एकजुटीचे आवाहन : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला
लातूर (बशीर शेख)
केंद्रातील भाजप सरकार सर्वच आघाडीवर अपयशी ठरले असल्यामुळे देशातील जनतेमध्ये सरकारबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. परिणामी सत्ताधारी मंडळी काँग्रेस आणि इंडीया आघाडीला घाबरले असून विरोधकांना विविध मार्गांनी कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवून अधिक जोमाने कामाला लागावे, असेआवाहन काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केले आहे.
आगामी लोकसभा व इतर निवडणूकीच्या पुर्वतयारीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यात विभागीय पातळीवर बैठका घेण्यात येत आहेत. राज्यातील पाचवी बैठक सोमवार, 29 जानेवारी रोजी लातूर येथील हॉटेल ग्रँड सरोवर येथे मराठवाडा विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला मार्गदर्शन करीत होते.
या बैठकीस काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अ.भा. काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, पक्षाचे वरीष्ठ नेते संपतकूमार, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, काँग्रेस नेत्या खासदार रजनीताई पाटील, अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी मंत्री तथा मराठवाडा विभागीय बैठकीचे समन्वयक अनिल पटेल, सुरेश वरपूडकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हांडोरे, अमर राजूरकर, माजी मंत्री नसीम खान, सेवादलचे प्रदेशाध्यक्ष विलास आवताडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी डॉ. जितेंद्र देहाडे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख,आमदार डॉ. प्रज्ञाताई राजीव सातव, आमदार सुरेश वरपूडकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश राठोड, आमदार मोहनअण्णा हांबरडे, आमदार अमर राजूरकर, आमदार जितेश अंतापुरकर, अशोक पाटील, उल्हासदादा पवार, राजेश राठोड, वजाहत मिर्झा महीला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्यासह मान्यवर नेते उपस्थित होते.
यावेळी पूढे बोलतांना प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले की, देशात प्रचंड वाढलेली महागाई, बेरोजगारी यामुळे देशातील सामान्य जनता अडचणीत आली आहे. नोटबंदी जीएसटी यामुळे व्यापार, उदयोग डबघाईला आला आहे. सर्वच घटक सरकारवर नाराज आहेत या परिस्थितीत निवडणूका जिंकण्यासाठी सत्ताधारी मंडळी जातीत जातीत भांडणे लावत आहेत. धार्मिक वातावरण निर्माण करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. या वातावरणात जनतेला सत्य परिस्थितीती समजून सांगण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेला देशभरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेसच्या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन घाबरलेली सत्ताधारी मंडळी काँग्रेस आणि इंडीया आघाडीला कमजोर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट कायम राखणे गरजेचे आहे. सत्ताधारी मंडळीकडून होणाऱ्या चुका जनतेच्या लक्षात आणण्यासाठी या कार्यकर्त्यांनी सतत कार्यरत राहणे आवश्यक आहे. निवडणूक जिंकण्यासाठी
पक्षाची बुथ यंत्रणा मजबूत करावी लागणार आहे. इंडीया आघाडीतील प्रत्येक उमेदवार काँग्रेस पक्षाचाच आहे, असे समजून सर्वांनी काम करावयाचे आहे असे आवाहनही प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केले.
Post a Comment