Halloween Costume ideas 2015

चोरी : प्रेषितवाणी (हदीस)


कुणा एखाद्या व्यक्तीने ज्या काही वस्तू वगैरे ठेवल्या असतील अशा वस्तू किंवा इतर सामान त्याच्या मालकाला न विचारता लपूनछपून घेणे म्हणजे चोरी करणे होय. याला इस्लाम धर्मात मोठा अपराध मानले गेले आहे. म्हणून त्यासाठी हात कापून टाकण्याची शिक्षा निश्चित केली गेली आहे. “जो कुणी चोर असेल पुरुष असो की स्त्री त्याचा हात कापून टाका. (चोरी केली असल्यास) ही अल्लाहकडून दिलेली तंबी आहे.” (पवित्र कुरआन, अल माइदा-६)

चोरी करणे फक्त याच कारणाने वाईट नाही की एक माणूस दुसऱ्या माणसाच्या मालकीची वस्तू त्या मालकाला न विचारता पळवून नेतो. त्या व्यक्तीने रास्त मार्गाने मेहनत करून ती वस्तू कमवलेली असते आणि चोरी करणारा कोणतेही परिश्रम न करता त्याचा माल हस्तगत करत असतो आणि मालकाने ते कमवण्यासाठी जे कष्ट सहन केले त्यास नगण्य करतो.

कुणाच्या घरी घरमालकाची परवानगी घेतल्याशिवाय दाखल होणे आणि त्याच्याकडे असलेल्या वस्तूंची आखणी करण्याचा अर्थ असा की असे कार्य करणाऱ्याच्या मनात वाईट वृत्ती दडलेली आहे. त्यासाठी चोर आणि मालकादरम्यान भांडण होते, रक्त सांडते. चोरलेला माल परिश्रम केल्याशिवाय मिळवलेला असल्यामुळे चोराकडे त्याचे वास्तविक माेल नसते. म्हणून त्या मालाची विल्हेवाट लावताना त्याला काहीही वाटत नाही.

अरब देशांत अत्यंत हलाखीची परिस्थिती पसरलेली होती म्हणून चोरीसारख्या घटना सर्रास होत होत्या. म्हणूनच इस्लामच्या प्रारंभिक काळात इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्याकडून चोरी न करण्याची शपथ घेतली जात होती. मुस्लिम होणाऱ्या पत्नीकडून देखील असेच वचन घेतले जात होते. मक्का विजयाच्या दिवशी जेव्हा मक्केतील रहिवाशी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकरवी इस्लाम धर्म स्वीकारत होते त्या वेळी त्यांच्याकडून चोरी न करण्याचे वचन घेतले गेले. याच प्रसंगी अबू सुफियानच्या पत्नी हिंद यांनी प्रेषितांना विचारले होते की “हे प्रेषित, अबू सुफियान कंजूस माणूस आहे. ते मला आणि माझ्या मुलाबाळांच्या खाण्यापिण्यासाठी पूर्ण खर्च देत नाहीत. तेव्हा मी त्यांच्या मालातून त्यांना न विचारता काही घेऊ शकते का?” यावर प्रेषितांनी सांगितले, “जितकी गरज असेल तितका माल तुम्ही आपल्या पतीला न विचारता घेऊ शकता.” याचा अर्थ असा की आपल्या कुटुंबाचा घरखर्च चालवण्यासाठी पत्नीने पतीला न विचारता काही पैसे घेतले तर याला चोरी म्हणता येत नाही.

(सीरतुन्नबी – शिबली नोमानी, सुलैमान नदवी, खंड-६)

- संकलन :

सय्यद इफ्तिखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget