प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या काळामध्ये ईदच्या नमाजसाठी महिला सुद्धा ईदगाहमध्ये येत. अशाच एका ईदच्या नमाजनंतर प्रेषित मुहम्मद सल्ल. महिला ज्या ठिकाणी बसल्या होत्या त्या ठिकाणी गेले आणि फर्माविले की, ‘‘ हे महिलांनों! तुम्ही खूप दान करत चला. यासाठी की मी नरकामध्ये महिलांची संख्या जास्त असल्याचे पाहिले आहे.’’ यावर महिलांनी प्रश्न विचारला की, ‘असे का?’ तेव्हा प्रेषित सल्ल. उत्तरले, ’’ तुम्ही आपल्या पती बरोबर फार जास्त वाद घालता आणि त्याच्याप्रती कमी कृतज्ञता व्यक्त करता. तुमच्या सारखा कमी अक्कल आणि धर्माची कमी समज असलेला समुह दूसरा मी पाहिलेला नाही. तुम्ही आपल्या कृतीेने हुशार पुरूषांची अ्नकल संपवून टाकतात.’’ त्यावर महिलांनी विचारले,’’ धर्माविषयी आमची समज आणि अ्नकल कमी कशी काय आहे?’’ तेव्हा प्रेषित सल्ल. उत्तरले, ’’एका पुरूषाची साक्ष दोन महिलांच्या साक्षबरोबर नसते का? हे अक्कल कमी असल्याच्या कारणामुळे आहे. शिवाय, महिलांना मासिकपाळी येत नाही का? तेव्हा तुम्हाला नमाज अदा करता येते ना रोजा ठेवता येतो.’’ महिला उत्तरल्या, ’हो हे बरोबर आहे.’तेव्हा प्रेषित सल्ल. म्हणाले, ’’ याच कारणामुळे धर्माची समज तुम्हाला कमी आहे.’’ (संदर्भ : बुखारी 304, 1462, मुस्लिम 79, अबुदाऊद 4679, तिर्मिजी 2613, इब्ने माजा 4003, मस्नद अहेमद 5343 इत्यादी.) ही हदीस हजरत अबु सईद कुदरी रजि., हजरत अब्दुल्लाह बिन उमर रजि, आणि हजरत अबु हुरैराह रजि. यांच्या संदर्भाने आलेली आहे.
प्रेषित सल्ल. यांच्या या हदीसचा अर्थ असा मुळीच नाही की त्यांच्यात अक्कल, विचार करण्याची शक्ती पुरूषांपेक्षा कमी असते. याचा पुरावा याच हदीसमध्ये आहे. ज्यात प्रेषित सल्ल. यांनी म्हटले आहे की, ’’ महिला हुशार पुरूषांची अक्कलसुद्धा संपवून टाकतात’’. जर महिला कमी अ्नकलवान असत्या तर हुशार पुरूषांना कसे आपल्या अंकीत करू शकतात. प्रेषितांचा इशारा सुरे बकरा आयत नं. 282 कडे होता. ज्यात एका विशिष्ट प्रश्नासंबंधी ईश्वराने म्हटलेले आहे की,’’दोन पुरूषांची साक्ष घ्या, जर दोन पुरूष उपलब्ध नसतील तर एक पुरूष आणि दोन महिलांची साक्ष घ्या, म्हणजे, एक महिलेला विसर पडला तर दुसरी तिला आठवण करून देईल.’’या आयातीमध्ये सरसकट कोणताही आदेश देण्यात आलेला नाही की प्रत्येक वेळी महिलांची साक्ष पुरूषापेक्षा अर्धी राहील. हे केवळ एका विशिष्ट प्रश्नासंबंधी आदेश अवतरति झालेला आहे. शरीयतमध्ये अशा अनेक घटनांचा उल्लेख आहे ज्यात एकच महिलेच्या साक्षीवर निर्णय दिले गेलेले आहेत आणि त्यांच्या तुलनेत पुरूषांच्या साक्षीला सन्माननीय समजण्यात आलेले नाही. (उदा. बाळाला किती वर्षे आणि कोणी दूध पाजवावे?)
या संदर्भात प्रसिद्ध महिला मुस्लिम विद्वान समीना नाजीश यांनी म्हटलेले आहे की,’’ इससे ये साबित नहीं होता के, फिक्री सलाहियत के मामले में मर्द और औरत के दरमियान फर्क है. हवास और जहानत के मामले में उनके दरमियान तफावत पायी जाती है. जो शख्स भी किसी वाकीये के, एक पहिलू को मद्देनज़र रखकर सोंचेगा और दूसरे पहलू को नजरअंदाज कर देगा तो उसका गौरो फिक्र करना नाखिस होगा. ख्वाह वो मर्द हो या औरत. इससे ये मालूम होता है के, अ्नल में कमी का मतलब गौर वो फिक्र की सलाहियतों में कमी या दिमाग की बनावट में नुख्स नहीं है. बल्के ये कमी उनके खारजी असबाब व आमाल में होती है. जो गौर व फिक्र पर असरअंदाज होती है. जिनसे औरत बहोत जल्द मुतास्सिर हो जाती है. क्यूंकी, उसके फितरत में जज्बातियत का गल्बा होता है. वो अपनी फित्री जज्बात से मगलूब होकर आशिया के बारे में फैसला करती है. उसके जज्बात बजऔकात उसके अ्नल पर गालीब आ जाते हैं.’’ (औरत से मुताल्लिक बाज अहादिस का मुतालेआ. त्रैमासिक तहेकिकाते इस्लामी अलिगढ : ऑक्टोबर-डिसेंबर - 2011.)
- डॉ. रजिउल इस्लाम नदवी,
दिल्ली
पुस्तक : मेमारे जहाँ तू है
भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे
Post a Comment