ढूंडनेवाला सितारों की गुजरगाहों का
अपने अफकार की दुनिया में सफर कर न सका
अपनी हिकमत की खमोंपेंच में उलझा एैसा
आजतक फैसला-ए-नफा व जरर कर न सका
पण चंद्रावर स्वारी केेलेली आहे. परंतु, आपण आपल्या देशामध्ये न्यायाची स्थापना करू शकलो नाही, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. भारत जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश आहे ही बाब निश्चितच आनंद देणारी आहे. मात्र आपल्या देशातील क्रिमीनल जस्टीस सिस्टम (गुन्हेगारी न्यायदान प्रणाली) ढिसाळ असल्याचे अनेकदा निदर्शनास आलेले आहे. एका व्यक्तीने गुन्हा केला तर त्याला आपल्या न्यायप्रणालीमध्ये शिक्षा होते मात्र समुहाने गुन्हा केला तर शिक्षा देण्यामध्ये आपली न्यायप्रणाली कुचकामी ठरली ठरते हे अनेकदा सिद्ध झाले आहे. याचे ताजे उदाहरण दिल्लीच्या गार्गी वुमन्स कॉलेजमधील घटनेचे आहे. गार्गी कॉलेजध्ये झालेल्या मुलींच्या मास मॉलेस्टेशन (सामुहिक विनयभंग) प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कोर्टाला ’जो क्लोजर रिपोर्ट’(तपास बंद करण्याचा अहवाल) सादर केला त्यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे की आपण सामुहिक गुन्ह्याप्रकरणी शिक्षा देण्यापर्यंत विकसित झालेलो नाहीत.
आपल्या देशात अनेक दंगली झाल्या. त्यात अनेक सामुहिक गुन्हे झाले. मात्र त्या गुन्ह्यांमध्ये बहुतेकवेळा कोणालाच शिक्षा झालेली नाही. हा आपल्या फौजदारी न्याय व्यवस्थेचा काळा इतिहास आहे. दिवसाच्या उजेडात आंतरराष्ट्रीय मीडियासमोर, 6 डिसेंबर 1992 रोजी, बाबरी मस्जिद शहीद करण्यात आली. उरलेले काम दुसऱ्या दिवशी पूर्ण केले गेले. मस्जिद शहीद करणार्यांनी विजयोत्सव साजरा केला. एकमेकांना पेढे भरवले. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. पण आजपर्यंत त्यांना शिक्षा करण्यात आपल्या न्यायव्यवस्थेला यश आलेले नाही. त्यातील अनेक आरोपी आपल्या नैसर्गिक मृत्यूने मेले आणि बाकीचेही तसेच मरतील, असे गृहित धरायला काहीच हरकत नाही.
गार्गी कॉलेज मधील घटना काय होती
दिल्ली विद्यापीठाअंतर्गत येणार्या दक्षिण दिल्लीतील गार्गी महाविद्यालय एक प्रतिष्ठित महाविद्यालय समजले जाते. 6 फेब्रुवारी 2020 रोजी या महाविद्यालयात एक संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संगीतकार जुबीन नौटियाल महाविद्यालयात आपला कार्यक्रम सादर करणार होते. या कार्यक्रमासाठी तरूण मुली नटून थटून आलेल्या होत्या. 4.30 से 5.00 च्या दरम्यान महाविद्यालयासमोरून सीएए आंदोलनाच्या विरोधात एक मोर्चा निघाला होता. त्या मोर्चाचे म्हणणे होते की सीएए कायदा लागू करावा. यावरून सुजान वाचकांच्या लक्षात येईल की, तो मोर्चा कोणत्या वैचारिक बांधणी असलेल्या लोकांचा होता? जरी मीडियातून असा मोर्चा असल्याच्या बातम्या वगळण्यात आल्या असल्या तरी 100 ते 150 लोक ज्यात तरूणांपासून मध्यमवयीन लोकसुद्धा सामील होते, ते अचानक गार्गी महाविद्यालयाचे गेट तोडून महाविद्यालयात कसे पोहोचले? स्पष्ट आहे हे लोक मोर्चातील लोक होते. गेटमधून प्रवेश करताच या लोकांनी मुलींवर सामुहिक लैंगिक हल्ला केला. त्या हल्ल्यात या लोकांनी मुलींबरोबर काय केले? याचे सविस्तर वर्णन करण्याएवढी माझी लेखणी अनैतिक नाही. ज्यांना याचे वर्णन वाचायचे असेल त्यांनी 20 फेब्रुवारी 2020 च्या पुढील महिनाभराच्या व्हिडीओ फुटेज आणि वर्तमानपत्र इंटरनेटवर पहावित. तब्बल दोन तास हा लैंगिक हल्ला सुरू होता. तरूण मुली जीवाच्या आकांताने वाट मिळेल तिकडे पळत होत्या आणि हे लिंगपिसाट पुरूष त्यांना पकडून लैंगिक हल्ले करत होते. या दोन तासात त्या लिंगपिसाट समुहाला कोणीही रोखले नाही. दोन तासानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. तोपर्यंत तो समूह पळून गेला. या संदर्भात लोकसभेमध्ये आवाज उठविला गेला तेव्हा कुठे पोलिस स्टेशन हौज-ए-खासमध्ये एफआयआर दाखल झाला. दहा-वीस लोकांना अटकही झाली. नेहमीप्रमाणे त्यांना जामीनही मिळाला. दरम्यान, ज्या मुलींनी एफआयआर दिला होता, साक्षीदार म्हणून आपली नावे दिली होती त्यांच्यावर प्रचंड दबाव आला आणि शेवटी व्हायचे तेच झाले. मुलींनी माघार घेतली आणि तब्बल चार वर्षांनी दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात कोर्टात क्लोजर रिपोर्ट (अंतिम अहवाल) सादर केला. स्पष्ट आहे कोर्टाने तो स्विकारला नाही. यात अपील झाले आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. सतिशचंद्र शर्मा आणि त्यांचे सहकारी न्या. संजीव नरूला यांनी या प्रकरणात नाराजी व्यक्त केली. भरपूर प्रयत्न करून सुद्धा यापेक्षा संबंधीची अधिक माहिती कोठेच सापडली नाही आणि सापडणारही नाही, याची खात्री वाटते.
राष्ट्रांच्या विनाशाचे कारण
महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत इस्लाममध्ये जी, फुल-प्रुफ पडद्याची व्यवस्था दिलेली आहे, सहशिक्षणावर बंदी लादलेली आहे, त्याची टिंगल टवाळी करणार्यांनी लक्षात घ्यावे की, गार्गी कॉलेजची ही सामुहिक विनयभंगाची घटना अपवाद नाही. अशा घटना मागेही घडलेल्या आहेत, आताही घडत आहेत आणि भविष्यातही घडतील. देशात नेमाने विनयभंगच काय तर बलात्कार, अॅसिड अटॅक, महिलांचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवणे, सुटकेसमधून त्या तुकड्यांची विल्हेवाट लावणे, असे प्रकार घडतच आहेत. यावरून आपल्या सर्वधर्मीय समाजाची नैतिक पातळी खाली आलेली आहे याचा अंदाज येतो.
न्याय प्रक्रिया व्यवस्था म्हणजे काय?
न्यायदान प्रक्रियेमध्ये केवळ न्यायालयच येत नाहीत तर देशातील महिलांना सुरक्षा देणारे कायदे, पोलिस स्टेशन्स, पोलिस अधिकारी, न्यायालये, वकील आणि न्यायाधीश या सर्वांचा यामध्ये समावेश होतो. यात लाखो लोक रात्रंदिवस काम करत असतात. महिन्याकाठी कोट्यावधी रूपयांचा पगार उचलत असतात. असे असूनही चार वर्षे तपास करूनही गार्गी कॉलेजच्या घटनेमध्ये सामील गुन्हेगारांना आपण शिक्षा घडवून आणू शकलो नाही. यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट दुसरी कोणती? एक राष्ट्र म्हणून आपण त्या पीडित मुलींना न्याय देण्यात अपयशी ठरल्याचा हा पुरावा आहे.
राष्ट्रांची विनाशाकडे वाटचाल कशी सुरू होते?
राष्ट्रीय विनाशासंबंधीचे मार्मिक असे विधान आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त प्रसिद्ध इस्लामिक विद्वान सय्यद अबुल आला मौदुदी यांनी खालील प्रमाणे केले आहे. ते म्हणतात-
ज्या राष्ट्रांची आता विनाशाकडे वाटचाल सुरू आहे, त्यांची अवस्था बघा, कला, ललित, साहित्य, सौंदर्याची आवड इत्यादी आवडी निवडींना ते सुंदर नावे देतात, पण नाव बदलल्याने वास्तव बदलत नाही. समाजात अशी कोणती गोष्ट आहे की जिच्यामुळे स्त्रीयांना स्त्रीयांपेक्षा पुरूषांची साथ जास्त आवडते आणि पुरुषांना पुरूषांपेक्षा स्त्रियांची साथ जास्त आवडते? स्त्रिया आणि पुरुष दोहोंमध्ये नटून-थटून राहण्याची आवड का वाढत आहे? संमिश्र ठिकाणी (स्त्री-पुरुष) स्त्रीचे शरीर तिच्या पेहरावातून बाहेर येण्याचे कारण काय? अशी कोणती गोष्ट आहे जिच्यामुळे स्त्री तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव समाजा समोर उघडपणे मांडत आहे? पुरुषांकडून स्त्रीयांकडे ’अजून काही तरी जास्ती’ ची मागणी का होत आहे का? नग्न चित्रे, नग्न क्लिप्स आणि नग्न नृत्य सर्वात जास्त आवडण्याचे कारण काय? प्रेम आणि प्रेमाचे त्रिकोण, चौकोन जोपर्यंत सिनेमात दाखवण्यात येत नाही आणि सेक्स आणि लैंगिक संबंधांच्या अनेक दृष्य जोडल्या जात नाहीत तोपर्यंत सिनेमात मजा येत नाही याचे कारण काय? ही आणि अशी अनेक दृश्ये जर वासना प्रकट करत नाहीत, तर काय प्रकट करतात? ज्या संस्कृतीत असे असंतुलित, कामूक आणि इंद्रियजन्य वातावरण निर्माण होते, त्या संस्कृतीमध्ये विनाशाशिवाय दुसरे कोणते परिणाम होऊ शकतात?
- सय्यद अबुल आला मौदुदी (संदर्भ: परदा पान क्र. 115)
स्त्री-पुरूष दोघांमध्येही एकमेकांच्या विरूद्ध प्रचंड आकर्षण नैसर्गिकरित्याच असते. त्यात संगीत, सुगंध, नाच, गाणे इत्यादीमुळे या आकर्षणामध्ये अमर्यादित (कॅन्सरस) वाढ होते व अशात ते उघडपणे एकमेकांत मिसळत असतील तर त्याचे परिणाम महिलांवरील लैंगिक हल्ल्यांमध्ये होते. गार्गी कॉलेजमध्ये तेच झाले.
असे हल्ले कसे टाळता येऊ शकतात?
आता प्रश्न हा उत्पन्न होतो की, असे प्रश्न भविष्यात उत्पन्न होऊ नये म्हणून काय करावे? याची दोन उत्तरे आहेत. पहिले उत्तर असे की, ते लोक जे शरियतला मानतात त्यांनी शरइयतनए दिलेल्या स्त्री-पुरूषांसंबंधीच्या आचारसंहितेचे पालन करावे. दुसरे उत्तर असे की जे शरियतला मानत नाहीत त्यांनी शरियतचा अभ्यास करावा.
स्त्रियांविषयी पुरूषांच्या आचारसंहितेसंबंधी सय्यद अबुलआला मौदुदी म्हणतात,
आदमी के लिए ये बात हलाल नहीं है के वो अपनी बीवी या अपनी महरम खवातीन के सिवा किसी दूसरी औरत को नज़र भर कर देखे. एक दफा अचानक नजर पड़ जाए तो वो माफ है, लेकिन ये माफ नहीं है कि आदमी ने पहली नजर में जहां कोई कशिश महसूस की हो वहीं फिर नजर दौड़ाये. नबी सल्लम ने इस तरह की दीदा-बाज़ी को आंख की बदकारी से ताबीर (तुलना) फरमाया है. आपका इरशाद है कि- आदमी अपने तमाम हवास (आवयवों) से ज़िना(व्याभिचार) करता है. देखना आंखों का ज़िना है. लगावट की बातचीत जबान का ज़िना है. आवाज से लज़्ज़त लेना कानों का ज़िना है. हाथ लगाना और नाजायज मकसद के लिए चलना हाथ-पांव दोनों का ज़िना है. बदकारी की ये सारी तमहिदें (प्रस्तावनायें) जब पूरी हो चुकी हों तब शर्मगाह (गुप्तांग) या तो उसकी (व्यभिचार की) तक्मिल (पुरी) कर देती हैं या तक्मिल करने से रह जाती हैं. (बुखारी मुस्लिम) (तफहीमुल कुरआन जिल्द 3: हाशिया नं 29: सफा नं 380)
ये है इस्लाम का महिलाओं के साथ व्यवहार का मियार (स्तर). अब इसके तनाज़ूर (पार्श्वभूमी) में आप सोचें के हमारा मुआशरा कहां खडा है? इस स्तर तक पहुंचना हम मुसलमानों का धार्मिक दाईत्व है. तो कोशिश किजिए के हम इस स्तर को पहुंचें. कोशिश आप और हम करेंगे तो यकिनन अल्लाह पाक की मदद आयेगी और एक सालेह मुआशरा (आदर्श समाज) वजूद (अस्तित्व) में आयेगा और इसकी बरकतों को देखकर अन्य समाज को भी ये ख़्वाहिश होगी के हमारा अनूसरण करें. यही असली जिहाद है. इसी से हमारा मुल्क-ए-अज़िज़ महासत्ता बनेगा. इस लिए के जिस क़ौम का नैतिक आधार मज़बूत होता है वही दुनिया का नेतृत्व कर सकती है.
अशा आचारसंहितेच्या पालनानंतर देखील काही लोकांनी महिलांविरूद्ध लैंगिक अपराध केलेच तर मग मात्र त्यांना कठोर शासन करायला हवे. त्यासंबंधी मौलाना खालील कुरआनच्या आयाती विश्लेषणादरम्यान म्हणतात - आणि जेव्हा तुम्ही लोकांसंबंधी निर्णय घ्याल तेव्हा न्याय करा.
(सूरा निसा आयत क्र. 58)
विश्लेषण : म्हणजेच ज्या दुष्कृत्यांमध्ये बनी-इस्रायल (ज्यू) पडले होते त्यापासून तुम्ही दूर राहा. बनी-इस्रायलची एक मूलभूत चूक ही होती की त्यांनी त्यांच्या अधःपतनाच्या काळात जबाबदारीची पदे अर्थात धार्मिक आणि राष्ट्रीय नेतृत्वाची पदे, त्यांच्या नियंत्रणात नसलेल्या दुराचारी लोकांना देणे सुरू केले होते. ते लोक पात्र नव्हते. एवढेच नव्हे तर नालायक, नीच, दुष्ट आणि अप्रामाणिक देखील होते. याचा परिणाम असा झाला की, वाईट लोकांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण समाजाची अधोगती होत राहिली. (म्हणूनच) मुस्लिमांना येथे असे न करता ट्रस्टवर्दी म्हणजेच त्यांच्या विश्वासास पात्र आणि लायक असलेल्यांनाच जबाबदाऱ्या सोपवाव्यात. बनी-इस्रायलचा दुसरा मोठा कमकुवतपणा म्हणजे ते न्यायाच्या आत्म्यापासून वंचित होते. वैयक्तिक आणि राष्ट्रीय फायद्यासाठी ते न डगमगता न्यायिक विश्वासाला गिळंकृत करत असत. ते उघडपणे हटवादीपणे वागायचे. न्यायाच्या गळ्यावर सुरी ठेवायला त्यांनी अजिबात मागेपुढे पाहिले नाही. त्यांच्या अन्यायाचा अत्यंत कटू अनुभव त्या वेळी मुस्लिमांनाच येत होता. अशात त्यांच्यासमोर एकीकडे अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे शुद्ध जीवन होते आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणारे चारित्र्यवान लोक होते, तर दुसर्या बाजूला ते लोक होते जे लोक मूर्तीपूजा करायचे, आपल्या मुलींना जिवंत पुरायचे, अगदी आपल्या सावत्र आईशीही लग्न करायचे आणि पूर्ण नग्न अवस्थेत काबाभोवती तवाफ करायचे. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत इशारा दिल्यानंतर अल्लाह आता मुस्लिमांना असा अन्याय होऊ नये, अशी सूचना देतो. कोणाशी मैत्री असो वा शत्रुत्व, जेंव्हा बोला न्यायाविषयी बोला आणि निर्णय घेताना न्यायाने निर्णय करा. (तफिमुल कुराण हिंदी खंड 1 पृष्ठ क्रमांक 398-399 समास क्रमांक 88)
जोपर्यंत वर नमूद केल्या प्रमाणे महिलांच्या सुरक्षेविषयक सामाजिक सुधारणासाठीचे प्रयत्न केले जाणार नाहीत व त्यानंतर कठोर न्याय केला जाणार नाही तोपर्यंत महिलांवर अन्याय होतच राहणार. ज्या समाजामध्ये आसिफासारख्या चिमुकलीवर बलात्कार केलेल्या नराधमांच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली काढली जाते, बिल्कस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणी दोषींना सोडले जाते किंबहुना सुटुन आल्यावर पेढे भरवून त्यांचा सत्कार केला जातो अशा स्तरावर पोहोचलेल्या समाजाकडून न्यायाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. परंतु, अशाने हताश होवून चालणार नाही. असे विकृत लोक प्रत्येक समाजामध्ये असतातच. पण त्यांची संख्या कमी असते. म्हणून मुस्लिमांची ही धार्मिक आणि राष्ट्रीय अशी दुहेरी जबाबदारी आहे की, त्यांनी इस्लामचा संदेश देशबांधवांपर्यंत मिळेल त्या प्लेटफार्मवरून पोहोचवावा. एक ना एक दिवस नक्कीच फरक पडेल. चांगल्या गोष्टींचा परिणाम माणसाच्या मनावर उशीरा होतो, पण नक्की होतो. यात शंका नाही. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, हे अल्लाह गार्गी कॉलेज सारख्या घटना आपल्या या या प्रिय देशात पुन्हा होणार नाहीत अशी समज भारतीय समाजास दे. आमीन.
- एम. आय. शेख
Post a Comment