(१) पवित्र आहे तो जो घेऊन गेला एका रात्री आपल्या दासाला मस्जिदेहराम (काबा मस्जिद) पासून दूरच्या त्या मस्जिदपर्यंत (मस्जिदे अक्सा) जिच्या वातावरणाला त्याने समृद्धी दिली आहे जेणेकरून त्याला आपल्या काही निशाण्यांचे निरीक्षण घडवावे.१ वास्तविकपणे तोच आहे सर्व काही ऐकणारा व पाहणारा.
१) इस्लामी पारिभाषिक शब्दात ‘मेराज’ या नावाने प्रसिद्ध असलेली तीच ही घटना आहे. बऱ्याचशा व विश्वासार्ह अशा निवेदनांनुसार हिजरतच्या एक वर्ष अगोदर सदरहू घटना घडली. हदीस आणि पैगंबर (स.) यांच्या चरित्रपर ग्रंथात या घटनेचा तपशील सहाबा (रजि.) यांच्या एका मोठ्या संख्येद्वारे निवेदित झाला आहे. अशा निवेदनांची संख्या २५ पयं&त गेली आहे. दिव्य कुरआन केवळ मस्जिदे हराम (काबा मस्जिद) ते मस्जिदे अक्सा (बैतुलमक्दिस- जेरूसलेम) येथपर्यंतच पैगंबर (स.) यांच्या प्रवासाचे वर्णन करतो. ‘पवित्र आहे तो ज्याने नेले.’ अर्थात सर्वोच्च अल्लाहच्या असामान्य अशा सामर्थ्याने साकार झालेली ही एखादी अत्यंत महान अशी असामान्य घटना होती. ते अस्तित्व ज्याने आपल्या दासाला हे स्वप्न दाखविले अथवा आंतरिक दृष्टाव्यात हे सर्व दाखविले असते तर अशा प्रस्तावनेची गरज का भासावी? हे अगदी स्पष्ट आहे. तसेच हे शब्ददेखील ‘एका रात्री आपल्या दासाला नेले’ सदेह प्रवास घडल्याचे द्योतक आहेत. स्वप्नावस्थेतील प्रवास अथवा आंतरिक दृष्टाव्यातील प्रवासासाठी हे शब्द कोणत्याही प्रकारे यथार्थ ठरू शकत नाहीत. म्हणून ही केवळ एक आध्यात्मिक अनुभूती नव्हती तर सर्वोच्च अल्लाहने अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांना घडविलेला एक सदेह प्रवास आणि साक्षात निरीक्षण होते, हे मान्य केल्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही.
Post a Comment