मत्यू म्हणजे सांसारिक जीवनाचा अंत आणि मरणोत्तर जीवनाची सुरुवात आहे. मृत्यूच्या वेळी फरिश्ते म्हणजे ईशदूत माणसाचा आत्मा त्याच्या शरीरातून खेचून घेतात. याविषयी पवित्र कुरआनमध्ये म्हटले गेले आहे की,
‘‘कुल् यतवफ्फाकुम् मलकुल्-मवतिल्लज़ी वुक्कि-ल बिकुम् सुम्-म इला रब्बिकुम् तुर्-जऊन’’
अनुवाद :- हे पैगंबर (स) यांना सांगा, तुम्हावर नियुक्त मृत्यूदूत, तुम्हाला पुर्णतः आपल्या ताब्यात घेईल आणि मग तुम्ही आपल्या ’रब’कडे परत आणले जाल.
(32 अस्-सजदा-11)
मृत्यू असा येत नाही की फोन चालू होता, चार्जिंग संपली किंवा काही बिघाड झाला आणि तो बंद पडला. माणसाच्या जीवनाची मुदत संपताच मृत्यूदुत येतो आणि माणसाचा आत्मा संपुर्णपणे आपल्या ताब्यात घेतो. आत्म्याचा छोटासा भागही शरिरात बाकी राहत नाही. याविषयी मौलाना सय्यद अबुल् आला मौदूदी (त्यांच्यावर अल्लाहची कृपा असो) यांनी उल्लेखित आयतीच्या स्पष्टीकरणात लिहिले आहे की या छोट्याशा आयतीमध्ये अनेक तथ्ये ठळकपणे मांडण्यात आली आहेत, ज्यांकडे दुर्लक्ष करता कामा नये. 1) अल्लाहने या कामासाठी खास एक दूत नियुक्त केला आहे जो येऊन आत्म्याला त्याचप्रमाणे ताब्यात घेतो जसे एखादा सरकारी अंमलदार (जषषळलळरश्र ठशलशर्ळींशी) एखाद्या गोष्टीला आपल्या ताब्यात घेतो. याविषयी कुरआनमध्ये दुसऱ्या ठिकाणी जो अधिक तपशील आहे त्यावरून कळते की या मृत्यूदुताच्या हाताखाली एक संपूर्ण स्टाफ असतो. माणसाला मृत्यू देताना त्याचा आत्मा शरीरातून काढणे आणि तो ताब्यात घेण्यासाठी अनेक प्रकारची कामे त्यांच्याकडून घेतली जातात. या स्टाफची वागणूक अपराधी आत्म्याशी वेगळ्या प्रकारची असते आणि इमानधारक आत्म्याशी वेगळी असते.
2) यावरून हे सुद्धा माहीत होते की मृत्यूमुळे मनुष्य नष्ट होत नाही तर त्याचा आत्मा शरीरातून बाहेर पडून बाकी राहतो. कुरआनचे शब्द मृत्यूचा दूत तुम्हाला पूर्णतः आपल्या ताब्यात घेईल याचाच हा पुरावा आहे. अस्तित्वहीन व मिटलेल्या वस्तूला ताब्यात घेतले जात नाही. ताब्यात घेण्याचा अर्थच हा आहे की ताब्यात घेतलेली वस्तू कब्जेदाराकडे राहते.
3) यावरून हेही कळते की मृत्यूसमयी जे काही ताब्यात घेतले जाते ते माणसाचे शारीरिक जीवन (इळेश्रेसळलरश्र ङळषश) नाही तर त्याचे ते ’स्व’ किंवा ’अहं’ (एसे) आहे जे ’मी’ ’आम्ही’ ’तुम्ही’ या नावाने ओळखले जाते. हे ’स्व’ जगात काम करून जे काही व्यक्तिमत्त्व निर्माण होते ते पूर्णतः जसे की तसे (ळपींरलीं) ताब्यात घेतले जाते. त्याच्या गुणवैशिष्ट्यांत काहीही कमी जास्त न करता हे घडते आणि हेच मृत्यूपश्चात आपल्या ’रब’कडे सुपूर्द केले जाते. यालाच परलोकात नवीन जन्म व नवीन शरीर दिले जाईल. यावरच ईश-न्यायालयात दावा केला जाईल. त्याकडूनच हिशोब घेतला जाईल आणि त्यालाच बक्षीस मिळेल किंवा शिक्षा भोगावी लागेल. (तफ्हीमूल-कुरआन, खंड 4, पृ. 43-44) ..... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment