एखाद्या व्यक्तीकडून जेव्हा कोणते पाप घडते तेव्हा त्याच्या हृदयावर एक काळा डाग उमटतो. जर त्याने पश्चात्ताप केला आणि अल्लाहपाशी माफी मागितली तर त्याचे हृदय स्वच्छ होते. पण जर त्याने वारंवार गुन्हा केला तर त्याच्या संपूर्ण हृदयावर काळा डाग पसरून जातो.
ह. असमा बिन्त अबू बकर (र.) यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांना सांगितले की माझ्या आई माझ्याकडे आल्या आहेत आणि त्यांनी तोपर्यंत इस्लाम धर्म स्वीकारलेला नव्हता तर मी त्यांच्याशी चांगला व्यवहार करावा काय? प्रेषितांनी उत्तर दिले, “होय, आपल्या आईच्या अधिकारांचा सन्मान करा, त्यांच्याशी चांगले वर्तन करा.” (मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी उपदेश दिला की ज्या कुणाला त्याच्या उपजीविकेत विपुलता हवी असेल आणि त्याला दीर्घायुष्य लाभण्याची इच्छा असेल तर त्याने आपल्या नातेवाईकांशी चांगला व्यवहार करावा आणि त्यांच्याशी परोपकार करावा. (ह. अनस (र), बुखारी, मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की धृष्टपृष्ठ आणि शक्तिशाली माणसाला कुणाकडे भीक मागणं वैध नाही. (तिर्मिजी)
ज्या माणसाला लोक एक-दोन घास अन्न न देता दरवाजावरून परत लावून देतात तो निराधार नाही. निरा३धार अशी व्यक्ती आहे ज्याला लोकांकडे विनंती करून मागण्यास लाज वाटते. (बुखारी)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, मला शपथ आहे त्या अस्तत्वाची! एक व्यक्ती खाद्यावर लाकूड घेऊन हमाली करतो असा माणूस त्या लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे जे भीक मागत असताना लोक त्यांना भीक देत नाहीत.
जो माणूस नेहमी मागत राहतो, तो कयामतच्या दिवशी अशा अवस्थेत येईल की ज्याच्या चेहऱ्यावर मासैचा एक तुकडा देखील नसेल. (तिर्मिजी)
- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment