(१०७) हे याकरिता की यांनी परलोकाऐवजी या जगातील जीवनाला पसंत केले आणि अल्लाहचा कायदा असा आहे की तो त्या लोकांना मुक्तीचा मार्ग दाखवीत नसतो ज्यांनी त्याच्या देणगीशी कृतघ्नता केली आहे.
(१०८) हे ते लोक आहेत ज्यांच्या हृदयावर, कानांवर व डोळ्यांवर अल्लाहने मोहर लावलेली आहे, हे गफलतीत बुडून गेले आहेत.
(१०९) निश्चितच हेच परलोकात नुकसानीत राहतील.३२
(११०) याउलट ज्या लोकांची अशी स्थिती आहे की जेव्हा (ईमानमुळे) ते छळले गेले तेव्हा त्यांनी घरेदारे सोडली, स्थलांतर केले, अल्लाहच्या मार्गात संघर्ष झेलले आणि धैर्य दाखविले, त्यांच्यासाठी खचितच तुझा पालनकर्ता क्षमाशील व कृपाळू आहे.
(१११) (या सर्वांचा फैसला त्या दिवशी होईल) जेव्हा प्रत्येकजण आपल्याच बचावाच्या काळजीत पडलेला असेल आणि प्रत्येकास त्याने केलेल्या कृत्यांचा मोबदला पुरेपूर दिला जाईल आणि कोणावरही तिळमात्रदेखील अन्याय होणार नाही.
३२) हा संकेत त्या लोकांसंबंधी आहे ज्यांनी ईमानचा मार्ग कठीण असल्याचे पाहून तो वर्ज्य केला होता व पुन्हा आपल्या काफिर व अनेकेश्वरवादी राष्ट्रास जाऊन मिळाले होते.
Post a Comment