Halloween Costume ideas 2015

करोनामुळे जीव गमावणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणार रू.६५ लाख

मुंबई
करोना विषाणूच्या संसर्गामुळे जीव गमावणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी ६५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. मृत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ५० लाख रुपये आणि एका वारसाला नोकरी, तसेच मुंबई पोलीस फाऊंडेशन (एमपीएफ)तर्फे १० लाख रुपये आणि खासगी बँक विमाकवचच्या माध्यमातून ५ लाख रुपये मदत दिली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यासंदर्भात पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी निर्णय घेतल्याच्या वृत्ताला पोलीस विभागाचे प्रवक्ते आणि पोलीस अधिकारी प्रणय अशोक यांनी दुजोरा दिला आहे. करोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील आठ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर शहरातील सहाशेहून अधिक कर्मचारी बाधित आहेत. व्यावसायिक संघटना, उद्योजक सेलिब्रिटी आणि बॉलिवूडमधील दिग्गजांकडून देणगीसाठी २०१८मध्ये एमपीएफची स्थापना केली होती. या ट्रस्टला मिळालेल्या देणगीचा उपयोग पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात मदतीचे पैसे ४८ तासांच्या आत जमा करण्यात येत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी नवल बजाज यांनी दिली. दरम्यान, आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील आठ कर्मचाऱ्यांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तर जवळपास ६०० पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. तर राज्यातील करोनाबाधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या हजारहून अधिक झाली आहे.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget