Halloween Costume ideas 2015

दारुविक्रीची दुकानं सुरू करण्याच्या निर्णयावर खासदार इम्तियाज जलील यांची टीका

औरंगाबाद 
 उद्धवजींच्या कामाची आम्हीही तारीफ करत होतो. पण आता सगळं वाया गेलं, असं म्हणत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दारूची दुकानं सुरू करण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. रेड झोनमध्येही दारूची दुकानं चालू केली जात असतील, तर लिकर लॉबीच्या हातून मोठा पैसा एक्स्चेंज झाला असला पाहिजे, असं म्हणत त्यांनी ट्विटरवर निषेधाची राळ उडवून दिली आहे.

''रेडझोनमधले आमदार, खासदार या मृत्यूच्या खेळाला परवानगी कशी देऊ शकतात? कदाचित तेही 'बेवडे'च असले पाहिजेत,'' अशा कठोर शब्दांत त्यांनी ट्विट केले आहेत. दारूच्या दुकानाबाहेर रांगा लावणाऱ्यांची रेशन कार्डे जप्त करा, अशी सरकारला विनंती करतो. त्यांना सरकारी रेशनची गरज नाही. जर ते दारू खरेदी करू शकत असतील, तर ते अन्नही विकत घेऊ शकतात. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाची लाज वाटते, असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

‘सरकारनं रेड झोनमध्येही दारुची दुकानं उघडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जर औरंगाबादमधली मद्यविक्रीची दुकानं उघडली गेली, तर आम्ही लॉकडाऊनचे सर्व नियम तोडू आणि ही दुकानं जबरदस्तीनं बंद करायला भाग पाडू. आम्ही बर्‍याच महिलांना रस्त्यावर येण्यास सांगू. दारु विक्री करुन आपल्या आई-बहिणींसाठी समस्या निर्माण करण्याची ही वेळ नाही,’ असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटर संदेशाद्वारे दिला होता.

दारूची ही दुकानं महिलांसाठी मोठी समस्या आहे, त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. माझ्या मोलकरणीचा नवरा दारुच्या नशेत घरी आल्यावर रोज तिला मारहाण करतो. या कठीण काळात दारु विकण्याची इतकी घाई का आहे? असंच असेल, तर सगळीच दुकाने सुरु करा, केवळ दारुच्या दुकानांनाच विशेष सूट का, असा सवालही इम्तियाज जलील यांनी केला होता.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget