* प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे सहकारी आणि ताबेदार यांच्यात फातेमा बिन्ते अलमंजर बिन जुबैर बिन अलऔम यांचा समावेश एका प्रख्यात विदुशीमध्ये होतो. त्यांना इस्लामी दंडशास्त्र आणि हदीसच्या अभ्यासावर प्रभुत्त्व प्राप्त होते. त्यांनी अनेक हदीस आपल्या आजी आसमा बिन्ते अबुबकर रजि. यांच्या संदर्भाने सांगितल्या होत्या. त्यांच्याशी धार्मिक संपर्क साधण्यामध्ये प्रेषित सल्ल. यांचे चरित्र लेखक निगार मोहम्मद बिन इसहाक यांचाही समावेश होतो. त्यांनी अनेक हदीस आपले पती हश्शाम बिन अर्वाह यांच्या मार्फतीने सांगितलेला होता.
* तहफतुल फुकहा : नावाच्या पुस्तकाचे लेखक मुहम्मद बिन अहेमद अल समरकंदी हिजरी 540 यांची कन्या फातेमा हि. 581 मोठ्या विदुशी होत्या. इस्लामी दंडशास्त्रामध्ये त्यांचा हतकंडा होता. अलाउद्दीन अबुबक्र अलकसानी हि.587 यांच्याशी झाला. त्यांचे चरित्र लिहिणाऱ्यांनी लिहिले आहे की, फातेमा हनफी विचारेधारेचे प्रतिनिधीत्व कुशलपणे करत होत्या. त्यांचे पती अनेकवेळा गडबडून जात. संशयाच्या भोवऱ्यात अडकून जात. तेव्हा त्यांच्याशी सुविद्य पत्नी फातेमा ह्या त्यांची मदत करत आणि त्यांचे मार्गदर्शन करत. अनेकवेळा ते मुलांना शिकवत असतांना एखाद्या शिष्याने प्रश्न विचारला तर ते गडबडून जात आणि घराच्या आतल्या बाजूला जावून थोड्यावेळाने परत येवून त्या प्रश्नाचे येत. जेव्हा पुन्हा पुन्हा असे घडू लागले तेव्हा त्यांच्या शिष्यांच्या लक्षात आले की, ते घरात जावून आपल्या पत्नीला प्रश्नाचे उत्तर विचारून परत येत.
मथर बिन मुहम्मद बिन सुलेमान (हि. 879.) हे इस्लामी दंडशास्त्राचे कठीण प्रश्नांचे उत्तर आपली पत्नी फातेमा बिन याह्या यांच्याशी चर्चा केल्याशिवाय देत नसत. तेव्हा त्यांचे शिष्य म्हणत हे उत्तर तुमचे नाही तर पडद्यामागे उभ्या असलेल्या व्यक्तीचे आहे.
* अम्मतुल गफूर बिन्ते इसहाक, भारतामध्ये आपल्या काळातील एक प्रसिद्ध विदुशी होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव मुहम्मद इसहाक देहलवी (1783-1846) होते. ते प्रसिद्ध विद्वान शाह अब्दुल अजीज देहलवी यांचे नातू होते. आणि 19 व्या शतकातील प्रसिद्ध विद्वान होते. त्यांनी आपल्या मुलीला इस्लामचे चांगले शिक्षण दिले होते. उम्मतुल गफूर यांनी शरियत आणि हदीस शास्त्रामध्ये विशेष प्राविण्य मिळविले होते.
* हजरत मुहम्मद इसहाक देहलवी यांनी त्यांचा विवाह शेख अब्दुल कय्युम बिन अब्दुल याह्या यांच्यासोबत केला होता. ते जेव्हा कधी अडचणीत येत तेव्हा आपली पत्नी उम्मतुल गफूर यांच्याशी सल्लामसलत करत.
* मौलाना अब्दुल याह्या अल हुसनी यांनी म्हटलेले आहे की, जेव्हा कधी त्यांना हदीसबद्दल काही अडचणी येत असेल तर तेव्हा ते आपल्या पत्नीकडे या संदर्भात सल्ला मागत.
क्रमशः
- डॉ. रजिउल इस्लाम नदवी
दिल्ली
पुस्तक : मेमारे जहाँ तू है
भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे
Post a Comment