आकाशात अनेक तारे झगमग करतात पण ध्रुवताऱ्याची गोष्टच निराळी आहे. आकाशातील सर्व तारे भ्रमण करतात, पण हा एकमेव असा तारा आहे जो एकाच ठिकाणी राहतो. तो आकाशाच्या उत्तर अर्धगोलात उत्तरेकडील ध्रुवाजवळ स्थित आहे. म्हणूनच याला ध्रुवतारा म्हणतात. हा तारा पृथ्वीपासून सुमारे 433 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. ध्रुवताऱ्याच्या या वैशिष्ट्यामुळे खगोलशास्त्रात आणि दिशा शोधण्यासाठी तो अतिमहत्त्वाचा मानला जातो. पूर्वीच्या काळात ध्रुवताऱ्याला खूप महत्त्व होते कारण हा तारा नेहमी एकाच ठिकाणी असतो.
पूर्वीच्या काळात प्रवासाची सोय आजच्यासारखी नव्हती. अनेक दिवस आणि महिने लागत होते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला. रस्ते खडतर होते आणि रात्री सूर्यास्त झाल्यावर दिशेचा अंदाज येत नसे. तेव्हा प्रवाशांना ध्रुवतारा मार्गदर्शन करीत असे. आजच्या युगातही ध्रुवताऱ्याला महत्त्व आहे आणि खगोलशास्त्रज्ञ त्याचे संशोधन करत आहेत.
आजच्या प्रगत युगात पूर्वीसारखी समस्या राहिलेली नाही. महामार्ग बनले आहेत, रस्ते व्यवस्थित आहेत. कोणते ठिकाण किती लांब आहे हे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बोर्डावर लिहिलेले असते. तुम्हाला जिथे पोहोचायचे आहे त्या ठिकाणाचे नावापुढे खूण दिलेली असते की तुमची दिशा याकडे आहे. आज तर गुगल मॅप तुमच्या हातात आहे. तुम्ही कुठे चालले आहात ते सर्व पाहता येते आणि तोंडी मार्गदर्शन देखील होते.
पूर्वीच्या काळाचा ध्रुवतारा आणि आजचा लोकेशन मॅप किंवा गुगल मॅप तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात. मानवाची शारीरिक व मानसिक रचना अशी आहे की त्याला यशस्वी जीवन जगण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज भासते. गुरुविना शिष्य अपुरा असतो. गुरु नसते तर शिष्याला योग्य मार्गदर्शन कोण केले असते? आई नसती तर मुलाचे संगोपन कसे झाले असते? त्याची शारीरिक व मानसिक वाढ कोण केली असती? आई आणि इतर कुटुंबीयांच्या सहकार्याने लहान मुले मोठी होत असतात आणि मोठी होऊन मोठमोठी कामे करतात.
मनुष्य बुद्धीचा योग्य वापर करून प्रगती करतो. बुद्धीला साथ मिळते हातांची. या बुद्धीचा वापर करून मनुष्य हातांचा योग्य वापर करून निरनिराळे प्रकल्प उभे करतो. मानवाच्या प्रत्येक अवयवाचा योग्य वापर करून तो प्रगती करत असतो आणि आपले जीवन सहजतेने व्यतीत करत असतो. म्हणजे सफल जीवनामागे मानवी शरीररचना, कुटुंब, समाज, आणि निसर्गाची प्रत्येक वस्तू मानवाला साथ देते व मार्गदर्शन करते जेणेकरून मानवाने हे जीवन आनंदाने सहजतेने जगावे.
पण हा विचार करणे सुद्धा योग्य आहे की, हे जीवन जे आम्ही जगत आहोत तेच सर्वकाही आहे काय? हे जीवन मानवाचे अंतिम जीवन आहे काय? मृत्यूनंतर सर्वकाही संपणार आहे का? हे प्रश्न गंभीर आहेत. ’खाओ पिओ मजा करो और मर जाओ’ इतकाच हा जीवन मर्यादित आहे का? की याच्या पलीकडे देखिल जीवन आहे? यावर गांभीर्याने विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
जर तुम्ही या प्रश्नांना गंभीरतेने घेतले असेल तर तुम्हाला कळेल की हे जीवन अंतिम जीवन नाही. याच्या पलीकडे एक जीवन आहे, मरणोत्तर जीवन. खरी यशस्वीता मरणोत्तर जीवनाची आहे. अनेक बुद्धिजीवी या जगात होऊन गेले आणि त्यांच्या सर्वांचे हेच म्हणणे होते की या जीवनापलीकडे एक जीवन आहे - मरणोत्तर जीवन. त्या जीवनाची यशस्वीता या सद्यस्थितीत जीवनावर अवलंबून आहे. बीज बोये बबुल के आम कहा से पाये समान, या जीवनात बाभूळ पेराल तर मरणोत्तर जीवनात बाभळीचे काटे भेटतील, आंबे भेटणार नाहीत. जो बोओगे वही पाओगे.
या जीवनात जे कर्म आम्ही करत आहोत त्या कर्मांची फळे -(आतील पान 7 वर)
मरणोत्तर जीवनात आम्हाला चाखायला मिळतील. सांगायचे तात्पर्य असे की हा जीवन जे आपण जगत आहोत अति महत्त्वाचे आहे आणि जीवन जगण्याची संधी एकदाच प्राप्त झालेली आहे. पुन्हा हे जीवन भेटणार नाही. जसे विद्यार्थ्यांचे उदाहरण घेऊया, एक विद्यार्थी खूप अभ्यास करतो आपले टार्गेट प्राप्त करण्यासाठी पण परीक्षेचा निकाल लागल्यावर त्याला कळते की एक मार्कने तो मागे राहिला आहे, टार्गेट पूर्ण झालेला नाही. पण तो धीर सोडत नाही आणि पुन्हा प्रयत्न करतो. चिकाटीने जिद्दीने अभ्यास करतो आणि टार्गेट प्राप्त करूनच समाधानाचा श्वास घेतो. या परीक्षेत त्या विद्यार्थ्याला पुन्हा परीक्षा देण्याची संधी प्राप्त आहे पण हे जीवन असे नाही आहे. एकच इनिंग खेळायची आहे, दुसरी संधी नाही.
सद्यस्थितीत जीवनाच्या यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शक आहेत आणि कायमस्वरूपी जीवनाच्या सफलतेसाठी मानवाला कोणतेच मार्गदर्शक अस्तित्वात नाही असे शक्य आहे का? नाही! मुळीच नाही. अशक्य आहे. या जीवनाच्या सफलतेसाठी आणि मरणोत्तर जीवनाच्या सफलतेसाठी देखील ध्रुवतारा समान मार्गदर्शक आहेत. कुरआन मध्ये आहे की: मूसा (अ.) ने उत्तर दिले, आमचा पालकर्ता तो आहे ज्याने प्रत्येक वस्तूला तिचे स्वरूप प्रदान केले मग तिला मार्ग दाखविला. (सूरा तहा, आयत: 50). मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांच्या तफ्सीरानुसार सूरह ता-हा, आयत चे स्पष्टीकरण असे आहे की, जेव्हा फिरऔनने हजरत मूसा (अ.) ला विचारले की, तुझा पालनकर्ता कोण आहे? त्यावर मूसा (अ.) उत्तर देतात की, आमचा पालनकर्ता तो आहे ज्याने प्रत्येक वस्तूला तिचे स्वरूप प्रदान केले आणि मग तिला मार्ग दाखविला.
मौलाना मौदूदी या आयतीचे स्पष्टीकरण असे देतात आणि त्याचे सारांश असे आहे की, अल्लाहने प्रत्येक वस्तूची निर्मितीच केली नाही तर तिला योग्य प्रकारे जीवन व्यतीत करण्यासाठी मार्गदर्शनही केले आहे. हे मार्गदर्शन विविध स्वरूपात दिसते, जसे की प्राण्यांची नैसर्गिक प्रवृत्ती, सृष्टीचे भौतिक नियम आणि मनुष्यासाठी नैतिक व आध्यात्मिक मार्गदर्शन. प्रत्येक जीव आणि वस्तूचे निर्माण एका विशिष्ट उद्दिष्टाने केले गेले आहे आणि त्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी अल्लाहने आवश्यक साधनं प्रदान केलेली आहेत.
मानवाचे हे जीवन आणि मरणोत्तर जीवन सफल होण्यासाठी अल्लाहने मानव मार्गदर्शनासाठी प्रेषितांमार्फत सत्य मार्गदर्शन केले आहे. म्हणूनच, मानवाला योग्य मार्गदर्शन मिळावे आणि मरणोत्तर जीवनात सफलता प्राप्त व्हावी यासाठी अल्लाहने या धरतीवर प्रत्येक राष्ट्रात प्रेषित पाठविले आहेत. याचा पुरावा आम्हाला कुराणमध्ये मिळतो. प्रत्येक जनसमुदाया (उम्मत) साठी एक प्रेषित आहे. मग जेव्हा एखाद्या लोकसमूहाजवळ त्याचा प्रेषित येतो, तेव्हा पूर्ण न्यायानिशी त्यांचा निर्णय लावला जातो आणि त्यांच्यावर तिळमात्र देखील अत्याचार केला जात नाही. (सूरह युनूस, आयत: 47). याचा अर्थ असा की या धर्तीवर मानव भरकटू नये आणि सत्य मार्गावर चालावे म्हणून अल्लाहने प्रत्येक भूखंडात अनेक प्रेषित पाठविले आहेत. सर्व प्रेषितांनी मानवाचे नाते अल्लाहशी जोडले. अल्लाह एक आहे, त्याचा कोणीही भागीदार नाही, तो रब आहे, पालनहार आहे, उपजीविका देणारा आहे, सार्वभौम आहे, आणि मालक आहे. गुलामी अल्लाहाचीच केली जावी. पूजा अर्चना अल्लाहसाठीच आहे. त्याच्या समोरच नतमस्तक होण्यात सफलता आहे या जीवनातही आणि मरणोत्तर जीवनातही. अशी शिकवण प्रत्येक प्रेषित देत असे आणि जीवन जगण्याचा सरळ मार्ग सिराते मुस्तकीम दाखवत असे. जेव्हा जेव्हा मानवाला अल्लाहचा विसर पडला आणि ते सैतानी मार्गावर चालू लागले तेव्हा-तेव्हा अल्लाहने मानवाला सरळ मार्ग दाखवण्यासाठी प्रेषित पाठविले आहे, आणि अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ) यांना पाठविले आहे. जो कुणी मोहम्मद (स.अ) दाखवलेल्या मार्गावर चालेल त्याला या जीवनात सफलता प्राप्त होईल आणि मरणोत्तर जीवनात देखील तो सफल होणार आहे. आणि (हे पैगंबर (स.)), आम्ही तुम्हाला अखिल मानवजातीसाठी शुभवार्ता देणारा आणि सावधान करणारा बनवून पाठविले आहे, परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत. (सूरा सबा, आयत: 28). याचा अर्थ असा की प्रेषित सर्व मानव जातीचे मार्गदर्शक आहेत. एका दुसऱ्या ठिकाणी आहे की, हे मुहम्मद (स.), सांगा की, हे मानवांनो, मी तुम्हा सर्वांकडे त्या अल्लाहचा प्रेषित आहे जो पृथ्वी व आकाशांच्या राज्यांचा स्वामी आहे, त्याच्याशिवाय इतर कोणीही ईश्वर नाही, तोच जीवन प्रदान करतो आणि तोच मृत्यू देतो. म्हणून श्रद्धा ठेवा अल्लाहवर आणि त्याने पाठविलेल्या निरक्षर नबी (स.) वर जो अल्लाह व त्याच्या आदेशांना मानतो, आणि अनुसरण करा त्याचे, जेणेकरून तुम्ही सरळ मार्ग प्राप्त कराल. (सूरा अल आराफ, आयत: 158). म्हणून प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे की त्याने योग्य मार्गदर्शक शोधावेत. जर या शोधकार्यत त्याने चूक केली तर मरणोत्तर जीवन असफल होणे निश्चित आहे.
- आसिफ खान, धामणगाव बढे
9405932295
Post a Comment