(२) आम्ही यापूर्वी मूसा (अ.) ला ग्रंथ दिला होता आणि त्याला बनीइस्राईलसाठी मार्गदर्शनाचे साधन बनविले होते या आदेशासह की माझ्याशिवाय कोणालाही आपला कार्यसाधक बनवू नये.२
(३) तुम्ही त्या लोकांचे वंशज आहात ज्यांना आम्ही नूह (अ.) सह नावेवर स्वार केले होते आणि नूह (अ.) एक कृतज्ञ दास होता.
(४) मग आम्ही आपल्या ग्रंथात३ बनीइस्राईलना यावरसुद्धा सावधान केले होते की तुम्ही जमिनीवर दोन वेळा मोठे उपद्रव माजवाल आणि मोठी शिरजोरी दाखवाल. (५) सरतेशेवटी जेव्हा त्यापैकी पहिल्या शिरजोरीची वेळ आली, तेव्हा हे बनीइस्राईल! आम्ही तुमच्या विरोधात आमचे असे दास उभे केले जे फार सामर्थ्यवान होते आणि ते तुमच्या देशात सर्वत्र पसरले.४ हे एक वचन होते जे साकार होणारच होते.
२) म्हणजे विश्वास आणि भरवशाची मदार, ज्यावर भिस्त ठेवली जावी, ज्याच्या स्वाधीन आपले सव& मामले केले जावेत, ज्याच्याकडे माग&दश&न आणि मदतीसाठी रूजू केले जावे.
३) ग्रंथाचे या ठिकाणी तौरात अभिप्रेत आहे असे नाही तर दिव्य कुरआनात ज्यासाठी ‘अल-किताब’ (तो ग्रंथ) हे नाव पारिभाषिक शब्द म्हणून अनेक ठिकाणी प्रयोजिले गेले आहे, तो ईशलेखसंग्रह अभिप्रेत आहे.
४) याच्याने, बनीइस्राईल लोकांवर असेरियन आणि बेबिलोनियन लोकांकरवी जो महाभयंकर विनाश ओढवला, तो सव&नाश अभिप्रेत आहे.
Post a Comment