Halloween Costume ideas 2015

देशभरात 17 मेपर्यंत लॉकडाऊन

भारतातील लॉकडाऊन आणखी 2 आठवड्यांसाठी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. आता देशभरात 17 मेपर्यंत लॉकडाऊन राहील.

गृहमंत्रालयानं याबाबतचं पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

या लॉकडाऊनच्या काळातील मार्गदर्शक सूचनाही मंत्रालयानं जाहीर केल्या आहेत.

केंद्र सरकारच्या नव्या सूचना -
1. दोन आठवड्यांनी लॉकाडऊन वाढवला. आता 17 मेपर्यंत लॉकाडाऊन.
2. ऑरेंज आणि ग्रीन झोनमधल्या जिल्ह्यांमध्ये अनेक गोष्टींसाठी सूट मिळणार.
3. ग्रीन झोन म्हणजे जिथं कोरोनाची एकही केस नाही किंवा गेल्या 21 दिवसांत नवी केस आली नाही.
4. संपूर्ण देशात रस्त्यांवरून, रेल्वेने, मेट्रोने आणि विमानांनी वाहतूक बंद राहणार.
5. सर्व झोन्समध्ये या गोष्टी बंदच राहतील - शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, हॉटेल, थिएटर, मॉल, जिम, क्रीडा संकुल, सामाजिक/राजकीय/सांस्कृतिक समारंभ.
6. सर्व झोन्समध्ये मंदिर, मशिदी, चर्चे, इत्याही प्रार्थनास्थळं लोकांसाठी बंद असतील.
7. विमान, रेल्वे आणि रस्त्याने प्रवासाची परवानगी फक्त काही विशिष्ट कामांसाठी केंद्रीय गृह मंत्रालय देईल.

8. सर्व झोन्समध्ये 65 वर्षांपेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्ती, आजरी व्यक्ती, गरोदर स्त्रिया आणि 10 वर्षांखालची मुलं घराबाहेर पडणार नाहीत. ते केवळ वैद्यकीय कारणांसाठी घर सोडू शकतात.
9. सर्व झोन्समधल्या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभाग (OPD) सुरू ठेवता येईल. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील.
10. कंटेनमेंट झोनमध्ये मात्र OPD सुरू ठेवता येणार नाहीत.
11. रेड झोनमध्ये खालील गोष्टींना परवानगी नाही - रिक्षा, सायकल रिक्षा, टॅक्सी, कॅब, बसेस, सलून, स्पा.
12. रेड झोनमध्ये मोजक्या कारणांसाठी वाहनांतून प्रवास करता येईल. एका चारचाकी गाडी ड्रायव्हर वगळता केवळ दोनच व्यक्ती प्रवास करू शकतील. दुचाकीवर केवळ एकच व्यक्ती प्रवास करू शकेल.
13. SEZ आणि औद्योगिक वसाहतींमध्ये काम करण्यास परवानगी. अत्यावश्यक गोष्टींचं उत्पादन करणारे उद्योग, औषधांचे उद्योग, त्यांना कच्चा माल पुरवणारे उद्योग, IT हार्डवेअर उद्योग, तागाचा उद्योग यांना काम करण्याची परवानगी, पण ते करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार.
14. शहरांतल्या बांधकामांना आणि अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांच्या बांधकामांना परवानगी आहे, पण कामगारांना साईटवरच राहावं लागेल

15. सर्व छोटी आणि रहिवाशी भागातली एकल दुकानं उघडता येणार. मॉल किंवा शॉपिंग काँप्लेक्स किंवा बाजारातल्या केवळ अत्यावश्यक दुकानांनाच परवानगी.
16. रेड झोनमधल्या ग्रामीण भागात सर्व बांधकामांना परवानगी. मनरेगा, वीटभट्ट्यांना परवानगी. ग्रामीण भागात सर्व दुकानं उघडता येणार, केवळ शॉपिंग काँप्लेक्समध्ये निर्बंध असतील.
17. शेतीशी संबंधित सर्व गोष्टींना परवानगी. शेतीमालाच्या विक्रीलाही परवानगी. मासेमारीला आणि पशुसंवर्धनाशी संबंधिक सर्व गोष्टींना परवानगी.
18. आर्थिक क्षेत्र खुलं राहणार - बँका, NBFC कंपन्या, विमा आणि भांडवली बाजार, सहकाही संस्था सुरू राहणार.
19. लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी, गरिबांसाठी, महिलांसाठी आणि विधवांसाठी काम करणाऱ्या संस्था सुरू राहणार. अंगणवाड्या सुरू राहणार.
20. टपाल आणि कुरिअर सेवा सुरू राहणार. वीज, पाणी, सफाई, टेलेफोन आणि इंटरनेट सेवा सुरू राहणार.
21. रेड झोनमधले मीडिया, IT कॉल सेंटर, कोल्ड स्टोरेज, खासगी सुरक्षा सेवा सुरू राहणार.
22. ऑरेंज झोनमध्ये टॅक्सीला परवानगी. पण गाडीत एक ड्रायव्हर आणि एक प्रवासीच बसू शकणार.
23. एका जिल्हातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी विशिष्ट कामांसाठीच मिळणार
24. ग्रीन झोनमध्ये बसेस चालू शकतात, पण बसमध्ये 50 टक्के क्षमतेनेच लोक बसू शकतील.
25. माल वाहतुकीला सरसटक परवानगी आहे.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget