Halloween Costume ideas 2015

समाजातील इतर घटकांपर्यंत संदेश पोहोचविण्यासाठी 'पैगंबर फॉर ऑल' मोहीम सुरू


ईद-ए-मिलादची वेळ किंवा पैगंबर मुहम्मद (स.) यांचा २८ सप्टेंबर हा वाढदिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा अनेक मुस्लिम संघटनांनी हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार व मरीन लाइन्स येथील प्रतिष्ठित इस्लाम जिमखान्याचे अध्यक्ष अॅड. युसूफ अब्राहमी यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली 'पैगंबर सर्वांसाठी' अभियान सुरू करण्यात आले आहे. जे पैगंबर (स.) यांचा सार्वत्रिक संदेश आणि त्यांच्या मानवतावादी मूल्यांचा प्रसार करण्यासाठी एक अनोखी मोहीम आहे.

इस्लाम जिमखान्याचे अध्यक्ष आणि मोहिमेचे प्रमुख अॅडव्होकेट युसूफ अब्राहमी म्हणाले, "हे कुणाचे धर्मांतर करण्यासाठी किंवा इस्लामचा प्रचार करण्यासाठी नाही. पैगंबर (स.) यांचा संदेश बिगर मुस्लिमांपर्यंत पोहोचविणे आणि इस्लामविषयीचे गैरसमज दूर करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे." गेल्या वर्षी झालेल्या अशाच प्रकारच्या प्रयोगामुळे कोअर ग्रुपला प्रोत्साहन मिळाले असून, आतापर्यंत बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. शाळा आणि महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी,  कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञांना सहभागी करून घेत समाजातील विविध घटकांपर्यंत आमचा संदेश पोहोचवला जात आहे. आमचा टार्गेट ग्रुप बहुसंख्य समाजाचे सदस्य असून आम्ही एक उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ही मोहीम सुरू केली आहे."

असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स (एएमपी) चे अध्यक्ष आणि पैगंबर फॉर ऑल कोअर कमिटीचे ज्येष्ठ सदस्य अमीर इद्रिसी म्हणाले की, मोहिमेचा प्रत्येक सदस्य जबाबदार आहे  आणि ही मोहीम कोणत्याही एका व्यक्तीचे किंवा एका संघटनेचे काम नाही. जास्तीत जास्त बिगर मुस्लिम मित्रांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना आपले लाडके पैगंबर (स.) कोणत्या मूल्यांसाठी उभे राहिले हे सांगणे हे आमचे ध्येय आहे."

सामाजिक कार्यकर्ते आणि या मोहिमेचे आणखी एक सदस्य सईस खान यांनी स्पष्ट केले की, या मोहिमेला ‘पैगंबर सर्वांसाठी’ म्हणतात कारण आमचे पवित्र पैगंबर मुहम्मद (स.) अल्लाहने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर सर्वांसाठी दया (रहमतुल लिल-आलमीन)  म्हणून पाठवले होते.  त्याऐवजी आम्हाला जगाला सांगायचे आहे की, आपले पैगंबर (स.) कोणत्या संदेशासाठी उभे राहिले." या मोहिमेसंदर्भात विविध घटकांना काम करण्यास सांगण्यात आले आहे.  त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी काही व्यक्तींवर सोपविण्यात आली आहे, तर काही व्यक्तींचे काम मुस्लिमेतरांच्या गटांना मशिदींना भेटीवर घेऊन जाण्याचे असेल.

या मोहिमेचा एक मनोरंजक पैलू म्हणजे मुस्लिमेतरांना मुस्लिमांच्या घरी आमंत्रित करणे, त्यांना जेवण, शरबत, चहा आणि कॉफी देणे आणि कुरआन आणि हदीस (पैगंबरांचे वचन) यांचे महत्त्व समजावून सांगणे होय.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आरिफ नसीम खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राज्यात  २८  सप्टेंबरऐवजी २९ सप्टेंबर ला ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली आहे.  कोणताही त्रास होऊ नये म्हणून गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी  म्हणजेच २९ सप्टेंबरला ईद-ए-मिलादची मिरवणूक काढावी, असे सुचविण्यात आले आहे. मुस्लिम संघटनांनी २९ सप्टेंबररोजी ईद-ए-मिलादची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे."

भायखळ्यातील ऐतिहासिक खिलाफत हाऊसयेथे मुस्लिम गटांच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणारे ज्येष्ठ आध्यात्मिक नेते मौलाना मोईन अशरफ कादरी (मोईन मियाँ) म्हणाले की, २९ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद मिरवणूक काढण्याचा निर्णय नेत्यांनी एकत्रितपणे घेतला आहे.

बैठकीला उपस्थित असलेले समाजवादी पक्षाचे नेते व आमदार रईस शेख यांनी २९ मे रोजी सुट्टी असून त्याच दिवशी मिरवणुका काढणे भिवंडी या यंत्रमाग नगरीसाठी चांगले आहे कारण शुक्रवार आहे आणि शुक्रवारी यंत्रमाग बंद असतात. भिवंडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शेख यांनी २९ सप्टेंबररोजी सुट्टी जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करू, असे आश्वासन याआधीच दिले होते.

माहीम दर्गाहचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खांडवानी यांनीही आपली इच्छा व्यक्त केली होती आणि राज्य सरकारला २९  मे रोजी सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली होती जेणेकरून मुस्लिम ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत सहभागी होऊ शकतील.

- शाहजहान मगदुम

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget