(३८) हे लोक अल्लाहच्या नावाने कठोर शपथा घेऊन सांगतात, ‘‘अल्लाह कोणत्याही मरणार्याला पुन्हा जीवंत करून उठविणार नाही’’ का उठविणार नाही? हे तर एक अभिवचन आहे ज्याला पुरे करणे त्याने स्वत:साठी अनिवार्य ठरविले आहे, पण बहुतेक लोक जाणत नाहीत.
(३९) आणि असे घडणे यासाठी आवश्यक आहे की अल्लाहने यांच्यासमोर ही वस्तुस्थिती उघड करावी जिच्यासंबंधी हे मतभेद करीत आहेत. आणि सत्याचा इन्कार करणार्यांना हे कळावे की ते खोटारडे होते.
(४०) (उरली त्याची शक्यता, तर) आम्हाला कोणतीही वस्तू अस्तित्वात आणण्यासाठी यापेक्षा अधिक काही करावे लागत नाही की तिला आदेश देतो, ‘‘घडो.’’ आणि बस्स तसे घडते.
(४१) जे लोक अत्याचार सहन केल्यानंतर अल्लाहखातर देशत्याग करून गेले आहेत, त्यांना आम्ही जगातसुद्धा चांगले ठिकाण देऊ आणि परलोकातील मोबदला तर फार मोठा आहे,८ काश! किती बरे चांगले झाले असते की हे जाणून असते
(४२) त्या अत्याचारपीडितांना ज्यांनी संयम राखला आहे व जे आपल्या पालनकर्त्याच्या भरवशावर काम करीत आहेत. (की किती चांगला शेवट त्यांच्या प्रतीक्षेत आहे.)
(४३) हे पैगंबर(स.)! आम्ही तुमच्या अगोदरदेखील जेव्हा कधी पैगंबर पाठविले आहेत, माणसांमधूनच पाठविले आहेत ज्यांच्याकडे आम्ही आमच्या संदेशाचे दिव्य प्रकटन करीत होतो, स्मरणधारी लोकांना९ विचारा जर तुम्ही लोक स्वत: जाणत नसाल.
८) हा संकेत, काफिरांच्या असह्यकारक छळाला वैतागून ज्यांनी दक्षिण आफ्रिकेकडे हिजरत केली होती त्या मुहाजिरीनकडे आहे.
Post a Comment