Halloween Costume ideas 2015

डाव्या विचारसरणीचा उगम?


फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अतिउजव्या विचारांच्या सत्तेविरुद्ध तेथील नागरिकांनी आपला कौल दिला आहे. तसे पाहता ब्रिटनमधील लेबर पार्टी नावापुरतीच आहे. डाव्या विचारसरणीचा पक्ष (मजूर पक्ष) आहे. तरीदेखील हुजूर (कन्झर्वेटिव्ह) पक्षाला तिथल्या नागरिकांनी निवडणुकीत पराभूत केले. निवडणुकीच्या या दोन देशांव्यतिरिक्त तिसरा देश इराणदेखील आहे. तिथल्या उदारमतवादी पक्षाला लोकांनी निवडून दिले. याला फार महत्त्व सध्या देण्यात येत नसले तरी भविष्यात जगातील बऱ्याच देशामध्ये विशेषकरून युरोप, ज्याचा इतिहास आहे. फॅसिस्ट शक्तींचा उदय होतो की काय याची चिंता निरनिराळ्या देशांमधील नागरिकांना लागली असावी असे वाटते. युरोपियन संसदेच्या निवडणुकीत जी काही महिन्यांपूर्वी पार पडली आहे, उजव्या विचारसरणीच्या प्रतिनिधींना निवडून दिले आहे. म्हणून युरोपियन संसदेत जे घडले तेच इतर युरोपियन देशांमध्ये घडत आहे की काय य.ची चिंता फॅसिस्टविरोधी देशांनै लागून होती. म्हणून फ्रान्स, ब्रिटनमधील निवडणुकांच्या निकालांनी लोकांचे समाधान झाले आहे. फॅसिस्ट वृत्तीची सुरुवात अगोदर कोणत्याही देशाच्या राज्यकर्त्यांपासून होते आणि त्याद्वारे एका वर्गाचा उदय होतो, जो या विचारसरणीचा सर्वेसर्वा बनतो. फॅसिस्ट सरकारे एकाच राजकीय पक्षाची असताना सत्तेची सारी सूत्रे एकाच राज्यकर्त्याकडे किंवा एका पक्षाकडे केंद्रित होतात. जगभर या विचारसरणीचा विरोध होतो. सुरुवातीला हीच विचारसरणी अतिउजव्या विचारांशी होते. म्हणूनच ब्रिटन आणि फ्रान्समध्ये डाव्या पक्षांना जो विचार मिळाला आहे याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्पेनच्या पंतप्रधानांनी ब्रिटन आणि फ्रान्समधील डाव्या विचारसरणीला विजय मिळाल्यामुळे त्यांचे कौतुक करत तिथल्या निवडून आलेल्या प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्रिटन आणि फ्रान्समध्ये जी राजवट होती त्या दोघांनी गाजा-इस्रायल युद्धात इस्लायलची साथ दिली आहे. तर जे डावे पक्ष निवडून आलेले आहेत त्यांनी गाजाच्या समर्थनार्थ आपलवे मत व्यक्त केले आहे. फ्रान्समधील डाव्या पक्षाच्या नेत्यांनी ही घोषणा केली आहे की ते लवकरच पॅलेस्टाईनच्या स्वतंत्र देशाची मागणी करणार आहोत. विशेष म्हणजे जिथे जिथे डाव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांचा उदय होत आहे तिथे तरुण पिढी त्यांच्या समर्थनार्थ उभी आहे. एवढेच नव्हे तर याच दोन देशांचे नाही तर जगभरातील युवापिढी पॅलेस्टाईनचे समर्थन करत आहे. म्हणून या दोन देशांच्या निकालांचे जगभरात कौतुक होत आहे. याचा अर्थ जगात मानवतावादी विचारांच्या शक्ती आपल्या राजकीय अस्तित्वाचा पुरावा देत आहेत.

जगभरात उजव्या विचारसरणीच्या शासनांना भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा विळखा इतका घट्ट झाला आही की आज भांडवलदारांपलीकडे कोणताच वर्ग संपन्न होताना दिसत नाही. एवढेच नाही तर जगभर जिथे जिथे भांडवलदारी अर्थव्यवस्था आहे तिथे गरीबी पसरत आहे. आज आपल्याच भांडवलदारी वर्गाने माध्यमांना खरेदी करून गुलाम केले असल्याने युरोप असो की अमेरिका तिथे गरिबी कोणता कहर करत आहे याच्या बातम्या मिळत नाहीत. पण पुढील एका दशकातच भांडवलदारी आणि त्यांच्या विरोधातील घटकामध्ये युद्ध होईल आणि हे युद्ध जगभरच्या भांडवलदारांमध्ये होईल. धर्माशी, राष्ट्राशी, राष्ट्रीय भावनांशी याचा काहीएक संबंध नसेल. कारण मानवजातीला आपल्या भौतिक गरजांसाठी हा लढा द्यावा लागणार आहे. म्हणून या निवडणुकांकडे पाहावे लागणार ही सुरुवात होऊ शकते. डाव्या विचारसरणीचा उगम १८१७ मधील औद्योगिक क्रांतीनंतर झाला. धर्माविरुद्ध विजय नसला तरी धार्मिक राज्यसत्तेविरुद्धच्या व्यवस्था याद्वारे विकसित झाली. प्रामुख्याने या विचारसरणीद्वारे अंतरात्म्याचे स्वातंत्र्य आणि उपासना, धार्मिक विचारप मांडण्याचे स्वातंत्र्य, समाजाचे नैतिक प्रबोधन, नागरिकांचे मूलभूत अधिकार, मजूरवर्गाच्या अधिकारांना मान्यता, जी इस्लामने १४५० वर्षांपूर्वी दिली होती, असे आहेत.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो. : 9820121207


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget