Halloween Costume ideas 2015

हे अल्लाह! माझ्या समूहाच्या लोकांना माफ कर : पैगंबरवाणी (हदीस)


प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की जी अल्लाहची आणि अमुक व्यक्तीची इच्छा होती असे म्हणू नका असे म्हणा जी अल्लाहची इच्छा होती नंतर जे अमुक व्यक्तीने सांगितले. अल्लाह आणि त्याच्या भक्तांमध्ये अंतर असू द्या म्हणजे अल्लाहच्या मर्जीला त्याच्या भक्तांची मर्जी म्हणू नका. तसेच कुणी हा माझा गुलाम ही माझी मोलकरीन म्हणू नका. तुम्ही सर्व अल्लाहचे दास आहात. साऱ्या महिला त्याच्याच सेविका आहेत. तुम्ही माझा सेवक आणि माझी सेविका, माझा मुलगा आणि माझी मुलगी असे म्हणत जा. एका हदीसमध्ये प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले होते की ज्या लोकांना असे वाटते की लोक त्याच्या (समर्थनार्थ) उभे राहावेत, त्यांनी आपले ठिकाण नरकात करून घ्यावे. त्याच वेळी दुसरीकडे असेदेखील म्हटले आहे की तुम्ही आपल्या सरदाराच्या (समर्थनार्थ) उभे राहा. इस्लामच्या प्रारंभाच्या काळात प्रेषितांनी कबरीचे दर्शन घेण्यास मनाई केली होती. पण नंतर प्रेषितांनी त्याची अनुमती दिली. ते म्हणाले, कबरींचे दर्शन घेत जा कारण तुम्हाला तुमच्या मृत्युची आठवण येईल. (मौलाना फारुक खान, कलामे नबुवत, खंड ३)

ह. इब्ने मसऊद म्हणतात, मी प्रेषित मुहम्मद (स.) यांना ऐकत होतो, ते पैगंबरांपैकी एका पैगंबरांची गोष्ट सांगत होते. “त्यांना त्यांच्या समूहाने इतकी मारहाण केली की ते रक्तबंबाळ झाले. ते आपल्या चेहऱ्यावरून रक्त पुसत अल्लाहपाशी विनंती करत होते की माझ्या समूहाच्या लोकांना माफ कर.” (बुखारी, मुस्लिम)

ह. आयेशा (र.) म्हणतात, मी प्रेषित मुहम्मद (स.) लोकांना आदेश देत असत तेव्हा त्यांना अशाच कर्मांचा उपदेश देत होते ज्यांची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. लोक म्हणाले, हे अल्लाहचे प्रेषित आम्ही आपल्यासारखे नाही. अल्लाहने तर आपले मागील आणि पुढील सर्व गुन्हे माफ केले आहेत. त्यावर प्रेषित (स.) भयंकर रागावले आणि म्हणाले, मी तुमच्यापैकी सर्वांपेक्षा जास्त अल्लाहची भीती बाळगतो आणि तुमच्यापेक्षा जास्त मला अल्लाहविषयी ज्ञान आहे. (बुखारी)

ह. इब्ने मसऊद म्हणतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी असे सांगितले आहे की, मी तुम्हाला कबरीचे दर्शन करण्यापासून रोखले होते, पण आता तुम्ही कबरीचे दर्शन (जियारत) करत जा, कारण यामुळे तुम्ही दुनियेपासून दूर व्हाल आणि परलोकाची तुम्हाला आठवण येईल. (इब्ने माजा)

संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद

प्रेषित मुहम्मद (स.) यांना कधी आनंदाची बातमी मिळत असे किंवा तशी खूशखबर त्यांना दिली जायची तर ते अल्लाहचे आभार मानित असत आणि (अल्लाहसमोर) नतमस्तक होत. (अबू दाऊद)

ह. अब्दुल्लाह बिन अमरो म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांना हे सांगताना ऐकले आहे की, अल्लाहने आपल्या निर्मितीला अंधकारात निर्माण केले आहे. नंतर त्यांच्यावर प्रकाश टाकला. हा प्रकाश ज्यांच्यापर्यंत पोहोचला त्यांना मार्गदर्शन लाभले आणि ज्यांच्याकडे तो पोहोचला नाही तो भरकटून मार्गभ्रष्ट झाला. मी म्हणतो, लेखणी अल्लाहच्या बाबतचा अहवाल लिहित लिहित ती सुकून गेली. (तिर्मिजी)

संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget