महिला ह्या पुरूषांपेक्षा मागे नसतात. उलट काही वेळा त्या पुरूषांच्याही एक पाऊल पुढे असतात. विद्येच्या क्षेत्रात कुरआन, हदीस समजून घेण्यामध्ये सुद्धा त्या पुरूषांपेक्षा सरस असतात. खालील दोन घटना माझ्या या म्हणण्याला पुष्टी देणाऱ्या आहेत.
1. हजरत अब्दुल्लाह बिन जियाद म्हणतात की, मी एकदा बस्र सलमीच्या दोन तरूण मुुलांकडे गेलोे आणि त्यांना विचारले एक व्यक्ती जनावरांवर स्वार होऊन त्याला चाबकाने मारेल आणि त्याची लगाम जोराने आवळेल तर त्याचा काय परिणाम होईल. त्याबद्दल तुम्हाला काही माहित आहे का? तेव्हा त्यांनी नाही असे उत्तर दिले. तेवढ्यात बाजूच्या घरातून एका महिलेचा आवाज आला,’ तिने कुरआनमधील खालील आयत वाचून दाखविली.
‘‘जमिनीवर चालणाऱ्या एखाद्या प्राण्याला आणि हवेत पंखाने उडणाऱ्या एखाद्या पक्ष्याला पहा, हे सर्व तुमच्यासारख्याच प्रजातींमध्ये मोडतात. आम्ही त्याच्या भाग्यलेखात कोणतीही -(उर्वरित पान 7 वर)
कसर ठेवली नाही, मग हे सर्व आपल्या पालनकर्त्याकडे एकवटले जातील‘‘ (सुरे अन्आम 6: आयत नं. 38).
मी प्रश्नार्थक चिन्हाने त्या तरूणांकडे पाहिले असता ते उद्गारले की, ’ही आमची मोठी बहीण असून, तिने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा काळ पाहिलेला आहे. ’ (संदर्भ : मसनद अहेमद 17232). या घटनेमध्ये कुरआनच्या पठण करणाऱ्या महिलेचे नाव आलेले नाही. परंतु, अंदाज हाच आहे की, त्या सहाबिया असाव्यात. यावरून हे ही स्पष्ट होते की, त्या कुरआनच्या तज्ञ होत्या आणि त्यांची कुरआनविषयीची समज त्यांच्या भावांपेक्षाही चांगली होती. दुसरी घटना अशी आहे की, शेख रजियोद्दीन बिन अली बिन इब्राहीम बिन नजा (जे इब्ने नजिया) या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहेत ते एक प्रसिद्ध हंबली विचारधारेचे विद्वान होते. त्यांचा संबंध एका उच्चशिक्षित घराण्याशी होत्या त्यांचे आजोबा शेख अब्दुल वाहिद बिन मुहम्मद बिन अली बिन अहेमद सिराजी (जे अबुल फर्ज या टोपण नावाने इतिहासात प्रसिद्ध आहेत.) सुद्धा हंबली दंडशास्त्राचे विद्वान होते. त्यांनी , किताब अल जौहार फी तफसिर उल ’कुरआन’ 30 खंडांवर आधारित कुरआनचे भाष्य लिहिले होते. इब्ने नजियाची आई (शेख अबुल फर्ज यांची कन्या) यांना 30 खंडांचे भाष्य तोंडपाठ होते. त्या या भाष्यातील अनेक विषय इतरांसमारे उधृत करत होती. इब्ने नजमियाचे मामा सुद्धा एक मोठे इस्लामिक विद्वान होते. इब्ने नजिया म्हणतात,’’ मी आपल्या मामाकडून कुरआनचे भाष्य शिकत होतो. त्यानंतर माझ्या आईकडे येत होतो. तेव्हा आई मला विचारायची की आज तू मामाकडून कोणत्या अध्यायाच्या भाष्याचे अध्ययन केले आणि त्यांनी तुला काय-काय शिकविले. तेव्हा माझी आई विशेषकरून विचारायची की त्या विशिष्ट अध्यायातील भाष्य शिकविताना त्यांनी तुला या विशिष्ट गोष्टी सांगितल्या किंवा नाहीत. तेव्हा मी उत्तर देत असे की नाही. तेव्हा माझी आई सांगत असे की, तुझ्या मामांनी अमूक-अमूक आयतमधील भाष्य करतांना या-या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. इतिहासकार लिहितात की, त्यांना कुरआन मुखोद्गत होते आणि त्यांना कुरआनच्या भाषेची अत्यंत चांगली समज होती. (संदर्भ : जैनुद्दीन अबुल फर्ज अल बगदादी, किताबुल जेल अला तबकातुल हंबलतल इब्ने रजब, मुत्तबाअत अलसनत, अलमुहम्मदीया काहिरा खंड 1 पान क्र.440 प्रकाशन वर्षे 1953).
डॉ. रजिउल इस्लाम नदवी, दिल्ली
पुस्तक : मेमारे जहाँ तू है
भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे
Post a Comment