प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की रेशमी वस्त्रे परिधान करू नका. सोन्या-चांदीच्या प्लेट्समध्ये खाऊ नका. सोन्याची भांडी, ग्लास, वगैरे वापरू नका. ह्या वस्तू जगात नाकारणाऱ्यांसाठी आहेत आणि तुम्हाला (श्रद्धावंतांना) परलोकात आहेत. (ह. हुजैफा, बुखारी, मुस्लिम) प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की पाणी एकाच श्वासात पिऊ नका, तर थोडे थोडे तीन टप्प्यांत प्या. पाणी पिण्याआधी अल्लाहचे नाव (बिस्मिल्लाह) घ्या आणि पिल्यानंतर अल्लाहचे गुणगान करा. (ह. इब्ने अब्बास, तिर्मिजी) प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ज्या ग्लासातून पाणी पित असतील त्यात फुकणे किंवा श्वास घेण्यापासून मनाई केली आहे. (अबू दाऊद) तुम्ही झोपण्यासाठी आपल्या बिछान्याऱर जाण्यापूर्वी तो साफ करा, कारण तुम्ही नसताना तुमच्या बिछान्याऱर काय काय गेले असेल हे तुम्हाला माहीत नाही, असे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे. ते पुढे म्हणतात की अशी दुआ करावी की हे माझ्या विधात्या, मी तुझ्या नावाने बिछान्यावर झोपत आहे आणि तुझ्याच साहाय्याने मला जाग येईल. जर झोपेत असताना तू माझा आत्मा काढून घेतला तर तू त्याच्यावर दया कर आणि त्याला सोडून दिले तर तू त्याची मदत कर, जसे तू पुण्यकमीक्ष लोकांना मदत करतो. (ह. अबू हुरैरा, बुखारी) प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, एखाद्या बैठकीत लोक पूर्वीपासून बसलेले असतील तर दोन माणसांच्या मध्ये शिरून बसू नका. तसेच कुणा दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या जागेवरून उठवून त्या जागी तुम्ही स्वतः बसू नका. (ह. अमरो बन शुऐब, ह. अब्दुल्लाह बन उमर, अबू दाऊद, बुखारी, मुस्लिम) प्रेषित मुहम्मद (स.) जेव्हा एखाद्या प्रवासास निघत होते तर ते उंटावर स्वार होण्यापूर्वी तीन वेळा अल्लाहु अकबर (अल्लाह महान आहे) म्हणत. त्यानंतर ते प्रार्थना कर, हे अल्लाह, आम्ही या प्रवासात तुझ्याशी नेकी आणि सदाचाराची मागणी करतो आणि अशा कर्मांची अपेक्षा करतो. हे अल्लाह, ह्या प्रवासाला आमच्यासाठी सोपे कर. हे अल्लाह, या प्रवासात तू आमचा मीत्र आहेस आणि आमच्या मागे घरच्या लोकांची काळजी वाहणारा आहे. हे अल्लाह प्रवासादरम्यान आम्हाला यातनादायक दृष्य आढङू नयेत. तसेच आम्ही वाईट अवस्थेत आमच्या घरांना परत येऊ नये. प्रवासातून परतल्यावर ते अल्लाहचे आभार मानत आणि त्याचे गुणगान करत असत. (ह. अब्दुल्लाह बिन उमर (र.), मुस्लिम) ह. अब्दुल्लाह बिन उमर (र.) म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एखाद्या शत्रूच्या देशात आपल्याबरोबर पवित्र कुरआन घेऊन जाण्याची मनाई केली आहे. (अबू दाऊद) प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, जी व्यक्ती अल्लाह आणि परलोकावर श्रद्धा धारण करत असेल तर तिने कोणत्या भल्या कमाक्षसाठी काही बोलावे अथवा तिने गप्प बसून राहावे. (ह. अबू हुरैरा (र.), बुखारी, मुस्लिम)
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment