मंडलनामा’ हे मुस्लिम ओबीसी संघटनेचे संस्थापक शब्बीर अहमद अन्सारी यांच्या स्वतःच्या आणि मुस्लिम ओबीसी संघटनेच्या प्रवासावर आधारित ग्रंथ आहे. मराठी भाषेत हे पुस्तक लिहिले दिलीप वाघमारे यांनी आणि त्याचे उर्दू भाषेतील भाषांतर मलिक अकबर यांनी केले आहे. मराठी ग्रंथाचे विमोचन राज्याचे मंत्री मा. छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले आणि उर्दू भाषांतराचे विमोचन पद्मश्री जहीर काझी यांच्या हस्ते नुकतेच खिलाफत हाऊस मुंबई येथे झाले. पुस्तकाच्या सुरुवातीला शब्बीर अन्सारी आपल्या भावना प्रस्तुत करताना म्हणतात, तरुण वयात बरेच प्रश्न उभे होते. ग्रंथाच्या मागील भागावर माजी खासदार तथा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकरांनी शब्बीर अन्सारी यांना विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. डॉ. मुणगेकर त्यांना विचारतात की इस्लाम धर्मात जातीव्यवस्था नसताना १९६७ साली प्रकाशित होणाऱ्या मंडल आयोगाच्या अहवालात ओबीसींच्या यादीत काही मुस्लिम जातींना का सामील केले आहे? या प्रश्नाला उत्तर देताना शब्बीर अन्सारी म्हणाले की ओबीसी चळवळीचा भाग बनताना त्यानंतर जे काही घडले तो इतिहासाचा भाग आहे. शब्बीर अन्सारी म्हणतात, या प्रश्नांशी झुंज देत असताना मी ओबीसी चळवळीत कशी उडी घेतली याचे मला भान नव्हते. पण डॉ. मुणगेकरांनी सांगितल्याप्रमाणे मंडल आयोगाच्या अहवालात मुंस्लिमांच्या उल्लेखाने त्यांना चौधरी ब्रह्मप्रकाश करपुरी ठाकूर, रामविसाल पासवान, शरद यादव, कांशीराम, वीरमणी, शांती नाईक आणि एडहोकेट जनार्धन पाटील यांच्या नेतृत्वात मंडल अहवालाच्या शिफारशी लागू करण्याच्या संघर्षात एक प्रकारे मी गुंतूनच गेलो. त्यांनी मोठ्या आपुलकीने ग्रंथाच्या पहिल्याच पानावर आपले गुरु जनार्दन पाटील यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. जात आणि वर्ग यामधील फरक सहसा सामान्य जनांना समजत नाही. शब्बीर अन्सारींनी मात्र ते अचूक समजून घेतले आणि याच आधारावर त्यांनी मुस्लिम समाजासाठी आरक्षणाची मोहीम हाती घेतली. जेव्हा महाराष्ट्र सरकारने मुस्लिम ओबीसींच्या संदर्भात आदेश काढले तेव्हा त्यामध्ये मराठी भाषेत जात ऐवजी वर्ग असे म्हटहे गेले होते.
भारतीय जनता पक्ष धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास संविधानाच्या विरुद्ध असल्याचे म्हणतो. जर भारतीय घटनेनुसार जातीपातीच्या आधारावर आरक्षण दिले जात नसेल तर केंद्र सरकारचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णयदेखील घटनाबाह्य ठरतो. पण जर गरीबीच्याच मापदंडावर इतरांना आरक्षण दिले जात असेल तर मुस्लिम समाजाच्या गरीबीला दूर करण्यासाठी त्यांनाही आरक्षणाची तरतूद का असू नये? भारतात आरक्षणाच्या महत्त्वाला समजून घेण्यासाठी त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला समजणे आवश्यक आहे. भारत भूमीत मध्य आशियामधून काही लोक स्वतःला उच्चवर्णीय समजणारे दाखल झाले. त्यांनी भारतातील मुस्लिमांना देशाच्या दक्षिण भागात ढकलून दिले. त्यांच्या सुपीक जमिनीची नासधूस केली. ज्या लोकांनी दक्षिणेकडे पलायन करणे स्वीकारले नाही त्यांना अस्पृश्य घोषित केले. जातीव्यवस्थेवर आधारित धर्मव्यवस्था रुजवली. भारत जगातला एकमेव असा देश आहे जिथे याच देशाच्या काही जातींवर धर्मस्थळांचे दार बंद केले. शिक्षणाची दारे बंद केली गेली आणि जगात दुसरे उदाहरण नाही अशी व्यवस्था रुजवली. नंतर जेव्हा मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्माचे लोक या देशात आले तेव्हा त्यांनी त्यांचे स्वागत केले.
पुण्यात पेशवाई काळात दलित समाजावर तीच जुलमी व्यवस्था लागू होती. त्यांना आपल्या गळ्यात एक भांडे लटकवावे लागे जेणेकरून थुंकी जमिनीवर पडू नये. पाठीवर झाडू लटकवलेली असे ज्यामुळे त्यांनी चालून आलेल्या रस्त्यावरील त्यांच्या पाऊलखुणा पुसल्या जाव्यात. ब्रिटीशकाळात महार रेजिमेंटने भीमा-कोरेगाव नजीक युद्ध केले होते. आजही देशात बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक विहिरीतून पाणी घेऊ दिले जात नाही. तसेच सार्वजनिक स्मशानभूमीत त्यांच्या मयतांचे दहन केले जाऊ शकत नाही. त्यांना मिशा ठेवता येत नाहीत.
ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गाच्या मागासलेपणाचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्यासाठी (घटनेत) आरक्षणाची तरतूद केली. नंतर मंडल आयोगाचे गठन झाल्यावर त्याद्वारे व्यवसायाच्या आधारावर मुस्लिमांसाठी ओबीसीच्या आरक्षणाविषयी सुचविले. त्या वेळी मुस्लिम नेते आणि बुद्धिजीवीवर्गाला जात आणि वर्ग यातले अंतर समजत नव्हते. म्हणून त्यांनी शब्बीर अन्सारींचा विरोध केला आणि जेव्हा इतर लोक कुणाचा विरोध करत असतात त्याच वेळी अल्लाह नेक लोकांसाठी “आहे” या पवित्र कुरआनातील आयतीचा अर्थ समजतो. अल्लाहचे बंदे साथ सोडून देतात त्या वेळी अल्लाहच्या मदतीचे मोल समजते. ह्या वास्तवतेची जाण फार कमी लोकांना असते. विरोधाचे एकमेव कारण कुणाशी शत्रुत्व किंवा स्वतःचे हित नसते. शब्बीर अन्सारी यांना हे चांगल्या प्रकारे कळले होते. म्हणून लोकांनी जेव्हा विरोध सुरू केला तेव्हा रागावले नाहीत, तर त्यांचा गैरसमज दूर करू लागले आणि या कठीण परीक्षेत ते यशस्वी झाले.
विरोधाचा सामना करणे कठीण असते, म्हणून अशा वेळी अल्लाहचे प्रेषित ह्या शब्दांचा उच्चार करतात की “आम्ही अल्लाहवर का विश्वास ठेवू नये. त्यानेच तर आमच्या जगण्याचा मार्गात आमचे मार्गदर्शन केले आहे. तुम्ही ज्या यातना आम्हाला देत आहात त्यावर आम्ही संयम बाळगू, विश्वास करणाऱ्यांचा विश्वास अल्लाहवरच असायला हवा.” अशा प्रकारे शब्बीर अन्सारी यांचा मंडलनामा केवळ एक आत्मकथाच नसून ती जगबीती देखील आहे. हे महाराष्ट्र राज्यातील त्या काळचे वर्णन आहे ज्या काळी केवळ दिवंगत विलासराव देशमुख आणि शरद पवार या नेत्यांचीच साहायता घेतली गेली नव्हती तर राज्याचे हिंदुत्ववादी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील साहाय्यक करून घेतले. या चळवळीच्या वैभवाचे महत्त्व इतके महान होते की दिलीपकुमारपासून जॉनी वॉकरपर्यंतचे सिनेकलाकार या संघर्षात सामील झाले.
कोणत्याही चळवळीच्या नेत्याच्या दृष्टीसाठी कोणाची गरज यासाठी असते की त्याने दुःख पाहावे. जात आणि वर्गामधील अंतर काय हे लोकांना समजावून सांगावे. अशा निरंतर संघर्षाच्या वेळी जर त्याचे बोल मनाला मोहक वाटणार नसले तरी त्याच्या मनातली गोष्ट ऐकणाऱ्यांच्या मनात उतरते, नेत्याच्या उद्दिष्टाला वाहून जाते. त्याला हे स्वतःलाच नव्हे तर त्याच्या अनुयायांना देखील बलिदानाची प्रेरणा देते. या ग्रंथाच्या सुरुवातीला शब्बीर अन्सारी यांचे मनोगत दिले आहे. त्यानंतरच्या ओळीत ते म्हणतात की आपल्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास समाधान वाटते. कारण आरक्षणासाठीच्या लढ्यात थोडेफार योगदान देऊन मुस्लिम ओबीसींच्या जीवनात आनंदाच्या काही क्षणांची भर घालू शकलो. त्यांच्यासाठी काही करण्याची सुवर्णसंधी मिळाली.
- डॉ. सलीम खान
मुंबई
(भाषांतर : इफ्तेखार अहमद)
Post a Comment