Halloween Costume ideas 2015

रोजा : शरीर आणि विज्ञान

रोजा एक प्रार्थना आहे, जी अल्लाह ने आपल्या अनुयायांवर अनिवार्य केली आहे. त्या अनुयांयावर जे सदृढ आहेत. कुठल्याही गंभीर आजारात ग्रस्त नाहीत. कुठल्याही व्यसनाच्या आहारी नाहीत. आजारी, स्तनदा माता, गरोदर माता व थकलेल्या वृद्धांना यातून सूट आहे. पहाटेच्या प्रहरापासून ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत याचा कालावधी आहे. पहाटेच्या वेळेस सहेर करायची असते तर सूर्यास्तानंतर इफ्तार म्हणजे उपवास सोडण्याची वेळ. रोजा एक अशी इबादत आहे जी शरीरासोबत सर्वांगीण जीवनाची शुद्धी करते. मानसिक बळ देते, ईश्‍वराच्या आदेशाची शिकवण देते, स्वत:च्या मनावर ताबा मिळविते. कुरआनमध्ये म्हटले आहे की, तुमच्यावर रोजे अनिवार्य केले गेले आहेत, ज्याप्रमाणे तुमच्या अगोदरच्या उम्मतींवरही केले गेले होते. जेणेकरून तुम्ही ईशपरायन बनाल.’ (कुरआन 2:183)
रोजा एक महिन्याची खडतर ट्रेनिंग आहे. यात उपवासासहीत पाच वेळेसची नमाज, रात्रीची विशेष तरावीहच्या नमाजचा समावेश आहे. एक प्रकारे ही ईमानधारकांच्या संयमाची कसोटी आहे.
विज्ञानाच्या नजरेत रोजा एक महत्त्वपूर्ण विधी आहे, जी की मनुष्याला सदृढ ठेवते. मानवी शरीरात पोट एक असे कोमल अंग आहे, ज्याची काळजी नाही घेतली तर विभिन्न आजारांना सामोरे जावे लागते. रोजा पोटासाठी एक उत्तम औषधी आहे. कारण एक मशीन दिवसभर चालत राहते, तिला विश्रांती नाही दिली तर ती कधीपण खराब होऊ शकते. रोजाच्या काळात पोटाला 8 तासापेक्षा अधिक विश्रांती लाभते.
रोजाचे लाभ - आज प्रत्येकजण खाण्यासाठी कमावण्याच्या नादात धावपळ करत राहतो. तान, तणावामुळे शरीरावर याचा विपरित परिणाम पडतो. लठ्ठपणासारखा गंभीर आजार येतो. ज्यामुळे हृदयविकार, रक्तदाब, अस्थमा सारखे आजार जडतात. याला रोखण्यासाठी रोजा महत्वपूर्ण भूमिका निभावतो.
रोजामुळे शरिरातील कोलेस्टेरॉल कमी होतेे. चर्बीही घटते. शारीरिक क्रीया व्यवस्थित चालते. तसेच वाईट सवईपासून मुक्तता मिळते.
जेव्हा आपण रोजा ठेवतो तेव्हा रक्ताची वाढ कमी होत जाते. याचा अधिक फायदा हृदयाला पोहोचतो. रोजामुळे डायास्टॉलिक प्रेशर कमी राहते. त्यामुळे हृदय नैसर्गिक गतीत चालते. जे लोक हायपरटेन्शनने ग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी रोजा तर ढालच आहे. रोजाचा अधिक परिणाम रक्तावर पडतो. ज्याचा थेट परिणाम रक्तवाहिन्यांवर होतो. आम्ही दैनंदिन जीवनात एवढे खात राहतो की, रक्तनलिकांना विश्रांती भेटत नाही. त्यामुळे त्यात विविध प्रकारचे कण जमा होऊन ब्लॉकेज तयार होतात. मात्र रोजामुळे रक्ताची गती नैसर्गिक लेवलमध्ये चालते, त्यात चर्बीयुक्त पदार्थ जमत नाहीत आणि रक्तवाहिन्या व्यवस्थित चालतात. कोलेस्ट्रॉललाही जमा होण्यास संधी मिळत नाही. रक्त शुद्ध होते. रोजामुळे हृदयविकारही होत नाहीत. शरिराच्या प्रत्येक अवयवाला रोजामुळे मजबुती येते. आरोग्य चांगले राहते.
तसेच रोजामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मनुष्य ताजातवाणा होतो. त्यामुळे त्याला अनेक प्रकारचे फायदे होतात. एक तर आत्मीक समाधान मिळते दूसरे शरीर सदृढतेचे. तीसरे त्याची प्रार्थना आणि ईश्‍वराशी जवळीक वाढते.

- आदिबा रियाज शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget