Halloween Costume ideas 2015

व्हेंटिलेटर : जीवरक्षक उपकरणाचे सत्य समोर येणे गरजेचे

जागतिक कल बघायला गेलो तर कोव्हिड-19ने ग्रस्त प्रत्येक 6 रुग्णांपैकी एकजण गंभीर स्थितीत जात आहे, ज्यामध्ये शसनाच्या त्रासाचा समावेश असू शकतो. काही देशांमध्ये अशा रुग्णाची  संख्या इतकी वाढली आहे की कोणावर पहिले उपचार करायचे अशी अवघड स्थिती डॉक्टरांवर ओढवली आहे. कोरोना व्हायरसने सर्व जगाला ग्रासलेले असताना, व्हेंटिलेटरचा वापर ही असंख्य  लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वांत प्रभावी पद्धती म्हणून पुढे आली आहे. अतिदक्षता विभागातील तातडीच्या उपचार प्रक्रिया, त्यातील गुंतागुंत, विशेष करून आर्टिफिशिअल व्हेंटिलेशन (कृत्रिम श्वसन यंत्रणा) या बाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यामुळेच व्हेंटिलेटर म्हणजे काय? त्याविषयीचे गैरसमज दूर करून त्याविषयी जाणून घेणे आजच्या घडीला महत्त्वाचे आहे.

व्हेंटिलेटर म्हटलं की सर्वसामान्यांचा मनात धास्तीच भरते. अगदी सर्व प्रयत्न संपले म्हणून आपल्या माणसाला आता व्हेंटिलेटर लावला आहे असे अतिदक्षता विभागाच्या बाहेर काळजीत पडलेल्या  नातेवाइकांचा समज होतो. आपले माणूस कदाचित आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि आता यातून बाहेर निघणे अवघड आहे, असे देखील बऱ्याच जणांना वाटते. म्हणूनच व्हेंटिलेटर  म्हणजे काय, त्याचा वापर का आणि कधी केला जातो, थोडक्यात त्याचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे.
सध्या कोव्हिड-19ने जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे आणि या काळात दोन गोष्टी आरोग्यसेवेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत ‘मास्क’ आणि ‘व्हेंटिलेटर’. विशेष करून नकोसे वाटणारे  व्हेंटिलेटर हे वैद्यकीय उपकरण आता काळाची गरज, रुग्णांसाठी वरदान, विेशासू साथी आणि सुरक्षा कवच म्हणून ओळखले जाऊ लागले आहे . कल्पना करा की एखादी व्यक्ती वादळी समुद्रात  अडकली आहे, अशा परिस्थितीत एखादी छोटी नाव त्याला वाचवू शकते. ती नाव वादळ शमवू शकत नाही परंतु त्या व्यक्तीला किनाऱ्यापर्यंत पोहोचवू शकते. तसंच काहीसे व्हेंटिलेटरच्या बाबतीत  पण आहे. अतिदक्षता विभागातील तातडीच्या उपचार प्रक्रिया, त्यातील गुंतागुंत, विशेष करून आर्टिफिशिअल व्हेंटिलेशन (कृत्रिमेशसन यंत्रणा) या बाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत.
कोरोना व्हायरसने सर्व जगाला ग्रासलेले असताना, व्हेंटिलेटरचा वापर ही असंख्य लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वांत प्रभावी पद्धती म्हणून पुढे आली आहे. लॉकडाऊन, संचारबंदी, आर्थिक मंदी  याचबरोबर व्हेंटीलेटर्सची कमतरता हाही सर्व घरांमधील चर्चेचा मुद्दा बनला आहे. जगभरातील प्रत्येक देश हा त्यांच्याकडे उपलब्ध असलेले व्हेंटीलेटर्स आणि सध्याची गरज लक्षात घेता संख्येत  असणारी कमतरता याची चाचपणी करीत आहे. ही स्थिती म्हणजे युद्ध सुरू होण्याआधी आपल्याकडे असलेले सैन्य बळ आणि शस्त्रास्त्रांचा आढावा घेण्यासारखे आहे. 1.3 अब्ज लोकसंख्या  असलेल्या आपल्या भारताकडे सार्वजनिक आणि खासगी आरोग्यसेवा क्षेत्रात 40,000 व्हेंटीलेटर्स आहेत.
जागतिक कल बघायला गेलो तर कोव्हिड- 19ने ग्रस्त प्रत्येक 6 रुग्णांपैकी एक जण गंभीर स्थितीत जात आहे, ज्यामध्येेशसनाच्या त्रासाचा समावेश असू शकतो. काही देशांमध्ये अशा रुग्णाची  संख्या इतकी वाढली आहे की कोणावर पहिले उपचार करायचे अशी अवघड स्थिती डॉक्टरांवर ओढवली आहे. ही गंभीर स्थिती सर्वांसाठी एक काळजीचा विषय असून, देशांतर्गत कमी खर्चाध्ये  व्हेंटिलेटरची निर्मिती करण्याचे जोरदार प्रयत्न चालू झालेले दिसून येत आहेत.

व्हेंटीलेटरचा इतिहास
साथीचे रोग हा आरोग्यसेवा क्षेत्रासाठी एक वेगळाच काळ असतो. अशा परिस्थितीत जुन्या पद्धती, समज आणि आरोग्य प्रणालीमध्ये बरेच बदल घडतात. यामध्ये नवीन तंत्रज्ञानासह नवनवे शोध  उदयाला येतात व डॉक्टरांकडे सद्यस्थितीत असलेल्या जुन्या तंत्रज्ञानाचा वापरामध्ये देखील बदल होऊ शकतो. उदा. 1950 साली कोपनहेगन मध्ये ‘पोलिओमायलायटीस’ या साथीच्या रोगाने गंभीर  रूप धारण केले होते. ज्यामध्ये रुग्णांना हातापायाचेच नव्हे तरेशसन स्नायूंचा देखील पक्षाघात झाला होता. अशा बऱ्याच रुग्णांनोशास घेण्यास अडथळा येत होता. या काळातदेखील हॉस्पिटल्सच्या  क्षमतेवर काही आठवड्यातच ताण पडू लागला होता. तेव्हा वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांनी भूलतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः कृत्रिमरीत्या प्राणवायूचा पुरवठा (मॅन्युअल व्हेंटिलेशन) केला होता.  चीनमधील बीजिंग येथे 2003 साली एव्हीअन फ्लूच्या काळात इतर अतिदक्षता विभागातील नसलेल्या इतर विभागातील लोकांनी मोबाईल फोनद्वारे इतर देशातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत अतिदक्षता विभागाचे काम पार पडले होते.

व्हेंटिलेटर म्हणजे काय?
पण मग व्हेंटिलेटर म्हणजे नक्की काय? हे जीवरक्षक उपकरण आहे का पैसे खर्च करणारे मशीन आहे? का आजारी किंवा मृत्यच्या दारात पोहोचलेल्या  माणसाचे अस्तित्व राखण्यासाठी निरर्थक  प्रयत्नाचा भाग आहे?-
- असे प्रश्न काही वर्षांपूर्वी एका बड्या सुपरस्टारने आपल्या लोकप्रिय मालिकेत उपस्थित केले होते. व्हेंटिलेटर हे हॉस्पिटलमधील खाटांशेजारी असणारे  उपकरण जे दोन महत्त्वाचे कार्य करते एक  म्हणजे रक्ताच्या प्रवाहात पुरेसा प्राणवायू उपलब्ध करणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर काढणे. ह्यामुळे नाजूक परिस्थितीत वेशसन प्रक्रिया स्वतः पूर्णपणे करू न शकणाऱ्या रुग्णाला मदत  होते. ह्या उपकरणामुळे श्वसनाचा त्रास असणाऱ्या रुग्णाला योग्य प्रमाणात प्राणवायू दिला जाऊ शकतो आणिेशसन प्रक्रियेला लागणारे अतिरिक्त प्रयत्न कमी झाल्याने रुग्ण लवकर बरा होण्यास  मदत होते.

अतिदक्षता विभागात कार्यरत तज्ज्ञ
(इंटेन्सिव्हिस्ट) म्हणून आम्ही व्हेंटीलेटरचा वापरेशसनाचा त्रास असलेल्या रुग्णांच्या परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी एक ताकदवर आणि पूरक असे साधन म्हणून करतो. खरं म्हणजे  व्हेंटिलेटरचा वापर म्हणजे उपचार नाही. एखाद्या रुग्णाची गंभीर होत असलेली शारीरिक स्थिती जेव्हा वैद्यकीयरित्या व्यवस्थापित केली जाऊ शकते तेव्हा व्हेंटीलेटर्स रुग्णाचे प्राण वाचवत  रुग्णाच्या फुफ्फुसांना बरे होण्याचा वेळ देतात. तरी पण अशा परिस्थितीत व्हेंटीलेटर्सचा वापर ह्या बाबत अनेकसमज-गैरसमज आहेत.

व्हेंटीलेटर्सच्या बाबतीत समज - गैरसमज
1. समज :- रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्यास तो/ती वाचू शकणार नाही.
सत्य - जेव्हा एखादे मानवी शरीर तीव्र किंवा गंभीर रोगाने ग्रासले असते तेव्हा, हृदय आणि फुफुसांना जास्तीतजास्त साहाय्याची गरज असते. अशा वेळेस शारीरिक प्रक्रिया या खूप  गुंतागुंतीच्या,  अत्यंत काटेकोरपणे नियंत्रित असतात. अशा वेळेस व्हेंटिलेटर उपयुक्त ठरतो. खरंतर व्हेंटिलेटरचे साहाय्य घेतलेल्या रुग्णांपैकी सुमारे 75-85% बरे होऊन पुन्हा सामान्य आयुष्य जगतात.
2. समज - मृत्यूच्या दारात असलेला रुग्णाचे प्राण काही काळ टिकवून ठेवण्यासाठी व्हेंटिलेटरचा वापर केला जातो.
सत्य - प्रत्येक रोगाशी निगडित परिवर्तनीय (रिव्हर्सिबल) व अपरिवर्तनीय (इररिव्हर्सिबल) स्थिती असते प्रत्येक रोगामध्ये परिवर्तनीय स्थितीची एक छोटी संधी असते. यासाठी अतिदक्षता  विभागातील तज्ज्ञांचा प्रदीर्घ अनुभव आणि कौशल्य तसेच उपकरणांची क्षमता महत्त्वाची ठरते.
3. समज - डॉक्टर्स त्यांना हवे तेव्हा व्हेंटीलेटर्सचा वापर करतात.
सत्य - जीवन आणि मृत्यूशी झुंज करणाऱ्या रुग्णांसाठी व्हेंटिलेटर चा वापर कधी करावा यासाठी कधी वैज्ञानिक मापदंड महत्त्वाचे ठरतात. या मापदंडांचा विचार करून आणि कुटुंबीयांचे मत  जाणून मग निर्णय घेतला जातो.
4. समज - व्हेंटिलेटरवर रुग्ण असल्यास डॉक्टरांचे काही नियंत्रण राहत नाही.
सत्य - रुग्ण व्हेंटीलेटरवर असल्यास परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या संख्येने वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज असते. त्यामध्ये इंटेन्सिव्हिस्ट, रेसिडेंट डॉक्टर्स, तज्ज्ञ सल्लागार, परिचारिका हे सर्व रुग्णांच्या देखभालीसाठी अहोरात्र काम करतात. प्राणवायूच्या पुरवल्या जाणाऱ्या प्रमाणापासून ते रुग्णाचे मिनिटाला हृदयाचे ठोके किती आहेत, कार्बन डायऑक्साईड कसे बाहेर  काढायचे, ते फुफ्फुसांना निकामी होण्यापासून कसे वाचवायचे या सर्व आव्हानांवर उपाय शोधण्याचे काम सुरू असते. परिचारिका देखील खूप महत्त्वाची भूमिका बजावत रुग्णाची मदत व  कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर देतात. लॅब टेक्निशिअन, डायग्नॉस्टिक इमेजिंग तज्ज्ञ, देखील रोजच्या या प्रयत्नांध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. फिजिओथेरपीस्टची टीम सतत रुग्णांचे  स्नायू कसे कार्यरत राहतील हे पाहते आणि इतर वैद्यकीय कर्मचारी अतिदक्षता विभागाची आणि रुग्णाची वैयक्तिक स्वच्छता राखत असतात .
5. समज - व्हेंटिलेटरचा वापर म्हणजे रुग्णाचे आयुष्य धोक्यात घालणे आहे.
सत्य - व्हेंटिलेटर वापरतानोशसन नलिकेत घातलेल्या ट्यूबमधून संभाव्य संसर्गाची जोखीम असते. व्हेंटिलेशनची प्रक्रिया ही नैसर्गिक प्रक्रिया नसल्यामुळे यामुळे साईड इफेक्ट्स होणे हे स्वाभाविक   आहे. यामुळे हृदयावर अधिकदाब निर्माण होऊ शकतो ज्यामुळे हृदय याला प्रतिकार करू शकते. कधी कधी रक्तदाब कमी होऊ शकतो व हृदयाचे कार्य अधिक अवघड  होते. फुफ्फुसांमधील  रक्तदाब देखील वाढू शकतो. पण प्रदीर्घ अनुभव व कौशल्य असलेले अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ हे होऊ नये म्हणून काम करीत असतात.
6. समज - रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवल्यावर हॉस्पिटल प्रदीर्घ काळ हे चालू ठेवेल.
सत्य - व्हेंटिलेटरचा वापर हा रुग्णाला आपल्या शरीराचे कार्य पूर्ववत आणण्यास वेळ देणे यासाठी असतो. सामान्यतः हेंटिलेटर काढल्यावर रुग्ण स्व:ताहून प्रभावीपणे श्वास घेऊ शकतात. व्हेंटिलेटर काढण्याच्या आधी रुग्णेशास घेण्यास सक्षम आहे की नाही यासाठी डॉक्टर्स अनेक चाचण्या घेतात. खरंतर सध्या आपण अभूतपूर्व, आव्हानात्मक असा काळ अनुभवतो आहोत. अशा  परिस्थितीत नेहमीच्या चाकोरीबाहेर जाऊन सर्जनशील व अद्वितीय असे उपाय शोधण्याची वेळ वैद्यकीय तज्ज्ञांसमोर आलेली आहे. शेवटी लोकांचे प्राण वाचवणे महत्त्वाचे आहे.

- डॉ. प्राची साठे
एम.डी., एफ.आर.सी.पी.
(11 एप्रिल 2020   पर्यंतच्या माहितीवर आधारित.)
लेखिका पुणेस्थित रूबी हॉल क्लिनिकच्या अतिदक्षता विभागाच्या संस्थापिका व प्रमुख आहेत.
(साभार : पुरोगामी जनगर्जना)
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget