Halloween Costume ideas 2015

कोरोना रोखण्याचा सूपर फॉर्म्युला

पुण्यातील कोंढवाच्या नागरिकांचा पुढाकार : सर्वांचा हिरहिरीने सहभाग

पुणे
रमजानची नमाज घरातच अदा करा..., स्वच्छता पाळा..., सोशल डिस्टन्सिंग ठेवा...हे आहेत कोंढवा परिसरातील मशिदींमधील ध्वनिवर्धकांवरून रोज सकाळी होणाऱ्या अजाननंतर दिले  जाणारे संदेश. येथील मुस्लिमबहुल भागांत कोरोनाबाबत जनजागृती करण्याचेच नव्हे, तर बहुसंख्येने हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांच्या भाजी-भाकरीची सोय करण्यापर्यंतची अनेक  कामे मुस्लिम समाजातील काही संस्था आणि कार्यकर्ते नेटाने करीत आहेत आणि त्या साऱ्यांचेच फळ म्हणजे कोंढवा भागातील संसर्गाला बऱ्याच अंशी रोखण्यात आलेले यश. कोंढव्यातील आत्तापर्यंत बाधितांची संख्या 29 पर्यंतच सीमित पुण्यातील पेठांप्रमाणेच दाट वस्ती असलेला कोंढवा परिसर कोरोनाच्या विळख्यात गुरफटण्यास सुरूवात झाली होती.  डोंगराच्या चढावर असलेली मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्यश्रीनगरसारखी वस्ती ही अगदी दाट लोकसंख्येची. दाट वस्ती, अल्पशिक्षित कामगारांचा भरणा असल्याने कोरोनाबाबत अज्ञान,  स्वच्छतेचा अभाव आणि त्यात रमजानचा महिना जवळ आल्याने खरेदीसाठी होणारी गर्दी. त्यामुळे कोरोना झपाट्याने पसरू लागला होता. पण या स्थितीचा सामना करण्यासाठी काही  कार्यकर्त्यांनी कंबर कसली. रोज पहाटेची अजान देणाराच अजाननंतर कोरोनाची माहिती सांगू लागला आणि ती लोकांना समजू लागली... एमआयएमचे लियाकत खान सांगतात. ते  म्हणाले, ‘‘आम्ही कार्यकर्त्यांनी गल्लोगल्ली रिक्षा फिरवल्या आणि कोरोनापासून दूर राहण्यासाठी  स्वच्छता कशी महत्त्वाची आहे, कोरोना नेमका कशाने पसरतो आणि सोशल  डिस्टन्सिंग कसे आवश्यक आहे, ते लोकांना पटवून देऊ लागलो.’’ राहिली आहे. महापालिकेच्या पथकाने घरोघर जाऊन तपासणी सुरू केली, पण सर्दी-खोकला झाल्याचेही रहिवासी  लपवून ठेवू लागले. त्यामुळे आम्ही मोबाईल व्हॅनने फिरून त्यांची तपासणी केली आणि उपचार सुरू केले. त्यातच रमजानचे उपास सुरू झाले, पण आम्ही मशिदीत नमाज अदा न  करता घरीच करा, असे सांगून कोंढव्यातील साठ मशिदींना कुलूप लावले, असेही त्यांनी सांगितले. दुसरा प्रश्न या कामगारांच्या पोटाचा होता. त्यांना पाच किलो पीठ, चहा, मसाला,  धान्य असे कीट वाटण्यास सुरूवात केली. कोंढवा परिसरातील तेरा जण कोरोनाने मरण पावले. त्यांच्या मृतदेहांचे दहन करणे, अंत्यविधी करणे आदी कामे जिकीरीची होती. कारण थेट  नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिला जात नाही. अनेकदा नातेवाईक महापालिकेच्या विलगीकरण कक्षात असल्याने त्यांना अंत्यविधीसाठी येताही येत नव्हते. अशा वेळी पॉप्युलर फ्रंटने  पुढाकार घेतला आणि अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली, असे या फ्रंटचे रझी खान यांनी सांगितले. रूग्णवाहिकेची सोय करणे, कब्रस्तानाच खड्डे घेणे तसेच तेथे कमीतकमी माणसे  उपस्थित राहतील, याची खबरदारी घेऊन पुढील व्यवस्था करणे ही कामे फ्रंटने केली. महाराष्ट्र अ‍ॅक्शन कमिटीचे जाहीदभाई शेख यांनी सांगितले, की रमजानची नमाज मशिदीत घ्यायची   नाही, असे सांगितल्याने अनेकजण इमारतींच्या गच्चीत जमण्याची योजना आखत होते, मात्र आम्ही ती यशस्वी होऊ दिली नाही. या सर्व कामांमध्ये एमआयएम, वहादत ए इस्लामीचे  मुजिब पटेल, जमाते इस्लामीचे प्रा. अजहर वारसी, तसेच मोहयोद्दिन सय्यद आदींनीही पुढाकार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे गफूर पठाण वस्त्यांमध्ये जाऊन कोरोनापासून घ्यायच्या  खबरदारीची माहिती देत आहेत.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget