Halloween Costume ideas 2015

वेदना कुठे आणि लक्षण कुठे?


लोकसभा निवडणुकीत पराजयानंतर भाजप पराभवाच्या धक्क्यातून सावरलेला नाही. एवढेच नाही तर यानंतर झालेल्याकाही राज्यांत विशेषतः जिथे भाजपचे वर्चस्व आहे अशा उत्तर भारतातील काही राज्यांमधील पोटनिवडणुकांत सुद्धा भाजपला हार पत्करावी लागली आहे. त्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली. या निवडणुकीच्या पराभवाची कोणती कारणे आहेत याचा शोध घेण्यासाठी पक्षाचे नेते एकत्र येऊन चर्चा करत आहेत.

भाजपसमोर प्रश्न एवढाच नाही की त्याला लोकसभा निवडणुकीत तर साधे बहुमत सुद्धा गाठता आलेले नाही किंवा त्यानंतरच्या पोटनिवडणुकांमध्ये त्याला पुन्हा आपली राजकीय प्रतिष्ठा गमवावी लागली. प्रश्न मोठा आणि गंभीर यासाठी आहे की यापुढे ज्या ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याचे काय होईल? महाराष्ट्र आणि हरियाणा ही दोन महत्त्वाची राज्ये आहेत आणि या राज्यांतपैकी विशेषतः महाराष्ट्रात भाजपसमोर मोठे आव्हान आहे. इतकेच नाही की या निवडणुका जिंकणे भाजपसाठी आणखी राज्यसभेतील कमी होत चाललेली संख्या टिकवायची की महाराष्ट्र आणि हरियाणात सत्ता गमवली तर राज्यसभेत भाजपची स्थिती आणखीनच खालावणार आहे. तसे झाल्यास त्या पक्षाच्या अजेंड्याचे काय होईल?

पराभवाच्या कारणांवर विचारविनियम करण्यासाठी जी बैठक नुकतीच लखनौमध्ये झाली तेथे उघड उघड कुणी बोलायला तयार नव्हते. पण आपल्या वक्तव्याच्या आडून त्यांनी भाजप नेतृत्वावर बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपने १९१४ साली लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर गुजरात आणि उत्तर प्रदेश ही अशी दोन राज्ये निवडली जिथून लोकसभेत १०० च्या जवळपास खासदार निवडून येतात. या राज्यांमधून सध्या उत्तर प्रदेश हे राज्य भाजपच्या हातातून निसटले. गुजरात हा नंतरचा प्रश्न.

खरी पराभवाची कारणे शोधताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की अति आत्मविश्वास भाजपला नडला. त्यांना स्पष्ट शब्दांत कुणाचा अति आत्मविश्वास की कुणावरील आत्मविश्वासामुळे भाजपला पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे के पी मौर्य म्हणाले की संघटनांना नजरेआड करून पक्षाला यश मिळणार नाही. संघटना नेतृत्वच नाही तर सत्तेपेक्षाही महत्त्वाची असते. या दोन्ही नेत्यांनी नेमके कोणात्या नेत्याकडे अंगुलीनिर्देश केले हे स्पष्ट करण्याची गरज नाही. ही जी चर्चा पराभवानंतर होत आहे ती चर्चा पक्ष आणि संघटना व्यक्ती यांचा कसा आणि किती महत्त्वाचा संबंध असावा लागतो याचा विचार पूर्वीच करायला हवा होता.

भाजप निवडणुकीत का हरला याची कारणमीमांसा करताना असे वाटते की दुखणं एकीकडे आणि त्याची लक्षणे दुसरीकडे शोधण्याचे प्रयत्न होत आहेत. भाजपला याचा विसर पडला की नाही, पण भारतीय मतदारांना याचा विसर पडलेला दिसतो की भाजपने कधीही भारतीय जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचा विचार केलेला नाही. किंबहुना हे त्यांच्या विचारधारेत नाही. 

२०१४ सालच्या निवडणुकीत त्यांनी भारतीय नागरिकांना असे आश्वासन मुळीच दिले नव्हते की ते सत्तेवर येताच त्यांच्या आर्थिक स्थिती सुधार करण्याच्या योजना राबवतील. भारतीय मुलांना शिक्षणाच्या उत्तम आणि मोफत संधी दिल्या जातील. भारतीय मजूरवर्गाला नोकऱ्या दिल्या जाती. फक्त एक कोटी दरवर्षी नोकऱ्यांची घोषणा केली होती. पण ती फक्त प्रचार-भाषणासाठीच मर्यादित होती. त्यासाठी कोणती उपाययोजना, आराखडा भाजपने तयार केलेला नव्हता. कारण त्याला नोकऱ्यांचे आमिष दाखवून मते मिळवायची होती. शिक्षण, रोजगार या भाजपच्या राजकीय कार्यक्रमात नव्हतेच, आजही नाही. उद्याचे काय? भाजपने मोघम “अच्छे दिन आयेंगे”  आणि सर्वांच्या विकासाची घोषणा केली होती. याचा खरा अर्थ फक्त प्रसारमाध्यमांशिवाय कोणालाच माहीत नव्हता की हे फक्त घोषणांपुरते आहे. 

मंडलच्या विरोधात जेव्हा भाजपने कमंडलचे अस्त्र काढले त्या वेळी भाजप विचारधारेत ही गोष्ट सामील होती की हा पक्ष लोकांना शिक्षण देण्यासाठी, नोकऱ्या, आर्थिक संधी देण्यासाठी उदयास आलेला नसून धार्मिक उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी आले. 

साऱ्या भारतीयांना सुशिक्षित करणे त्यांना संस्कार देणे हे भाजपच्या सांस्कृतिक विचारधारेत नाही. धर्माची परंपरा, त्याच्या शिकवणी, आचारविचार ह्या साऱ्या नागरिकांसाठी नसून काही निवडक वर्गासाठी आहेत. मागासवर्गीय, आदिवासी, उपेक्षित, अल्पसंख्याकांसाठी नाहीत. आम जनतचेला त्यांनी राम मंदिर देण्याचे आश्वासन दिले होते ते भाजपने आपले वचन पूर्ण केले. या पलीकडे लोक भाजपकडून ज्या गोष्टींची अपेक्षा करत आहेत तो भाजपवर अन्याय आहे. त्याने जे वचन दिले होते ते शंभर टक्के पूर्ण केले. ही साधी गोष्ट या विचारवंतांना समजत नाही जे भाजपच्या पराभवावर चर्चा करत आहेत.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक

मो. : 9820121207)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget