(१३) आणि या ज्या पुष्कळशा रंगीबेरंगी वस्तू त्याने तुमच्यासाठी जमिनीत उत्पन्न करून ठेवल्या आहेत, यांच्यातसुद्धा निश्चितच निशाणी आहे त्या लोकांसाठी जे बोध घेणारे आहेत.
(१४) तोच आहे ज्याने तुमच्यासाठी समुद्राला वश केले आहे जेणेकरून तुम्ही त्यापासून ताजे मांस घेऊन खावे आणि त्याच्यापासून अलंकाराच्या वस्तू काढाव्यात ज्या तुम्ही परिधान करता. तुम्ही पाहता की नौका समुद्राचे ऊर फाडीत चालते, हे सर्व काही यासाठी आहे की तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कृपेचा शोध करावा५ व त्याचे कृतज्ञ व्हावे.
(१५) त्याने धरतीवर पर्वतांच्या मेखा गाडल्या जेणेकरून जमिनीने तुम्हाला घेऊन ढळू नये. त्याने नद्या प्रवाहित केल्या व नैसर्गिक मार्ग बनविले जेणेकरून तुम्हाला मार्ग प्राप्त व्हावा.
(१६) त्याने जमिनीत मार्ग दाखविणारी चिन्हे ठेवली आणि नक्षत्रांपासूनदेखील लोक मार्ग प्राप्त करतात.
(१७) मग तो, जो निर्माण करतो व ते, जे काहीही निर्माण करीत नाहीत, दोघे एक समान आहेत काय? काय तुम्हाला एवढे कळू नये?
(१८) जर तुम्ही अल्लाहच्या देणग्यांची गणना करू इच्छिले तर गणना करू शकत नाही, वस्तुस्थिती अशी आहे की तो फारच क्षमाशील व दयाळू आहे.
(१९) खरे पाहता तो तुमच्या उघड कृत्यांनाही जाणतो आणि त्या कृत्यांनाही जे तुम्ही लपून छपून करता.
(२०) आणि त्या दुसर्या विभूती ज्यांचा अल्लाहला सोडून लोक धावा करतात ते कोणत्याही वस्तूचे निर्माते नाहीत तर ते स्वत:च निर्माण केले गेले आहेत.
५) म्हणजे वैध पद्धतीने आपली रोजी प्राप्त करण्याचा प्रयत्न करा.
Post a Comment