सामान्य लोकांना याची उत्सुकता असते की, इलेक्टोरल बाँड (निवडणूक रोखे) काय आहे? ज्यामुळे भाजपाचा उत्साह गगनात मावेनासा झाला होता. ज्याद्वारे हा पक्ष भारतातला नव्हे जगातला सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष बनला.
हे इलेक्टोरल बाँड (निवडणूक रोखे) एक प्रकारचे कायदेशीर दस्तावेज आहे, ज्यास भारताचा कोणताही नागरिक किंवा रजिस्टर्ड कंपनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही विशेष शाखांमधून खरेदी करू शकत होता आणि मग त्या रोख्यांना आपल्या आवडीच्या राजकीय पक्षाला देत होता. यामुळे सरकारला ह्याची माहिती मिळत होती की कोणत्या नागरिकाने किंवा कंपनीने किती रोखे कोणत्या राजकीय पक्षाला दिलेत आणि त्यानुसार मग अशा लोकांविरूद्ध ईड, सीबीआय, इन्कमटॅक्स वगैरे लावून त्यांना अटक केली जाऊ शकते आणि आपल्या विरोधातील पक्षांना आर्थिक निधी उभारता येऊ नये. परिणामी, निवडणुकीचा खर्च भागवता येणार नाही आणि भाजपाने आपल्याकडील याच रोख्यांद्वारा कमावलेल्या अमाप संपत्तीचा वापर करून विरोधी पक्षांना उद्ध्वस्त करावे. याशिवाय दुसरेही खर्च आहेत. सरकारे पाडण्याचे-स्थापण्याचे आणि पळवून नेण्याचे त्यासाठी सुद्धा अमाप पैसा लागत होता. त्याची पूर्तता याच निवडणूक रोख्यांद्वारा केली जाऊ शकते.
काही लोक जे म्हणतात की, भारताला खरे स्वतंत्र 1914 साली मिळाले. त्यापुर्वीचे स्वातंत्र्य हे खोटेनाटे होते. याचा अर्थ त्यांना असे वाटत असेल की 1914 नंतर भाजपाला संपत्ती गोळा करण्याचे/ लुटण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले.
या नवीन कायद्याच्या अगोदर 2018-19 मध्ये भाजपाला 1450 कोटी रूपये मिळाले होते. नवीन कायदा लागू केल्यापासून आजपर्यंत भाजपाला 6000 कोटी रूपये मिळाले असे म्हटले जात आहे. भाजपा सरकारने निवडणूक रोखेचा जो कायदा केला त्याविरूद्ध असोसिएशन फॉर डेमोक्रेसी राईट (एडीआर) नामक संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. बराच काळ हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. शेवटी दोन आठवड्याँपूर्वी त्याचा निकाल लागला आणि सर्वोच्च न्यायालयाने ह्या निवडणूक रोख्यांना असंवैधानिक ठरवले आहे.
कोणत्या पक्षाला कोण किती आणि कशी मदत करतो याची माहिती असणे मतदाराचा मूलभूत अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, या रोख्यांद्वारा कोणत्या पक्षाला किती निधी दिले आहेत ही सर्व माहिती निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर टाकावी. सरकारच्या या योजनेद्वारे विविध राजकीय पक्षांना 2018-2023 या पाच वर्षात 16518 कोटी रूपये मिळाले. यातले 7200 कोटी रूपये एकट्या भाजपाला मिळाले आहेत.
- सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment