांनी विद्यार्थी नेत्यांना युएपीए आणि देशद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक केलेली आहे. विशेष करून सफुरा जर्गर या जामियाच्या गर्भवती विद्यार्थीनीच्या अटकेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. दिल्ली पोलिसांची ही कारवाई पूर्वग्रह दुषित, अमानवीय आणि वाईट उद्देशाने प्रेरित आहे. आम्ही गृहमंत्रालयाकडे असा आग्रह करतो की, त्यांनी दिल्ली पोलिसांना कारवाई करताना तारतम्य बाळगण्याच्या सूचना द्याव्यात.
    प्रा. सलीम इंजि. पुढे म्हणाले की, आज देशभरात संपूर्ण लॉकडाऊन असून, देशातील लोक एकजुटीने कोविड-19 च्या विरोधात यशस्वी लढा देत आहेत. त्यामुळे देशात एकमेकांना सहकार्य करण्याची आणि एकमेकांवर विश्‍वास ठेवण्याची भावना वृद्धींगत होत आहे. अशा परिस्थितीचा दिल्ली पोलिसांनी गैरफायदा उचललेला आहे. सर्वात आश्‍चर्यजनक बाब म्हणजे सीएएचा विरोध करणार्‍या विद्यार्थी नेत्यांना दिल्लीमध्ये झालेल्या जातीय दंगलीमध्ये जबाबदार म्हणून निरूपित करण्यात आलेले आहे. ही फार भयानक बाब आहे. आणि हीच गोष्ट दिल्ली पोलिसांच्या निष्पक्षपणावर प्रश्‍नचिन्ह उभे करते.            
दूसरीकडे हेच दिल्ली पोलीस आहे ज्यांनी सत्ताधारी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना साधी विचारपूस सुद्धा केलेली नाही. ज्यांनी दिल्लीमध्ये दंगे भडकाविण्यासाठी चिथावणीखोर भाषणे दिलेली होती. तसेच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्व दिल्लीमध्ये नियोजित हल्ले घडवून आणले होते. अशा संवेदनशील काळामध्ये पोलिसांचे असे एकतर्फी वागणे देशात चुकीचा संदेश देत आहेत. आम्ही केंद्र सरकार आणि दिल्ली पोलीस वरिष्ठ अधिकार्‍यांकडून अशी अपेक्षा करतो की त्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून पोलिसांना अन्यायपूर्ण आणि भेदभावपूर्ण कारवाई करण्यापासून रोखावे. जमाते इस्लामी हिंद सफुरा जर्गर आणि तिच्यासोबत अटक केलेल्या इतर विद्यार्थी नेत्यांच्या तात्काळ सुटकेची मागणी करते.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget