Halloween Costume ideas 2015

मोजमापात तफावत करणे : प्रेषितवाणी (हदीस)


साधारणपणे कुणी कुणाची एखादी वस्तू, सामुग्री, मालकास न विचारता लपूनछपून घेतली असेल तर त्याला चोरी म्हणतात. या कुकर्माची शिक्षा चोराचे हात कापणे आहे. इस्लाम धर्मात नाजूक आणि क्षुल्लक प्रकरणाचीही दखल घेतली जाते, ज्याला चोरी म्हटले जात नाही. अशा कर्माचीही प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दखल घेतली आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करुन दिले.

या संदर्भात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मापतोलमध्ये कमी-जास्त करणे. जवळपास सर्वच नागरिकांचा याच्याशी संबंध येतो. यात व्यापारीवर्ग गुंतलेले असतात आणि ज्याचा फटका गरीब लोकांना बसतो. अल्लाहच्या नैसर्गिक नियमांमध्ये एक अति महत्त्वाचा घटक न्याय आहे. याचे उद्दिष्ट असे की जी वस्तू ज्याची असेल ती त्यालाच दिली जावी. जमिनीवर जे संतुलन आहे ते अल्लाहने प्रस्थापित केले आहे. याच सूत्रानुसार प्रत्येकाला त्याचे हक्काधिकार दिले जावेत. जर एखादी व्यक्ती दुसऱ्याचा जो अधिकार असेल तो त्यास देत नाही किंवा त्यामध्ये कमी करतो, तो या संतुलनाचे उल्लंघन करतो. पवित्र कुरआनमध्ये अल्लाहचे आदेश आहेत की “उत्तुंग अवकाश उभारलं आणि समतोल निर्माण केला. या संतुलनाचे उल्लंघन करू नका. हे संतुलन कायम ठेवा आणि मोजमापात कसर ठेवू नका.” (पवित्र कुरआन, ५५:७-९)

याच संतुलनामुळे या ब्रह्मांडाची व्यवस्था होते. मोजमापात कमी-जास्त करण्याचा वास्तवात दुसऱ्याच्या अधिकारावर ताबा मिळवणे. जर कुणी माल घेताना वाढवून घेतो आणि देताना मापात कमी करतो. तो दुसऱ्या३च्या वस्तूवर हबाडीने ताबा मिळवतो हीदेखील चोरी आहे.

प्रेषित शुऐब (अ.) यांचा समूह व्यापार करत होता. ते आपल्या लोकांना उद्देशून समजवतात की “तुम्ही पुरेपूर मोजमाप करा. कोणाचं नुकसान करू नका. प्रामाणिक तराजूने तोला. लोकांच्या वस्तूंमध्ये घट करू नका. धरतीवर अनाचार माजवू नका.” (पवित्र कुरआन, २६:१८१-१८३)

मोजमापात लबाडी करण्याने बरकत जाते. बाजारात जे व्यापारी असे काम करतात त्यांचा अनादर होतो आणि पुढे जाऊन ही बेइमानी त्यांच्या आर्थिक स्थितीचे विघटन करते.

समाजात समूहामध्ये अनैतिकता पसरण्याचे कारण हे असते की लबाडी करणाऱ्या लोकांना याचा विश्वास नसतो की त्यांचे गुपित पाहणारे डोळे सगळीकडे विखुरलेले असतात. एक दिवस असा उजाडेल जेव्हा आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब आपल्या विधात्यासमोर उभे राहून द्यावा लागणार आहे. देवाणघेवाणीत तफावत करणाऱ्यांचा धिक्कार आहे. लोक इतरांकडून घेताना माप भरभरून घेतता, दुसऱ्यांना मापून वजन करून देतात तेव्हा प्रमाणापेक्षा कमी देतात.

(सीरतुन्नबी – शिबली नोमानी, सुलैमान नदवी, खंड-६)

- संकलन :

सय्यद इफ्तिखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget