एकदा प्रेषित मुहम्मद (स.) चोराचा धिक्कार करत म्हणाले की एखादी लहान वस्तू अथवा रस्सी चोरी करतो आणि त्यासाठी मग त्याचा हात कापावा लागतो. माणूस चोरीचा गुन्हा अशा विचाराने करतो की त्याला ईश्वर सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी असल्याचा विश्वास नसतो. कमीतकमी असे कर्म करतेवेळी तरी त्याची श्रद्धा कमी होते.
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, “जेव्हा एखादा माणूस चोरी करतो त्या वेळी तो श्रद्धावंत नसतो.” हज्जच्या प्रसंगी आपल्या समारोपीय भाषणात प्रेषित (स.) म्हणतात, “तुमच्यापैकी सर्व लोकांवर एकदुसऱ्याची मालमत्ता हराम आहे. पण अधिकार असेल तर ती गोष्ट वेगळी. ज्याचा माल असेल त्याच्या परवानगीने मागून घ्या किंवा त्याचे काही काम केल्यास त्या कामाच्या मोबदल्यात मागून घ्या.”
पवित्र कुरआनात म्हटले आहे की “हे श्रद्धावंतानो, तुम्ही आपसात एकमेकांचा माल वाममार्गाने खाऊ नका, पण आपसात राजीखुशीने देवाणघेवाण करू शकता.” (४:५)
अरबस्थानात मखजूम कबिल्याची एक महिला होती. ती लोकांकडून मागून सवलतीने त्यांचा माल वगैरे घेत असे आणि नंतर नाकारत असे. त्या स्त्रीला प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे आणले गेले. प्रेषितांनी तिचा हात कापण्याचा आदेश दिला. ती मोठ्या घराण्याची स्त्री होती म्हणून काही उच्चभ्रू लोकांनी मध्यस्ती करत तिचा हात न कापण्याची प्रेषितांकडे विनंती केली. प्रेषितांनी त्यांना सांगितले की “तुमच्या पूर्वीच्या समूहाचा नाश यासाठीच झाला की जेव्हा साधारण गरीब माणसाकडून गुन्हा होत असेल तर त्यांना शिक्षा दिली जात असे आणि श्रेष्ठ लोकांकडून गुन्हा झाला तर त्यांना क्षमा गेलरी जात होती.” ते पुढे म्हणाले की, “अल्लाहची शपथ, जर मुहम्मद (स.) यांची कन्या जरी या जागी असती आणि तिच्याकडून हा गुन्हा घडला असता तर मी तिचा हात कापला असता.”
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायी डोक्याखाली चादर ठेवून झोपत होते. तेवढ्यात एक चोर त्यांच्या डोक्याखालची चादर हिसकावून घेऊन पळून गेला. हे प्रकरण जेव्हा प्रेषितांकडे गेले तेव्हा ते अनुयायी म्हणाले, “हे प्रेषित, ही चादर स्वस्तातली आहे. केवळ ३० दिरहमला घेतली होती. तीस दिरहमसाठी त्याचा हात कापला जाईल का? मी ही चादर त्याला विकून टाकली. त्याची किंमत तो व्यक्ती देईल.” प्रेषित (स.) म्हणाले, “हे प्रकरण माझ्याकडे येण्याआधी तुम्ही हा व्यवहार का नाही करून घेतला.”
(सीरतुन्नबी – शिबली नोमानी, सुलैमान नदवी, खंड-६)
- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment