प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की धृष्टपृष्ठ आणि शक्तिशाली माणसाला कुणाकडे भीक मागणं वैध नाही. (तिर्मिजी)
ज्या माणसाला लोक एक-दोन घास अन्न न देता दरवाजावरून परत लावून देतात तो निराधार नाही. निरा३धार अशी व्यक्ती आहे ज्याला लोकांकडे विनंती करून मागण्यास लाज वाटते. (बुखारी)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, मला शपथ आहे त्या अस्तत्वाची! एक व्यक्ती खाद्यावर लाकूड घेऊन हमाली करतो असा माणूस त्या लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे जे भीक मागत असताना लोक त्यांना भीक देत नाहीत. (बाबुज्जकात)
जो माणूस नेहमी मागत राहतो, तो कयामतच्या दिवशी अशा अवस्थेत येईल की ज्याच्या चेहऱ्यावर मासैचा एक तुकडा देखील नसेल. (तिर्मिजी)
एखाद्या व्यक्तीकडून जेव्हा कोणते पाप घडते तेव्हा त्याच्या हृदयावर एक काळा डाग उमटतो. जर त्याने पश्चात्ताप केला आणि अल्लाहपाशी माफी मागितली तर त्याचे हृदय स्वच्छ होते. पण जर त्याने वारंवार गुन्हा केला तर त्याच्या संपूर्ण हृदयावर काळा डाग पसरून जातो. (सीरतुन्नबी)
ज्या व्यक्तीला पुण्यकर्म करण्याने प्रसन्नता मिळते आणि पाप केल्यावर दुःख होते, त्याने जर एखादे वाईट कृत्य केले असेल तर त्याला ते नापसंत वाटले आणि कोणते नेक कर्म केल्यास त्याला प्रसन्नता लाभते अशी व्यक्ती श्रद्धावान आहे. (सीरतुन्नबी)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की अल्लाह मद्यावर, त्याचे सेवन करणाऱ्याचा, त्याची सेवा करणाऱ्याचा, त्याला विकणाऱ्याचा, ते खरेदी करणाऱ्याचा, ते तयार करणाऱ्याचा, त्याची हमाली करणाऱ्याचा आणि ज्या व्यक्तीला ते दिले जाईल अशा सर्वांचा धिक्कार करतो. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी व्याज घेणाऱ्याचा, व्याज देणाऱ्याचा, त्यावर साक्ष देणाऱ्याचा आणि ते लिहणाऱ्याचा धिक्कार केला आहे. (अबू हुरैरा (र.), सीरतुन्नबी)
- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment