(१२४) उरला ‘सब्त’ तर तो आम्ही त्या लोकांवर लादला होता ज्यांनी त्याच्याविषयीच्या आज्ञांमध्ये मतभेद निर्माण केले होते आणि निश्चितपणे तुझा पालनकर्ता कयामतच्या दिवशी त्या सर्वांचा निर्णय लावील ज्यामध्ये ते मतभेद करीत राहिले आहेत.
(१२५) हे पैगंबर (स.)! आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे आमंत्रित करा मुत्सद्देगिरीने व उत्तम उपदेशासहित आणि त्या लोकांशी विवाद करा अशा पद्धतीने जी उत्तम असेल. तुमचा पालनकर्ता अधिक उत्तम जाणतो की कोण त्याच्या मार्गापासून भ्रष्ट झाला आहे आणि कोण सरळमार्गावर आहे.
(१२६) आणि जर तुम्हा लोकांना बदला घ्यायचा असेल तर फक्त त्या प्रमाणांतच घ्यावा जितका तुमच्यावर अत्याचार केला गेला असेल. परंतु जर तुम्ही संयम बाळगला तर हे निश्चितपणे संयम बाळगणार्यांसाठी उत्तम आहे.
(१२७) हे पैगंबर (स.)! संयमाने कार्य करीत राहा आणि तुमचा हा संयम अल्लाहने दिलेल्या सुबुद्धीमुळेच आहे. या लोकांच्या कृत्यांवर दु:खी होऊ नका आणि त्यांच्या कुटिल कारवायांवर संकुचित वृत्ती बाळगू नका.
(१२८) अल्लाह त्या लोकांसमवेत आहे जे ईशपरायणतेने वागतात आणि परोपकार करीत असतात.
Post a Comment