प्रसिद्ध अमेरिकन भूवैज्ञानिक मॅक्स स्टाइनके यांनी 3 मार्च 1938 रोजी सउदी अरबमध्ये तेलाच्या पहिल्या खानीचा शोध लावला. काळ्या रंगाच्या घान वास येणार्या चिकट पदार्थ (क्रुड ऑईल) च्या एका बॅरलच्या मोबदल्यात एक डॉलर मिळण्यास सुरूवात झाल्याने सउदी शासक हुरळून गेले. अनेक वर्षे हा प्रकार सुरू राहिला. अरबांना क्रुड ऑईलचे महत्त्व तेव्हा कळाले जेव्हा त्यांच्या पुढील पिढीतील तरूण युरोप आणि अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले. त्यांच्या लक्षात आले की, युरोप आणि अमेरिकेची प्रगती आपल्या देशातून आनत असलेल्या तेलामुळे होत आहे. यानंतर अरब सावध झाले आणि त्यांनी तेलाच्या किंमती हळूहळू वाढविण्याला सुरूवात केली. किंग फैसल यांनी जेव्हा तेलाच्या किंमती वाढवायला सुरूवात केली तेव्हा अमेरिकेने त्यांच्याच पुतण्याला हाताशी धरून त्यांची हत्या घडवून आणली.
1951 साली तेलाच्या बदल्यात सुरक्षा हा करार सऊदी अरब आणि अमेरिकेच्या दरम्यान झाला तेव्हापासून अमेरिकेने उत्खननासाठी म्हणून आपले तज्ज्ञ आणि त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून आर्मी सऊदी अरबमध्ये उतरविली. यावरही अमेरिकेला चिंता होती की, एक ना एक दिवस अरबी लोक स्वताचे रक्षण करण्यास पात्र होतील आणि आपल्याला मायदेशी परत जावे लागेल आणि मौल्यवान तेल हातातून जाईल, असे होवू नये म्हणून त्यांनी इजराईलला अरबांच्या इलाख्यात आपली छावणी म्हणून विकसित करण्यास सुरूवात केली. इजराईलच्या माध्यमाने आजपर्यंत अमेरिकेने खाडीच्या सर्व देशांवर आपली पाश्वी पकड कायम ठेवलेली आहे. -
1967 आणि 1973 साली अरब- इजराईल युद्धामध्ये इजराईलची छवी ’बिचारा’ अशी दाखविण्यात अमेरिकी माध्यमांना यश आले. या गरीब बिचार्या छोट्याशा देशावर बलाढ्य अरबांनी किती अन्याय केला हे चित्र जगाच्या कैन्वासवर रेखाटण्यात अमेरिकन मीडियाने कोणतीही कसर ठेवली नाही. वास्तविक परिस्थिती उलटी होती. अरबी लोकांनी आपलीच भूमी (पॅलेस्टाईन) गमाविली होती व 1967-73 चे दोन्ही युद्ध अपमानास्पदरित्या हरले होते. तरी परंतु तेच खलनायक म्हणून जगात बदनाम झाले. ही गोष्ट कतरचे अमीर शेख हमाद बिन खलीफा वलसानी यांनी नेमकी हेरली. त्यांच्या लक्षात आले की सत्य ते नव्ते जे सत्य होते तर सत्याचा जो अभास अमेरिकन माध्यमांनी निर्माण केला होता ते सत्य होते. तेव्हा त्यांनी एक असे न्यूज चैनल लाँच करण्याचा मनोमन निश्चय केला की जो जगाला सत्य दाखवेल. कतरकडे जगातील सर्वात मोठे नैसर्गिक गॅसचे साठे असून, तो मध्यपुर्वेतील एक धनाड्य देश आहे. मध्यपुर्वेतील अज्ञानी अरबांनी उंच-उंच इमारती उभारण्यामध्ये जी स्पर्धा सुरू केली. त्या स्पर्धेला कतरने फारसे महत्त्व न देता आंतरराष्ट्रीय मीडियाच्या क्षेत्रात उतरण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी त्यांनी सर्व प्रथम स्वतःचे सॅटेलाईट लाँच केले. कारण त्यांना माहित होते की, भाड्याने सॅटेलाईट घेऊन सत्य दाखविता येणे शक्य नाही. सॅटेलाईट यशस्वीरित्या लाँच होताच 1 नोव्हेंबर 1996 रोजी कतरची राजधानी दोहा येथे, अल जजिरा नावाचे एक फ्री चैनल त्यांनी लाँच केले. जज़ीरा म्हणजे द्विप. सुरूवातीला हे चैनल फक्त 6 तास चालत असे आणि फक्त अरबी भाषेमध्ये बातम्या देत असे. मात्र शरियतची नैतिक चौकट कायम ठेवत सत्य बातम्या देण्याचा सपाटा जेव्हा अल जजिराने लावला तेव्हा अल्पावधीतच संपूर्ण मध्यपुर्वेतील देश या चॅनलचे गुणगान गाऊ लागले. लवकरच अल-जजिराने आपली इंग्रजी वाहिनी सुरू केली. त्यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि युरोपच्या मीडिया क्षेत्रातील तज्ज्ञ, एच.डी. कॅमेरा एक्सपर्ट आणि अँकर हायर केले. त्यांना मागेल तेवढा पगार देऊन उलट कमिशन देण्यास सुरूवात केली आणि पाहता-पाहता इंग्रजी भाषेतील अल-जजिराच्या या वाहिनीने बीबीसी आणि सीएनएन सारख्या वाहिन्यांना आसमान दाखविले. मग आपल्या माध्यमांना निर्माण झालेला धोका ओळखून अल-जजिराला बंद पाडण्यासाठी अमेरिकेने जंग-जंग पछाडले. आपला विश्वासू सेवक सऊदी अरेबियाच्या प्रिन्स मुहम्मद बिन सलमान याला हाताशी धरून मध्यपुर्वेतील सहा अरबी देशांना आपल्या गटात वळवून अलजजिराचा बहिष्कार सुद्धा घडवून आणला. पण अमेरिकेच्या या गुलामांना जनतेने दाद दिली नाही. आजमितीला अलजजीरा अब्जावधी डॉलरचा व्यवसाय बनला आहे. इराकमध्ये अमेरिकेने जेव्हा सद्दाम हुसेनला हुसकावण्यासाठी सैन्य उतरविले तेव्हा अमेरिकन सैन्याचा अत्याचार अल-जजिराने लाईव्ह टेलिकास्ट केला. त्यामुळे जगात खळबळ उडाली. अमेरिकेला आपल्या सैन्याच्या अत्याचारासंबंधी युनोत माफी मागावी लागली. मग लवकरच अल-जजिरा एक असा चैनल बनला की, जो 130 देशांमध्ये पाहिला जाऊ लागला आणि 430 मिलियन लोक याचे नियमित प्रेक्षक बनले. बातम्या सत्य असल्यामुळे आणि प्रपोगंडा शुन्य असल्यामुळे दस्तुरखुद्द अमेरिका तसेच दर्जेदार इंग्रजी आणि डिजिटल कवरेज असल्यामुळे संपूर्ण युरोप आणि अमेरिकेतील लोक अल-जजिरा पाहू लागले. त्यातच मग कोट्यावधी रूपयांचे पॅकेज आणि विमा देऊन धाडसी तरूण पत्रकार आणि कॅमेरामन यांना अलजजिराने ज्या-ज्या ठिकाणी अन्याय होत आहे त्या-त्या ठिकाणी पाठविले. या सर्वांचा परिणाम म्हणून शेवटी नाइलाजाने 2001 मध्ये अफगानिस्तानमधील घटनांचे कव्हरेज हक्क लाखो डॉलर्स अल-जजिराला देऊन अमेरिकेच्या सीएनएन वाहिनेने खरेदी केले. खर्या बातम्या विकून आज जेवढी कमाई अलजजिरा करतो तेवढी प्रपोगंडा करून इतर चॅनल करू शकत नाहीत ही या वाहिन्यांची शोकांतिका आहे. याच अल-जजिरापासून प्रेरणा घेऊन रज्जब तय्यब उर्दगान यांनी तुर्कीयेमध्ये टीआरटी नावाचे असेच चैनल सुरू केले असून, त्याचीही घौडदौड अल-जजिरासोबत सुरू आहे. अलजजिराच्या या खर्या पत्रकारितेमुळे नाविलाजाने का होईना पश्चिमी मीडियाला (जो की गोदी मीडिया) होता सत्य दाखविणे भाग पडत आहे. आजमीतिला अलजजिराचा प्रभाव एवढा वाढलेला आहे की, एखाद्या देशाचे सरकार उलथून टाकण्याइतपत हा चैनल शक्तीशाली बनलेला आहे. कतरची शक्ती त्याच्या गॅसपेक्षा जास्त अल-जजिरामुळे वाढलेली आहे. हेच कारण होते की, अमेरिकेला अफगानिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी तालीबानशी बोलणी करण्यासाठी कतरला मध्यस्थ म्हणून काम करण्याची विनंती करावी लागली. आजही गझामध्ये जे युद्ध सुरू आहे तेथे युद्धबंदी लागू करण्यासाठी अमेरिका कतरचीच मनधरणी करत आहे. अल-जजिराचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी गझाचे युद्ध कव्हर करण्यासाठी आपल्या पत्रकार आणि कॅमेरामनची एक फौजच गझामध्ये उतरविलेली आहे. अल-जजिराचे अनेक पत्रकार प्राणाला मुकलेले आहे. तरी परंतु इजराईलचे अत्याचार लाईव्ह दाखविण्यासाठी ’अलजजिरा पॅलेस्टाईन’ नावाची उपवाहिनीच अल-जजिराने लांच केली आहे, जी चोविस तास इजराईली सैन्याचा अत्याचार लाईव्ह दाखवत आहे. त्यामुळेच इजराईलसह अमेरिकेमध्ये इजराईल विरूद्ध जनमत तयार होत आहे. अमेरिकेत अमेरिकन तर ब्रिटनमध्ये ब्रिटिश नागरिक आपल्याच सरकारां विरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. गझा मधील अल-हिलाली या हॉस्पिटलवर बॉम्बवर्षाव करून इजराईलने त्याचा साफ इन्कार केला होता तेव्हा अलजजिराने इजराईलने केलेली बॉम्बिंगचा व्हिडीओच रिलीज केला आणि इजराईलला माफी मागावी लागली. एवढेच नव्हे तर नेतनयाहू विरूद्ध जनमत तयार करण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका अल-जजिराने वठविली आहे. नेतनयाहू यांच्या मंत्र्यांची आपसात होत असलेली हाणामारी, मतभेद, खासदारांचे रडणे, ज्यू सैनिकांच्या शवपेट्या सगळ्या गोष्टी लाईव्ह दाखविण्यामध्ये अल जजिराला यश प्राप्त झाले आहे. यावरूनच अलजजिराच्या पत्रकारांचा शिरकाव दस्तुरखुद्द तेलअव्हीव्हमध्ये झालेला आहे ही गोष्ट सिद्ध होते. गझा येथील मुजाहिदीनचे इजराईली सैनिकांवरचे हल्ले आणि त्यांच्याद्वारे मरकबा टँक उडविण्याची लाईव्ह दृश्ये दाखवून अलजजिराने गझाच्या मुजाहिदीनचे नीतिधैर्य उंच ठेवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावलेली आहे.
एकंदरित ईश्वराद्वारे प्रदान केेलेल्या संपत्तीचा सदुपयोग सत्याच्या प्रसिद्धीसाठी कसा करता येईल, याचे उत्कृष्ट उदाहरण अल-जजिरा वाहिनी आहे.
- एम. आय. शेख,
लातूर
Post a Comment