एकदा ह. आयेशा (र.) यांनी एका अन्सारी व्यक्तीशी आपल्या नात्यातल्या एका महिलेचा विवाह करविला आणि त्यांना निरोप देत होत्या त्या वेळी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी विचारले, “आयेशा, या वेळी का बरे कुणी गीत गात नाही.” मग म्हणाले, ”एखादी मोलकरीन (बंदी) तरी त्यांच्याबरोबर पाठवली असती जिने डफ वाजवून गायले असते.” (बुखारी, बाबुन्निकाह)
एका विवाह सोहळ्यात करजा बिन कअब (र.) आणि अबू मसऊद अन्सारी (र.) मुलींचे गायन ऐकत होते. तेवढ्यात आमिर बिन सऊद (र.) तिथे आले. त्यांनी हे पाहून आक्षेप घेतला. “आपण दोघेही बद्रच्या वेळेतील अनुयायी आहात. आपल्या समोरच हे गायन चालले आहे. हे कसे काय?” त्यावर त्या दोघांनी उत्तर दिले, “तुम्हाला आवडत असेल तर तुम्हीही बसून घ्या. अल्लाहच्या प्रेषितांनी विवाहप्रसंगी याची अनुमती दिलेली आहे.” (निसाई, लहवुवल जिना)
विवाहप्रसंगी मित्रमंडळी आणि नातेवाईकांना जेवणाचे आमंत्रण देणे विहित आहे. यास वलीमा म्हणतात. ज्याला जमेल तितक्या नातलग आणि मित्रमंडळींना जेवू घालावे.
मुस्लिमांसाठी ईदुल फित्र (रमजान ईद) आणि ईदुल अजहा (बकर ईद) हे हर्षोल्हासाचे दोन दिवस आहेत. ईदुल अजहा ह. इस्माईल आणि ह. इब्राहीम (अ.) यांच्या आनंदात सहभागी होण्याची आणि तसेच काबागृहावर विजय मिळाला त्या दिवसाचे स्मरण करण्याचे प्रसंग आहेत. तसेच ईदुल फित्र पवित्र कुरआनचे अवतरण आणि इस्लामच्या उदय झाल्याचे समारंभ आहेत. या ईदच्या दोन दिवसांत चांगली वस्त्रे परिधान करणे आणि अत्रर लावणे पसंत केले आहे.
ह. आयेशा म्हणतात की माझ्याकडे अन्सारांच्या दोन मुली बसून गात होत्या. अशातच ह. अबू बक्र (र.) आले आणि त्यांनी आक्षेप घेतला. “प्रेषितांच्या घरी हे काय चाललंय?” त्यावर प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, “हे अबू बक्र, प्रत्येक समूहासाठी (ईद) आनंदाचा एक दिवस असतो आणि हा आमच्या आनंदाचा दिवस आहे. या दिवशी गायन आयोजित करायला परवानगी दिली आहे.”
प्रेषितांच्या काळात ईदच्या दिवशी मुले आणि मुली रस्त्यावर उभे राहून ढोल व डफ वाजवून खेळ करत होते. ही अनुमती इस्लाममध्ये यासाठी दिलेली आहे की वर्षात एक-दोन दिवस आनंद साजरा केला जावा. लोकांनी मोकळ्या मनाने एकमेकांची भेट घ्यावी. प्रसन्नता व्यक्त करावी. प्रेषित (स.) म्हणाले, “हे दिवस खाण्यापिण्याचे, मुलाबाळांसमवेत मौज करण्याचे तसेच अल्लाहचे स्मरण करण्यासाठी आहेत.”
(सीरतुन्नबी – शिबली नोमानी, सुलैमान नदवी, खंड-६)
- संकलन :
सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment