(७६) आणि हे लोक यासाठीसुद्धा तत्पर राहिलेले आहेत की तुमचे पाय या भूमीवरून उखडून टाकावेत व तुम्हाला येथून बाहेर घालवून द्यावे, परंतु हे जर असे करतील तर तुमच्यानंतर हे स्वत: येथे काही जास्त काळ टिकू शकणार नाहीत.
(७७) हा आमचा कायमचा नियम आहे, जो त्या सर्व पैगंबरांसंबंधी आम्ही अवलंबिला आहे, ज्यांना तुमच्यापूर्वी आम्ही पाठविले होते आणि आमच्या कार्यप्रणालीत तुम्हाला कोणताही बदल आढळणार नाही.
(७८) नमाज कायम करा मध्यान्हीनंतर ते रात्रीच्या अंधारापर्यंत.३३ आणि प्रात:कालीन कुरआन (पठण)देखील आवश्यक करा. कारण प्रात:कालीन कुरआन साक्षात असतो.३४ (ज्यावर ईशदूत साक्षी देतात)
३३) यात दुपारच्या ‘जुहर’पासून ते रात्रीच्या ‘इशा’पर्यंतच्या चारही नमाज येतात.
३४) पहाटेच्या कुरआनने, पहाटेच्या नमाजीत कुरआन पठण करणे अभिप्रेत आहे. प्रात: कुरआनचे साक्षी असण्याचा अर्थ असा की अल्लाहचे फरिश्ते विशेषकरून त्याचे साक्षीदार बनतात कारण त्याला एक विशेष महत्त्व प्राप्त आहे
Post a Comment