प्रेषित मुहम्मद (स.) यांनी उपदेश दिला की वयस्कर माणसाचा आदर करा आणि पवित्र कुरआनचा अभ्यास करणाऱ्यांचा आदर करा जर ते अतिरेक (ज्ञानाच्या बाबतीत) करणारे नसतील. तसेच त्यांच्यापासून दूर जाणारे नसतील (म्हणजे त्या शिकवणीनुसार जगत नसतील) तर. तसेच न्यायी सत्ताधाऱ्यांचा आदर करा. या सर्वांचा आदर करणे म्हणजे अल्लाहचा आदर करण्यासारखे आहे. (ह. अबू मूसा (र.), अबू दाऊद, बैहकी)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ही शिकवण दिली की ज्ञान प्राप्त करा. शांतता बाळगा आणि सन्मान करा. ज्यांच्याकडून तुम्ही ज्ञान प्राप्त करा त्या गुरवर्यांशी सन्मानाचा व्यवहार करा. (ह. अबू हुरैरा, तिबरानी)
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की, कयामतच्या दिवशी अल्लाह तआला हाक देईल आणि विचारेल की ते लोक कुठे आहेत जे आपसात माझ्या सन्मानासाठी प्रेमाने राहत होते. मी त्यांना म झ्या सावलीत ठेवीन. ज्या दिवशी माझ्याशिवाय दुसरी कुठलीच सावली नसेल. (अबू हुरैरा (र.), तिबरानी)
प्रेषित मुहम्मद (स.) यांची शिकवण आहे की एक श्रद्धावंत दुसऱ्या श्रद्धानवंतासमान आहे आणि त्याचा बंधू आहे. ज्या गोष्टीपासून (आपल्या साथीदारास) हानी पोहोचण्याची भीती असेल त्यापासून त्याला रोखतो आणि त्याच्या अनुपस्थितीत त्याचे रक्षण करतो. (ह. अबू हुरैरा (र.) अबू दाऊद)
ह. अबू हुरैरा (र.) म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांचे म्हणणे आहे की मुस्लिम दुसऱ्या मुस्लिमाचा बंधू आहे. ते एकमेकांवर अत्याचार करत नाहीत की त्यांची अवहेलना करतात. प्रेषितांनी तीन वेळा आपल्या छातीकडे निर्देश करत असे म्हटले की सदाचार इथं असतो. एखाद्या मुस्लिमाचा दुष्ट असल्याचा एखादा पुरावा पुरेसा आहे की त्याने आपल्या मुस्लिम बंधूचा अपमान करावा. प्रत्येक मुस्लिमाचा इतर मुस्लिमावर त्याचे रक्त, त्याची संपत्ती आणि त्याचा सन्मान निषिद्ध आहे. (मुस्लिम)
- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment