राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी असे म्हटले आहे की जोपर्यंत समाजात विषमता आहे तो पर्यंत आरक्षण सुरूच रहावे. काही वर्षापूर्वीच त्यांनी आरक्षणाच्या तरतुदींची समीक्षा करण्याचे सांगितले होते. पण त्यांचे आताचे वक्तव्य कोणत्या संदर्भात आहे हे सर्वांना माहित आहे. त्याचा उल्लेख करायची आवश्यकता नाही. त्यांनी हे विधान नागपूर येथील एका कार्यक्रमात केले आहे.
ते म्हणतात की, आमच्या समाजात सामाजिक विषमतेचा भला मोठा इतिहास आहे आणि त्या लोकांचे जीवन पशुप्राणी सारखे झाले होते तरी देखील आम्हाला काही वाटले नाही आणि हे मागील 2000 वर्षांपासून चालत आलेले आहे. म्हणूनच जोपर्यंत हा भेदभाव चालू राहील तोपर्यंत आरक्षणाचे प्रयोजन चालूच असावे. ते पुढे असेही म्हणाले आहेत की, ’’हो गेली 2000 वर्षांपासून सामाजिक भेदभाव प्रचलित आहेत आणि हो गेले 2000 वर्षांपासून सामाजिक विषमता आम्ही रूजविलेली आहे.’’ यावर कर्नाटकाचे मंत्री प्रयांक खरगे यांनी प्रश्न केला की आम्ही म्हणजे कोण?
भारतीय सभ्यतेला भलामोठा इतिहास आहे. कोणतेही सभ्यतेचे मापदंड असतात यात सर्वात महत्त्वाचा मापदंड म्हणजे त्या-त्या सभ्यतेत माणसा- माणसांमधील संबंधाचे काय, कोण व कोणत्या आधारावर सामाजिक भेदभाव होतो हे आहे. जात, रंग, वंश भेद, पारंपरिक भेदभावांना धर्माचे अधिष्ठान असते, अशावेळी त्याला धर्माच्या शिकवणीचा अभ्यास केला जातो. काही परंपरांना धार्मिक कक्षेत ठेवले जातात. काही परंपरा मात्र धार्मिक श्रद्धांचा भाग असतो, अशा वेळी कोणत्याही समुहात सामाजिक भेदभाव विषमतेला जर धर्माची मान्यता असेल तर ते नष्ट केले जावू शकत नाही. केवळ भारतीय समाजात सभ्यतेतच सामाजिक विषमता नाही तर जगातल्या साऱ्या सभ्यतांमध्ये हे भेदभाव प्रचलित आहेत. पाश्चात्य संस्कृतीने मानवी जीवन मूल्यांशी निगडित नवनवीन विचारसरणी मांडल्या आहेत. सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी आधुनिक विचारधारेवर आधारित भलेमोठे साहित्य संपादन केले तरी देखील काळा आणि गोरा वाद त्या देशांमध्ये आजही प्रचलित आहे. दरवर्षी कोणत्या न कोणत्या सामाजिक कलहांची निर्माण होतच असतात आणि वंश परंपरेला त्या सभ्यतेतून नाहीसे करणे असंभवच आहे. इस्लामपूर्व अरबस्थानात देखील सामाजिक भेदभाव होतो. तसेच इतर सभ्यता, संस्कृतीमध्ये देखील उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ हे भेदभाव आहेतच. भारतात देखील आहेत. याची कबुली स्वतः सरसंघचालकांनी पहिल्यांदाच दिली आहे. पण त्यांनी नष्ट कराव लागेल असे त्यांनी सध्यातरी सांगितलेले नाहीत. पण एकदा एक गोष्ट मान्य केली की त्यावर विचार विनिमय होणार ही आशा बाळगण्यात काही गैर नाही. 2000 वर्षांची परंपरा नष्ट करण्यासाठी काळ लागणार. पण त्याची सुरूवात झाली तर किती काळ लागणार याचा अंदाज आज तर केला जावू शकत नाही.
काही लोकांचे असे म्हणणे आहे की, संघ सध्या मंडलची गोष्ट करत आहे, कारण देशात सध्या निवडणुकीचे पर्व आहे. निवडणूक म्हणजेच सत्ता. तेव्हा हे संघाचे मनपरिवर्तन आहे की परिस्थितीजन्य व्यावहारिक ’’मत परिवर्तन’’ आहे असे प्रश्न अनेजकजण विचारत आहेत. याला कारण असे की 2015 साली संघाने आरक्षणाविषयी फेरविचार होणे गरजेचे असल्याचे सांगितले होते आणि त्यांनी बिहारमधील विधानसभा निवडणुका अगोदर हे मत मांडले होते. याचा परिणाम असा झाला होता की, भाजपच्या त्यावेळच्या बिहार विधानसभा निवडणुकांत पराभव झाला होता. म्हणून आता आरक्षण चालू राहावे, असे विधान केल्याने देशातील चार राज्य आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला त्याचा फायदा मिळावा ही रणनीति आहे का?
Post a Comment